Top Post Ad

15 कोटीचा निधी मंजूर... तरीही ठामपाच्या फक्त पाच शाळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण


  ठाणे महानगरपालिकेच्या शाळा भौतिकदृष्ट्या सुस्थितीत असाव्यात, शाळांमध्ये गळती नसावी, शौचालय सुस्थितीत असावेत तसेच रंगरंगोटीसहीत शाळेतील परिसर देखील सर्व नीटनेटका असावा यासाठी शाळांच्या दुरूस्तींची कामे हाती घेण्यात आली.. याकरिता इमारत दुरूस्ती अंतर्गत 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.  शाळा दुरूस्तीच्या कामाचा कार्यादेश निघाल्यानंतर  इमारतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.  सदर कामे गुणवत्तेने होणे तर आवश्यक आहेच त्याचवेळी ही कामे कालमर्यादेमध्ये पूर्ण होणेही गरजेचे आहे, मात्र  शाळांच्या दुरूस्तीचा कार्यादेश मार्च 2023 मध्ये देण्यात येऊनही दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने संबंधित कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे आयुक्त अभिजित  बांगर यांनी नमूद केले. तसेच  याबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशा सूचनाही कार्यकारी अभियंत्यांना दिल्या असल्याचे आयुक्तानी नमूद केले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे अशा एकूण 34 शाळा दुरूस्तीच्या कामांची रक्कम रु 14,99,95,000/- असून एकत्रित निविदा सन 2022-23 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली होती.  तसेच त्यासाठीचा कार्यादेशही 08 मार्च 2023 रोजी देण्यात आला. या निविदेमध्ये प्रत्येक प्रभाग समिती हद्दीतील शाळांच्या दुरूस्तीचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यापैकी फक्त 5 शाळांच्या दुरूस्तीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर 9 शाळांच्या दुरूस्तीचे काम 50 टक्क्यापेक्षा जास्त झाले असून ती कामे प्रगतीपथावर आहे. मात्र 8 शाळांच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असून सदरची कामे अत्यंत असमाधानकारक आहेत. तर 12 शाळांच्या दुरूस्तीच्या कामाची सुरूवात झालेली नाही.

         वागळे विभागातील ठामपा शाळा क्र. 23 चे 40 टक्के, कळवा विभागातील शाळा क्र. 129, 69, 70, 115, 29 या शाळांचे 30 टक्के, माजिवडा मानपाडा शाळा क्र. 53, 54 व लोकमान्य सावरकनगर विभागातील शाळा 46 चे 25 टक्के, वर्तकनगर विभागातील शाळा क्र. 65 व मुंब्रा विभागातील शाळा क्र.  75, 118 चे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे.          कळवा विभागातील शाळा क्र. 4,6,72,68, माजिवडा मानपाडा विभागातील शाळा क्र. 59,52,128, मुंब्रा विभागातील शाळा क्र. 78,123,113,77,124,116, दिवा विभागातील शाळा क्र. 85,90,91 तर नौपाडा विभागातील शाळा क्र.16 या शाळांच्या कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. या शाळांच्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असून अपूर्ण असलेल्या कामांबाबतचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com