Top Post Ad

“चला साजरा करूया वनमहोत्सव”

 जागतिक तापमान वाढीमुळे बदलते हवामान, बदलता पाऊस आणि बदलते तापमान यातून दुष्काळ, महापूर सारख्या नैसर्गिक आपत्तींचे संकट बळावत आहे. यामुळे आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशीच परिस्थिती पुढे कायम राहिली तर  भविष्यात यापेक्षाही गंभिर परिणांचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे.  वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रशासना मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

कोकणाला दरवर्षी वेगवेगळया नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. यावर्षी कोकणात झालेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्त्वामुळे प्रशासकीय यंत्रणांना आलेल्या संकटांचा हिंमतीने सामना करता आला.  

कोकणातील वाढते औद्योगिकरण, पेट्रोल डिझेलच्या वाहनांचा वाढता वापर यामुळे प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन
डायऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक आहे.  मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुस-या बाजूला औद्योगिकीरकण, विकास आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत.  ‘जागतिक हवामान बदलावर मात करण्यासाठीच्या अनेक उपायांपैकी एक वृक्ष लागवड उपक्रम आहे. जागतिक हवामान बदलावर उपाय म्हणून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागात वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोकणात 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन माहेत्सव साजरा करण्यात येत आहे.  महसूल आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा वनमहोत्सव साजरा करण्यात येत आहे.

कोकण विभागातील सामाजिक वनीकरण वृत्त ठाणे यांच्या अंतर्गत येणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग तसेच तालुकास्तरावरील वनपरिक्षेत्र कार्यालयांमार्फत वनमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वन महोत्सावात सवलतीच्या व नियमित दराने उत्तम प्रतीची रोपे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या मध्ये 9 महिन्याचे अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत 31 रुपयात मिळते ते रोप या वन महोत्सवा दरम्यान 20 रुपयात उपलब्ध आहे. ब दर्जाचे 25 रुपयात मिळणारे रोप 12 रुपयात, क दर्जाचे 23 रुपयात मिळणारे रोप 10 रुपयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे 18 महिन्याचे अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत 79 रुपयात मिळते ते रोप 50 रुपयात, ब दर्जाचे 63 रुपयात मिळणारे रोप 30 रुपयात,  क दर्जाचे 57 रुपयात मिळणारे रोप 25 रुपयात उपलब्ध आहे. तसेच 18 महिन्यांवरील  अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत 135 रुपयात मिळते ते रोप 65 रुपयात, ब दर्जाचे 103 रुपयात मिळणारे रोप 50 रुपयात,  क दर्जाचे 92 रुपयात मिळणारे रोप 40 रुपयात उपलब्ध आहे. या वर्षी रोपे निर्मितीवेळी, बियाणांचा स्त्रोत, बियाणांची प्रतवारी व उपचार, रोपांची सुदृढता या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दऊन कृषि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही रोपे तयार करण्यात आली आहेत.

वृक्षलागवडीसाठी इच्छूकांनी पुढील रोपवाटीकांना संपर्क साधावा. कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्हयातील बदलापूर तालुक्यातील गुरवली पाडा, टिटवाळा नदीच्या मागे टिटवाळा संपर्क क्रमांक 8983822326, भिवंडी तालुक्यातील कासणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका- 7875499176/9867711419, मुरबाड तालुक्यातील शासकीय रोपवाटिका कुडवली – 9373145402, भुवन रापवाटिका- 8888163644, खेवारे रापवाटिका, वाडा तालुक्यातील नेहरोली कोळकेवाडी येथील गातेस रोपवाटिका- 9273174651, शहापूर तालुक्यातील शासकीय रोपवाटिका- 7507299303, मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी येथील रोपवाटिका 9834992394, पालघर येथील टेन रोपवाटिका- 996077508, ठाणे शिळफाटा येथील शिळ रोपवाटिका- 9960775080. रायगड जिल्हयातील पेण येथील रामवाडी रोपवाटिका-9922716474, कर्जत लाडीवली रोपवाटिका-9765900177, सुधागड  बलाप रोपवाटिका-9763471422, माणगाव पहेल रोपवाटिका- 8291034135, रोहा डोलवहाल रोपवाटिका-9273632450, म्हसाळ सरवर रोपवाटिका-9834467688, मुरुड वावडुंगी रोपवाटिका- 7709730100, अलिबाग तिनवीरा रोपवाटिका- 9226183115. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दहागाव रोपवाटिका-7498857360, चिपळुण पिंपळी रोपवाटिका-96045669590, गुहागर झोंबडी रोपवाटिका-9022609384, देवरुख पूर रोपवाटिका, खानु रापवाटिका-9763675188, लांजा गावणे रोपवाटिका-9975837584 या रोपवाटिकांमध्ये शासकीय सवलतीच्या नियमित दरात वृक्षलागवडीसाठी रोपे उपलब्ध आहेत. सध्या पावसाचा जोर थांबला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी हे वातावरण पोषक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.


