Top Post Ad

संविधान आणि लोकशाही मूल्य... ठाण्यात चर्चासत्राचे आयोजन


   काही सामाजिक संघटना एकत्र येऊन 2024 लोकसभेचा निवडणुकी लक्षी संविधान आणि लोकशाही मूल्यांचा प्रचाराचा कार्यक्रमाबाबत सकल भारतीय समाजाच्या वतीने ठाण्यात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सम विचारसरणीच्या सामाजिक आणि राजकीय संघटना व व्यक्ती यांच्याशी संपर्क व समन्वय साधने. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावांची यादी तयार करणे. वस्ती मध्ये कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे यावर चर्चा करणे तसेच या सर्वा कार्यक्रमासाठी लागणारा खर्चाचा आराखडा तयार करण्यासाठी हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असल्याचे  सकल भारतीय समाजचे समन्वयक शाम गायकवाड यांनी म्हटले आहे.  

29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते पाच यावेळेत आर पी मंगला हायस्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, ठाणे रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे पूर्व या ठिकाणी होणाऱ्या या चर्चासत्रात सर्व संस्था संघटनांनी अधिकाधिक संख्येने भाग घ्यावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.  या चर्चासत्रात आयु. शामदादा गायकवाड, Dr. राम पुण्यानी, कॉम. चारुल जोशी, स्वामी वेदात्मवेश, आयु. किशोर केदारे, आयु. शाकीर शेख, कॉम. नसरुल्ला, आयु. संदेश गायकवाड, श्रीमती वंदना सोनारकर, आयु. बाबा रामटेके, आयु. मिलिंद गायकवाड, कॉम. देवचंद रणदिवे, श्रीमती निरंजनी शेट्टी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. 

2024 च्या निर्णायक लोकसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. मणिपूर हरियाणा असे ठिकाणाहून जाती व धर्माच्या नावाने दंगलीच्या बातम्या येत आहेत. सत्ताधारी पक्ष लोकांच्या अपेक्षेला खरं उतरण्यास अपयशी ठरला आहे. सत्ताधारी पक्ष तरुणांना नोकरी, समाजाला आर्थिक सुबद्धता देऊ शकले नाही. हे लपवण्यासाठी तसेच बहुसंख्य समाजाला दिशाभूल करण्यासाठी त्यांच्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे जाती धर्मात तेढ निर्माण करणे त्याच्या पलीकडे काहीच नाही. आज धर्म व प्रसारमाध्यमे या दोघांचेही व्यापारीकरण झाले आहे. ते सत्ताधाऱ्यांच्या दलाली मध्ये मग्न आहेत. ह्या सत्तेचा फायदा हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कॉर्पोरेट कुटुंबांना मिळत आहे. कॉर्पोरेटचा अमाप पैशाच्या जोरावर व ED CBI चा मार्फत हल्ले करून विरोधी पक्षाला हताश करत आहेत. विरोधी पक्षाला आपला आवाज लोकांपर्यंत पोचवायचे कसे हा प्रश्न पडलाय. आजची गरज पाहता आम्ही नागरिक व काही सामाजिक संघटना एकत्र येऊन 2024 लोकसभेचा निवडणुकी लक्षी संविधान आणि लोकशाही मूल्यांचा प्रचाराचा कार्यक्रम घ्यायचे ठरविले असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.


अधिक माहितीकरिता

बाबा रामटेके - 80975 40506

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com