Top Post Ad

शिवाजी पार्कवर ठाकरी बाणा....


  शिवतीर्थावरील (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्यावरून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिंदे गट व ठाकरे गट आमने-सामने आले होते.  शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला होता.  मात्र शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागे घेतल्याने तिथं आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून ठाकरे गटाने जल्लोषही केला. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X या सोशल मीडियावर त्यांचं निवेदन सादर केले आहे. 

शिवाजी पार्क येथे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत जायचंय, साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय! शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षीसुद्धा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ येथे दसरा मेळावा होणार आहे”, - उद्धव ठाकरे 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा… शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला हिंदुत्वाच्या विचारांसाठी मिळावं, अशी आमची भूमिका होती. पण, वाद टाळण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हिंदुत्वाचे विचार आपल्याला मांडता येतील, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहेत की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल. कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी आहे. हा फुटलेला गट नाही, तो फुटलेला गट आहे. शिवसेनेतून चाळीस आमदार फुटून शिंदेंसोबत गेले म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातातून एकनाथ शिंदेंच्या हातात दिला. हा सरळ, सरळ अन्याय आहे. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे, निवडणूक आयोग आहे, दिल्लीची सत्ता आहे, म्हणून तुम्ही काहीही मनमानी कराल हे चालणार नाही. गेल्या वर्षीची सभाही शिवाजी पार्कावर झाली. यावेळीही दसरा मेळावा शिवतीर्थावर होईल, उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा एकनाथ शिंदे फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. ते नंतर आमदार, मंत्री झाले. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे. याच शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकारिणीतही नव्हते. ते तेव्हा फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. नंतर उद्धव ठाकरेंनीच त्यांना आमदार, मंत्री बनण्याची संधी दिली.  शिवसेना कोणाची? याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती तेव्हा एकनाथ शिंदे गटाचे नेते ठामपणे आमच्याच बाजूने निर्णय येणार, असे सांगत होते. ते हा दावा कशाच्या आधारे करत होते? भाजपने त्यांना निवडणूक आयोगाचे सदस्यत्व बहाल केले होते का? दुर्दैवाने झालेही तसेच. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार शिवसेना एकनाथ शिंदेंकडे सोपवली. - खासदार संजय राऊत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com