वन महोत्सव उपक्रमांतर्गत कोकण विभागातील शहरी भागात अमृतवन, पंचायतनवन, बेलवन निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. अमृतवन योजनेसाठी  1 ते 5 हेक्टर क्षेत्रात वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. या योजनेत दशमुळ वनस्पती, दुर्मिळ प्रजाती, मेडसिंगी, अंतल, हिरडा, बेहडा, सिता, अशोक, चारोळी, अर्जून, पांढरी, सांवरकांकम, रिठा, नागकेशर अशा रोपांचा समावेश आहे. वनमहोत्सवादरम्यान आत्तापर्यंत या योजनेंतर्गत ठाणे जिल्हयात 2 हेक्टर क्षेत्रात 800 रोपांची लागवड करण्यात आली आहे. पुढील कालावधीत ही संख्या अजून वाढणार आहे.

बेलवननिर्मिती या योजनेंतर्गत धार्मिक ठिकाणी 1 ते 2.05 एकर जागेत बेल, सिता, अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, परिजात, पांढरा चाफा, पांढरी कन्हेरी, पांढरा धोत्रा व स्वास्तिक यासारख्या धार्मिक कार्यात उपयोगी पडणाऱ्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. वनमहोत्सवादरम्यान आत्तापर्यंत या योजनेंतर्गत ठाणे जिल्हयात 1 हेक्टर क्षेत्रात 400, रत्नागिरी जिल्हयात 0.80 हेक्टर क्षेत्रात 320, सिंधूदुर्ग जिल्हयात 0.80 हेक्टर क्षेत्रात 320  रोपांची लागवड करण्यात आली आहे. पुढील कालावधीत ही संख्या अजून वाढणार आहे.

पंचायतनवन निर्मिती योजनेंतर्गत गावामधील गावालगत मध्यवर्ती ठिकाणी तसेच निसर्ग पर्यटनस्थळ या ठिकाणी 0.5 ते 1 हेक्टर क्षेत्रात वड, उंबर, पिंपळ, बेल, कडूलिंब अशा मुबलक प्रमाणात ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. वनमहोत्सवा दरम्यान आत्तापर्यंत या योजनेंतर्गत ठाणे जिल्हयात 2.4 हेक्टर क्षेत्रात 240, रायगड जिल्हयात 0.8 हेक्टर क्षेत्रात 80, रत्नागिरी जिल्हयात 4.90 हेक्टर क्षेत्रात 490, सिंधूदुर्ग जिल्हयात 9.4 हेक्टर क्षेत्रात 940  रोपांची लागवड करण्यात आली आहे. पुढील कालावधीत ही संख्या अजून वाढणार आहे.

कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी वनमहोत्सवादरम्यान मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे सर्व शासकीय यंत्रणांना आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, या भावनेतून वृक्ष लागवड करावे. भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे.

-----------

प्रविण डोंगरदिवे

         विभागीय माहिती कार्यालय

          कोकण विभाग, नवी मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com