Top Post Ad

लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे भाजपची नवनियुक्त कार्यकारीणी सज्ज


  2024 च्या लोकसभा निवडणुकीना डोळ्यासमोर ठेवून भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यानुसार ठाण्यातही  जिल्हाध्यक्ष पदी संजय वाघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भाजपच्या प्रदेश पातळीवरून आलेल्या आदेशानुसार वाघुले यांनी ९० जणांची कार्यकारणी मंगळवारी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ४ सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी मनोहर सुगदरे, सचिन दादू पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्षपदी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर, राजेश गाडे, सागर भदे, रमेश आंब्रे, महेश कदम, विद्या शिंदे, वर्षा वसंत पाटील, श्रुती महाजन, हर्षराज नारंग, चिटणीसपदी गौरव सिंह, राजेश सावंत, संतोष साळुंखे, विजय भोईर, किशोर गुणीजन, रामकिसन जैस्वार, तृप्ती जोशी-पाटील, श्रुतिका कोळी-मोरेकर, माधुरी मेटांगे, खजिनदारपदी सुदेश खारकर अशी नियुक्ती करण्यात आली आहे. 

ठाणे महिला मोर्चा अध्यक्ष पदी माजी नगरसेविका स्नेहा अंकुश पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी सुरज दळवी,  अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा यांना कायम ठेवण्यात आले आहे.  ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुरेश पाटील, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नताशा निशांत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी शरिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कायदा प्रकोष्टच्या संयोजकपदी ॲड. मकरंद अभ्यंकर, प्रज्ञा संयोजकपदी निखिलेश सोमण, उद्योग संयोजकपदी शिशिल जोग, व्यापारी संयोजकपदी मितेश शहा, शिक्षक संयोजकपदी संभाजी शेळके, मच्छिमार संयोजकपदी अमरिश ठाणेकर, अध्यात्मिक संयोजकपदी अश्विनी पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजकपदी अनिल भदे, भटके-विमुक्त संयोजकपदी गजानन आंधळे, आर्थिक प्रकोष्टपदी सीए विनोद टिकमानी, कामगार संयोजकपदी मधुसुदन देसाई, सहकार संयोजकपदी ॲड. अलकेश कदम, दिव्यांग संयोजकपदी आनंद बनकर, वैद्यकीय संयोजकपदी डॉ. अपर्णा ताजणे, सोशल मिडीया संयोजकपदी अलोक ओक, स्लम प्रकोष्टपदी कृष्णा भुजबळ, सांस्कृतिक संयोजकपदी देवराज साळवी, आयुष्मान भारत संयोजकपदी कैलास म्हात्रे, 

एक भारत श्रेष्ठ भारत संयोजकपदी राजेश जाधव, फ्रेंड्स ऑफ बीजेपी संयोजकपदी दत्तात्रेय घाडगे, साऊथ इंडियन प्रकोष्ट संयोजकपदी सुकुमार शेट्टी, उत्तर भारतीय संयोजकपदी राजकुमार यादव, गुजराती संयोजकपदी राकेश कतीरा, ट्रान्सपोर्ट संयोजकपदी वसंत कराड, राजस्थानी प्रकोष्टपदी महेंद्र जैन, जैन संयोजकपदी राकेश जैन, क्रीडा संयोजकपदी राजेंद्र मुणनकर व सहसंयोजकपदी डॉ. हेता हरेश ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर ४५ जणांची कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com