प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेमार्फत सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन वितरण, विक्री, साठवणूक व वापर बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार एकल वापर (सिंगल यूज) प्लासिटक वस्तू प्रतिबंधित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकल वापर प्लास्टिकबाबतची अंमलबजावणी होणेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी दिल्या असून सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकारपणे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागसमिती स्तरावरील सहाय्यक आयुकत, घनकचरा, शिक्षण, आरोग्य, अतिक्रमण व निष्कासन, उपआयुक्त मुख्यालय, सुरक्षा, संगणक, समाजविकास, स्थावर मालमत्ता व प्रदुषण नियंत्रण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले.
सिंगल यूज प्लॅस्टिकच्या अंमलबजावणीसाठी व्यापक प्रमाणात महापालिका मुख्यालय तसेच प्रभागामध्ये जनजागृती करणे, प्रभाग कार्यालयात बॅनर, बोर्ड लावणे, प्रभाग कार्यालयामध्ये आत येणाऱ्यांना प्लास्टिक पिशवीबाबत मज्जाव करणे, प्रभागामधील उपक्रमांमध्ये प्लास्टिक बॉटल्सचा वापर टाळणे, त्यासाठी पाण्याचा जार व कागदी कप, प्लॅास्टिक वेस्टनची बुके वापर बंद करणे तसेच प्रभाग समितीच्या अखत्यारितील मंगल कार्यालयामध्येही सिंगल यूज प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाने दर मंगळवार व गुरूवार सर्व प्रभागांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत दुकान, हातगाड्यांवर सिंगल यूज प्लास्टिकबंदीबाबत करवाई करणे, कापडी पिशवी खरेदीबाबत कार्यवाही करणे व मार्केटमध्ये त्याचे परिचलन करणेसाठी योजना आखणे. शिक्षण विभागाने महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणे, तसेच शाळांमध्ये शपथ घेणे, रॅली काढणे. विद्यार्थ्यांना घरातले प्लास्टिक जमा करुन आणावयास सांगणे व Eco bricks आदी तयार करणे. तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत निबंध, पेंटीग, टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धो घेण तसेच कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना ही या बैठकीत देण्यात आल्या. समाज विकास विभागाने महिला बचत गटामार्फत कापडी पिशवी तयार करुन विक्रीसाठी मार्केट परिसरात स्टॉल लावणे, संबंधित विभागाने झोपडपट्टीमधून कापड गोळा करणे व कापडी पिशव्या तयार करुन त्याबाबत योजना सादर कराव्यात असेही या बैठकीत नमूद करण्यात आले.
आरोग्य व अतिक्रमण विभागाने रहिवासी, व्यापारी संकुलांमध्ये शाळा, झोपडपट्टी येथे सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत पत्रक चिटकविणे, तसेच मटण, मासे, चिकन, हातगाडी, दुकानांवर प्लास्टिक आढळल्यास कारवाई करणे. प्रदुष्ण नियंत्रण विभागाने महापालिका कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात दंडाची कारवाई करणे, जप्त केलेले प्लास्टिक एन.जी.ओ च्या ताब्यात देणे. मॉल, मार्केटमध्ये बॅनर अथवा माहितीपत्रक अथवा स्टॅण्डीज उभारणे, (CSR Initiativeद्वारे) नागरिकांमध्ये जनजागृती करणे, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण माडळाच्या आदेशानुसार दर महिन्याला प्रदुषण नियंत्रण मंडळासोबत सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करणे व सर्व माहिती संकलीत करुन डेटाबेस तयार करुन केलेल्या कारवाईचा मासिक अहवाल तयार करावा अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या कार्यालयामध्ये विविध समारंभामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंद केले जाते व पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यात येतात तेथे भाडे कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे. संगणक विभागाने सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत सोशल मिडीया, फेसबुक, ट्टिटरवरुन प्रसिध्दी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त श्री. प्रशांत रोडे यांनी दिल्या.
- काय वापरु नये
- *सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल)
- *मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे
- *प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिक काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या
- *आईस्क्रीम कांड्या
- *प्लेटस्, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या
- *100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी
- याचबरोबर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत खालील गोष्टी प्रतिबंधित आहेत.
- *कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून)
- *सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स, नॉन वोवन बॅग्स सह) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या
- *डिश, बाऊल, कॅन्टेनर (डबे)
0 टिप्पण्या