Top Post Ad

आरएसएसच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी तीन दिवस शाळांना सुट्टी


  पुण्यात १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत आरएसएसची राष्ट्रीय समन्वय बैठक होत आहे. या बैठकीसाठी अनेक सदस्य पुण्यात आले असून, त्यांची राहण्याची आणि बैठकीची सोय शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा आणि मूक बधीर शाळेत केली आहे.  या शाळा आणि महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांमध्ये सदस्यांची शाळा भरणार असल्याने या शाळा आणि एक महाविद्यालय बंद ठेवावे लागणार आहे. तेथे प्रत्यक्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्टी देऊन घरी राहण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.. त्याचप्रमाणे शैक्षणिक संकुलात फिरायला येणाऱ्या नागरिकांनाही पुढील तीन दिवस त्रासाचा सामना करावा लागू शकतो. एसपी कॉलेजच्या काही वर्गातील अध्यापन हे दुसरीकडे तात्पुरत्या स्वरुपात हलविण्यात येणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बैठकीसाठी पुणे शहरात विविध ठिकाणी मोकळी आणि सुसज्ज जागा उपलब्ध असताना, मध्यवर्ती शैक्षणिक संकुलात तेही शाळा आणि महाविद्यालयात बैठक घेण्याचे प्रयोजन काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

एकंदरीत मागील काही काळापासून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यापूर्वीही काही कॉलेजमध्ये; तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुद्धा कार्यक्रमात झाली आहेत. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थी आणि शिक्षणक्षेत्रामध्ये चुकीचा पायंडा पाडला जात आहे. मूळ शिक्षणाचा उद्देश सोडून आपण वेगळ्याच दिशेने जात आहोत. त्यामुळे युवक काँग्रेस म्हणून आमचा याला विरोध असणार आहे.
 - अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

शासकीय कार्यक्रम किंवा आपत्ती कालीन परिस्थीती शासकीय बैठका होत असेल, तर अडचण काहीच नाही.त्याला कोणी कसलाही विरोधही करू शकत नाही. मात्र, शाळा आणि महाविद्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी देऊन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत आरएसएस बैठक घेणार असतील, तर आमचा विरोध आहे.  आरएसएसने शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये धार्मिक धृविकरणाचे वातावरण आधीच तयार केले आहे. विशिष्ट कडव्या विचाराची पुरस्कृत असणार्‍या संघाच्या बैठकीला प्रशासन स्थान कसे देत ? हे कोणत्या नियमात बसते? या काळात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण ? याची उत्तरे मिळायला हवीत. - ॲड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँडस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com