Top Post Ad

कबुतरं चोरल्याचा कांगावा करून लहान मुलांना झाडाला लटकावून अमानुष मारहाण

 


संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना, अहमदनगर मध्ये श्रीरामपूर तालुक्यात घडली या घटनेचा राज्यात सर्वत्र जाहीर निषेध करण्यात येत आहे. कबुतरं चोरल्याच्या कांगावा करून जाणिवपूर्वक हरेगाव, तालुका श्रीरामपूर.जिल्हा अहमदनगरमध्ये 3 लहान बहुजन दलित मुलांना झाडाला लटकावून अमानुष मारहाण केली असल्याचा आरोप आता महाराष्ट्रातील जनता करीत आहे. इतकेच नव्हे तर घरातुन बाहेर नेऊन एकाच्या अंगावर लघुशंका केली, त्याला थुंकी चाटायला लावली,कपडे काढून झाडाला लटकावून बेदम मारहाण केली, वरून बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी आरोपीनी या लहानग्या मुलांना दिली.   

कबुतरे चोरल्याच्या कांगावा करून ज्यांनी  कायदा हातात घेऊन हरेगाव मधील दलित  मुलांना अमानुष मारहाण केली.त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वतिने करण्यात आली आहे.   मानवतेला काळीमा फासणारी असून सर्व आरोपीना तात्काळ अटक करा, त्या सर्वांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, कायदा सुव्यवस्था जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर तात्काळ या  जातीयवादी गावगुंडांना अटक करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी  मागणी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखा यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे   

बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखा जिल्हा अध्यक्ष डॉ अरुण चक्रणारायण, जिल्हा कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे, यंशवत इंगोले, जिल्हा सचिव एम.एम.तायडे सर पर्यटन विभाग प्रमुख नंदरत्न खंडारे, जिल्हा सदस्य मधुकर सिरसाठ,  युवा कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.    


अशा प्रकारे माणुसकीला काळीमा फासणारे जातीयवादी गावगुंडावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन (खरात) पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात आले आहे. यावेळी निवेदनात म्हटले आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरीही येथील दलित समाज स्वातंत्र्यपणे जीवन जगू शकत नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीवादी गावगुंडांकडून होणारे अन्यया अत्याचार थांबलेले नाहीत ही घटना अतिशय लाजवणारी आहे महाराष्ट्रामध्ये जातीवाद्यांकडून आजही सामाजिक असुरक्षितता आहे तर मग सरकार काय करते. कठोर कारवाई का करत नाही? 

भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलितांवर होणाऱ्या  अन्यायअत्याचारात मोठी वाढ झाली आहे  यातील मुख्य आरोपी गलांडे यांच्यासह इतर आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख विश्वंभर वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ओव्हाळ, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव वाघमारे, ज्येष्ठ नेते निवृत्ती हौसलमल, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष संपत सरवदे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मस्के,आदींनी यावेळी निवेदनावर सह्या केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com