Top Post Ad

डीजे वाजवू नका असे म्हटल्याने काठ्या, कोयता, लोखंडी सळईने बेदम मारहाण

 पुणे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे एका कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. माझ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डीजे वाजवू नका असे म्हटल्याने २१ जणांनी काठ्या, कोयता, लोखंडी सळई ने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे. सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. याबाबत सुनील प्रभाकर शिंदे यांनी तळेगावदाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुनील बंदा रजपूत (वय २८), मुकेश करसन रजपुत (२६), रवी करसन रजपुत (३०), सनी करसन रजपुत (३२), प्रवीण करसन रजपुत (३०), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (२८), अतुल वेलसी रजपुत (२१), कृष्णा बलभीम खराते (२३), रवी हिरा रजपुत (२८), संदीप रमेश रजपुत (२९), विशाल काळुराम रजपूत (२९), संतोष काळुराम रजपूत (२५), विलास हिरा रजपूत (२२), अनिल हिम्मत रजपूत (३१), करसन जयंती रजपूत (५०), दिपक हिम्मत रजपूत (३२), आकाश अशोक रजपूत (२१), काळुराम भिका रजपूत (५५), वसंत भिका रजपूत (५१), अमित वेलसी रजपूत (२४) आणि रमेश जयंती रजपूत (५०, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाचा सावटाखाली होते. त्यामुळे मुलाच्या दुःखाचा वेदना त्यांना सहन होत नव्हत्या. गणपतीचे दिवस असल्याने त्यांच्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक चालली होती. तेव्हा त्या कुटुंबातील व्यक्तीने मिरवणुकीतील काही व्यक्तींना सांगितले की, माझ्या मुलाचे निधन झाले आहे, त्यामुळे माझ्या घरासमोर डीजे वाजवू नका, पुढे जाऊन वाजवा असे त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी डीजे वाजवणे बंद केले. मात्र डीजे बंद करायला लावल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्यावेळी गणपती विसर्जन करून परत जाताना आरोपींनी सुनील शिंदे, आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला करुन गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नवी दिल्लीत एका मुस्लिम तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. गणपतीसमोरील प्रसाद खाल्ल्यामुळे त्याला मारहाण झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. ईशान्य दिल्लीमध्ये ही घटना घडली असून २६ वर्षीय इसार अहमद याच्यावर चोरीचा संशय घेण्यात आला होता. त्याला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेमागे कुठलंही धार्मिक कारण नसल्याचं म्हटलं आहे. ही घटना मंगळवारी घडली असून मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत अहमदला त्याचा शेजारी आमिरने रिक्षामधून घरी आणले होते.

'द प्रिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार अहमदचे वडील अब्दुल वाजिद यांनी सांगितलं की, मी संध्याकाळी घरी आल्यानंर अहमद वेदनेमुळे विव्हळत पडलेला होता. त्याच्या शरीरामधून रक्तस्त्राव होत होता. गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवलेला प्रसाद खाल्ल्यामुळे जमावाने मारल्याचं त्याने सांगितलं, असं वडिलांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अमहद याचा मृत्यू झाला. अहमद हा घरामध्ये एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आणि वृद्ध आई-वडील आहेत.

पोलिस उपायुक्त जॉय तिर्की म्हणाले की, इसारने त्याच्या वडिलांना सांगितलं होतं की, काही तरुणांनी त्याला मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुंदर नगर भागातील G4 ब्लॉकजवळ पकडले. त्याच्यावर चोरीला आळ घेऊन त्याला खांबाला बांधून मारले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. अहमदचे वडील फळविक्रेते आहेत. त्यांना अहमदने गणपतीसमोरील प्रसाद खाल्ल्याने मारहाण झाल्याचं सांगितलं. दुसरीकडे पहाटे घटना घडली आणि चोरीच्या संशयाने अहमदला मारहाण झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com