श्रीगणेश विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील श्रीगणेश विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाट यांचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हस्ते होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसेच पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार राज्य मंत्री कपिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा शंभूराज देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे. राजन विचारे खासदार, लोकसभा, श्रीकांत शिंदे खासदार, लोकसभा, कुमार केतकर खासदार, राज्यसभा या समारंभासाठी खालील सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड आमदार, विधानसभा, प्रताप सरनाईक आमदार, विधानसभा, प्रमोद पाटील आमदार, विधानसभा, संजय केळकर आमदार, विधानसभा, अॅड.निरंजन डावखरे आमदार, विधान परिषद आदी मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (भा.प्र.से.) अतिरिक्त आयुक्त (१) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी लि. संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे आणि पालिकेतील अधिकारी वर्गाची या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे तरी नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीजवळ, गायमुख, ठाणे (प.) येथे होणाऱ्या या कार्यक्रमास ठाण्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या