मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाचा कारभार धर्मादाय आयुक्त, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाचे अधिकारी करीत नाहीत. कोणत्यातरी व्यक्तीच्या धमकीने व दहशतीखाली कामकाज करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयात होत असलेल्या अनागोंदी कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. संस्थेच्या अंतर्गत हेवेदाव्याचा फायदा घेत महाविद्यालयात प्रशासकीय कारभार लागू करण्याचा विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा मनसुबा असून तो आम्ही हानून पाडल्याशिवाय राहणार नाही असे जाहीर आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने केले.
आज मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांना परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाने सिद्धार्थ महाविद्यालयात चालवलेला गैरकारभाराबाबत माहीती दिली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, तसेच मुंबई प्रदेश सरचिटणीस प्रशांत मोरे, मुंबई संघटक अरुण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठ प्रशासनाने चालवलेल्या या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यापीठाने त्यांचे प्राधिकृत रद्द करावे. यासंदर्भात मा. कुलगुरुंनी स्वतः लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढवा अन्यथा दि. ६ सप्टेंबर २०२३ पासून मरेपर्यंत आमरण उपोषण करण्यात येईल असेही परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
महाविद्यालयात होत असलेल्या गैरकारभाराचा पाढाच यावेळी प्रशांत मोरे यांनी वाचला, विद्यापीठाने प्राधिकृत केलेल्या जयश्री अय्यर यांनी कोणतीही परवानगी न घेता विद्यापीठाच्या नावाने एच.डी.एफ.सी बँकेत खाते उघडले. यासंदर्भात तक्रार करून देखील कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. सन २०१० पासून २०२२ पर्यंत जयश्री अय्यर यांनी ऑडीट रिपोर्ट न दिल्यामुळे संस्थेला १ कोटी ४० लाख रुपये दंड आकारण्यात आला. या कारणामुळे जयश्री अय्यर यांना १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संस्थेने निलंबित केले व बँकचे सर्व खाते सील करण्यात आले. यासंदर्भात त्या उच्च न्यायालयात गेल्या असता त्यांच्या निलंबनाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही. तरीही त्यानंतर देखील विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अॅप्रुव्हल रद्द केले नाही.
तसेच उपकुलसचिव यांनी पैशाची मागणी करून ७ दिवस जेलमध्ये असणाऱ्या आरती वानखेडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महाड या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य म्हणून प्राधिकृत केले. यासंदर्भात सर्वस्वी जबाबदारी घेऊन उपकुलसचिवांनी राजीनामा द्यावा. सिध्दार्थं विधी महाविद्यालय, फोर्ट येथे डॉ. सुधाकर रेड्डी यांना मुंबई विद्यापीठाच्या ट्रायब्युनल तसेच मा.उच्च न्यायालयाचे आदेशाला केराची टोपली दाखवून आर्थिक भ्रष्टाचार करून कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांनी ग्रंथपाल संध्या डोके यांना प्रभारी प्राचार्य करून महाविद्यालयाचे नावलौकिक धुळीस मिळविण्याचा घाट घातलेला आहे.
सिध्दार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सुनतकरी यांनी प्राध्यापकांचे प्रमोशन थांबवून मागासवर्गीय प्राध्यापकांवर अन्याय केला आहे व मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी व आर्थिक भ्रष्टाचार करून स्वतःचे प्रोफेसरशीप करून घेतले आहे. तसेच त्यांनी स्वतःच्या सासऱ्याला महाविद्यालयातील ७ खोल्या बहाल केल्या आहेत. इतकेच नव्हे तर या खोल्यांवर आधार कार्डसह अनेक दाखले देखील वैयक्तीक रित्या काढण्यात आले आहेत. महाविद्यालयातील खोल्यांवर अशा तऱ्हेने वैयक्तीक दाखले काढण्यात आले असल्याची बाब देखील विद्यापीठाच्या निदर्शनास आणण्यात आली असल्याची माहिती प्रशांत मोरे यांनी दिली. विद्यापीठ अधिकाऱ्यांनी महाविद्यालयातील कारभारात आपला हस्तक्षेप थांबवला नाही तर ६ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही असे प्रशांत मोेरे म्हणाले.
यावेळी आगामी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीसाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषदेच्या वतीने उमेदवार उभे करण्याचा ठराव रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषदेच्या केंद्रीय बैठकित एकमताने पास करण्यात आला. असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिली. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषदेच्यावतीने (१) अॅड. सुशील सुरेश महाडिक (एस.सी. प्रवर्ग) २) अॅड. संदीप प्रकाश केदारे (खुला प्रवर्ग) या उमेदवारांना निवडणूकिच्या रिंगणात उतरवण्याचा मानस आहे मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हिताचे कार्य करण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी केले आहे. तसेच विद्यापीठाने निवडणुकाबाबत राजकारण करू नये. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी निवडणुकांबाबत आम्ही आग्रही असून जर निवडणुका वेळेवर झाल्या नाही तर विद्यापीठ प्रशासनाला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असेही कांबळे म्हणाले.
0 टिप्पण्या