- BSE आणि NSE गुजरातमध्ये जाण्याची शक्यता आहे.
- आधी महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमधील निवडणुकीच्या आधी गुजरातला नेला आणि नंतर तो तिथेही होण्याची शक्यता नष्ट झाली.
- ड्रग्स पार्क, टाटा एअरबस प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात येणार होते .... गुजरातला वळवले.
- बंदरे, हिरे व्यापार सारखे मोठे प्रोजेक्ट्स ज्यातून मोठ्या प्रमाणावर लहान व्यवसाय, रोजगार व नोकऱ्या निर्माण होऊ शकतात... सगळं गुजरातला. (नको असलेले फक्त इथे लादायचे)
- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जी महाराष्ट्रात १५० किमी आणि गुजरात मध्ये ३५० किमी असणार, त्याचा खर्च मात्र गुजरात आणि महाराष्ट्र समसमान करणार. या प्रोजेक्ट चा फायदा महाराष्ट्राला जास्त होणार की गुजरातला ?
- महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातकडे फिरवण्याचा डाव.
- महाराष्ट्रात मुंबईत दुकानावर मराठी पाट्या नको अशी मागणी. कित्येक उपनगरांमध्ये दुकाने, इमारतींमध्ये 'मराठी भाषे'ला स्थान सुद्धा नाही...
हे झालं महाराष्ट्रापुरतं. ..पण महाराष्ट्राला हे चालतं. फार समजूतदार, उदार मनाची, आदरातिथ्य करणारी , सेवाभावी लोकं राहतात महाराष्ट्रात. या अनुभवानंतर देशावरही गुजरात लादू पाहतायत.
- मायक्रॉन चिप प्रोजेक्ट, ज्याची पूर्ण मालकी असणार मायक्रॉन कडे आणि मोठी गुंतवणूक संघराज्य सरकार करणार... जाणार गुजरातमध्ये.
- खेळामधल्या यशात वाटा कमी गुजरातचा पण खेळाच्या बजेटमध्ये मोठा वाटा सुद्धा गुजरातचा.
- संघराज्य सरकार जगातला मोठा पुतळा उभारणार... गुजरातमध्ये.
- परदेशी पाहुणे, क्षि जिनपिंग, इतर पाहुण्यांना घेऊन जाणार गुजरातमध्ये. म्हणजे देशाने गुजरातला फक्त, देत राहायचं. बदल्यात गुजरातकडून देशाला काय मिळणार ?
- सैन्यात सर्वात कमी वाटा ?
- शिक्षण आरोग्य क्षेत्रात सुमार कामगिरी करत देशाची सरासरी कमी करणे ?
- बँकांना फसवून, घपले करून देश सोडून पळून जाणारे मेहुलभाय, निरवभाय सारख्यांचा सर्वात मोठा हिस्सा ?
- विलफुल डिफॉल्टर्स मध्ये मोठ्ठाली कर्ज असणारे सर्वाधिक गुजराती ?
- बँकांना हाजरो कोटींचा चुना लावणारे ?
- हजारो कोटींचा जीएसटी घोटाळा करणारे ?
- सरकारी योजना खिशात टाकणारे निवडक मित्र ?
- PMO कार्यालयात काम करतो अशी बतावणी करत लष्कराचा पाहून बनणाऱ्या किरण पटेल सारखे आणि चांद्रयान चं डिझाईन आपलंच असल्याची बतावणी करणारे ठग ?
- आणि देशाला बेरोजगारी, ढासळणारी अर्थव्यवस्था, द्वेषाच्या खड्ड्यात ढकलणारे सुद्धा......
पण, आपली श्रद्धा नेत्यांच्या चरणी सोपवणारी 'प्रजा' या सगळ्याचा विचार करते ? त्यासाठी 'नागरिक' बनावे लागते.
...सुरज सामंत, ठाणे
0 टिप्पण्या