बौद्ध समाजाचा जातीच्या दाखल्याचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी निघाला
सन 1990 च्या घटना दुरुस्ती नंतर तब्बल 25 वर्षांनी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टल ( ओनलाइन अर्ज प्रणाली ) मध्ये सुधारना करुन सर्व सेतु केंद्रांवर अंमलबजावणी करण्यात आली आहे
काय होती नेमकी समस्या.........
1)अनुसूचित जाती मधुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या व्यक्तीस बौद्ध धर्म स्विकारुन देखील हिंदु धर्माचा उल्लेख असलेले जातीचे प्रमाणपत्र घेण्याची नामुष्की होती
2) महाराष्ट्र शासनाने दिलेले जातीचे प्रमाणपत्र केंद्र सरकारच्या परिशिष्टाप्रमाणे नसल्याने केंद्र सरकारच्या नोकरी, शैक्षणिक इ. क्षेत्रात लागु होत नसे.
3) नवबौद्ध नावाचा धर्म अस्तित्वात नसताना जातीचे प्रमाणपत्र नवबौद्ध म्हणून दिले जात असे
4) अनुसूचित जातीच्या लोकांमधे बौद्ध धर्म लिहिल्यास सवलती मिळत नाहित असा गैरसमज प्रचारात होता. त्यामुळे बौद्ध धर्म लिहिणार्यांचे प्रमाण कमी होते
समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे अॉनलाइन प्रणाली मधे सुधारणा झाल्या मुळे वरीलप्रमाणे समस्या आता निकाली निघाल्या आहेत.
महाराष्ट्रातील एकूण 59 अनुसूचित जातिंचे लोक आता निर्धास्तपणे बौद्ध धर्म लिहून देखील अनुसूचित जातिचे प्रमाण-पत्र प्राप्त करु शकतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातिचे जे नागरिक, कर्मचारी, अधिकारी स्वतःला बौद्ध म्हणत असत परंतु तांत्रिक दृष्ट्या धर्म हिंदू लिहून जातिचे प्रमाण-पत्र घेण्यासाठी हतबल होते. आता जाहीरपणे '' धर्म बौद्ध '' लिहून देखील अनुसूचित जातिचे प्रमाण -पत्र प्राप्त करु शकतात.
तातडिने करुन घेण्यासाठी :-
आपल्याकडे असलेले, नवबौद्ध किंवा धर्मांतरित बौद्ध हे फक्त महाराष्ट्रातच चालणारे जुने जातिचे प्रमाण-पत्र बदलून केंद्र शासनाच्या सवलती करिता देखील चालणारे जातिचे प्रमाण-पत्र घेण्यासाठी आप आपल्या तालुक्यातील सेतु केंद्रांवर अर्ज करा !
वरील प्रश्नावर सतत पाठपुरावा करुन प्रश्न सोडविण्यासाठी अनेक ज्ञात /अज्ञात कार्यकर्ते झटत होते. या सर्व कामात मान. अच्युत भोईटे यांचे मोलाचे योगदान आहे तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी अॉफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) महाराष्ट्र राज्य कमिटी यांनी देखील महत्वाचा वाटा उचलला आहे. याशिवाय संस्थेच्या जिल्हा शाखांतर्फे व अन्य सामाजिक, राजकीय संघटना मार्फत समाज कल्याण विभाग यांच्या कडे पत्र व्यवहार व निवेदन देण्यात आले होते या सर्व मान्यवरांनी घेतलेल्या कष्टांसाठि सर्वांचे मनापासून आभार !
विशेष जाहिर आभार :-
अॅड. प्रकाश आंबेडकर: माजी खासदार ( प्रमुख : वंचित बहुजन आघाडी )
मा. राजकुमार बडोले साहेब (सा. न्याय मंत्री)
मा. दिनेश वाघमारे साहेब ( सचिव )
मा. दि. रा. डिंगळे साहेब ( सह सचिव )
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई.
उपरोक्त विषयावर काहि शंका, समस्या असल्यास संपर्क साधावा
आपला धम्म बांधव
तेजस कांबळे 9821171529
दि बुद्धिस्ट सोसायटी अॉफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा )
रजि. 3227 /55 , F - 982 मुंबई.
राज्य कमिटीतर्फे प्रसिद्धीसाठी...........
0 टिप्पण्या