Top Post Ad

"सुर आणि स्वर"ने दिली लहानग्या कलाकारांसोबत त्यांच्या पालकांनाही कला दाखवण्याची संधी

 


  पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत, म्युझिकल मास्टर पीस  हिंदी, इंग्रजी चित्रपटगीते, लोकगीते  आणि  आणि इतर रॅप सॉग्स अशा अनेकांगी नटलेला "सुर आणि स्वर"चा नवा प्रयोग ठाण्यात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमात छोट्या दोस्तांसह पालकवर्गानेही सहभाग या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे आपली कला दाखवली. याला उपस्थित प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

सुर आणि स्वर कार्यक्रमाच्या 1 जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये वार्षिक शोच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना राबवण्यात आली. या संकल्पनेने उपस्थितांना आश्चर्याचा प्रचंड धक्काच बसला. सामान्यत: मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये नेहमीच लहान मुलांद्वारे स्टेजवर वेगवेगळे प्रयोग सादर केले जातात. लहान मुले आपली कला दाखवत असतात त्याचा आनंद पालकवर्ग खाली प्रेक्षकांमध्ये बसून घेतात. मात्र अशा वेळी अनेक पालक आपल्या लहानपणात हरवत असतात. लहानपणी अशी संधी उपलब्ध झाली नाही त्यांना स्टेजवर आपली कला दाखवण्याची संधी या वेळी देण्यात आली. विजय मयेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  विजय मयेकर यांनी  या पालकवर्गाला  गिटार आणि इलेक्ट्रिक की-बोर्डवर संगीताचा कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रित केले. हेच या शोचे मोठे सौंदर्यपूर्ण वैशिष्ट्य ठरले. सदोदित नोकरी आणि आपल्या व्यवसायात गुंतून असणाऱ्या या पालकवर्गाने या शोमध्ये दिलेल्या प्रतिसाद अप्रतिमरित्या पहायला मिळाला. 

आपल्या संगीत अध्यापनाच्या कारकिर्दीत ही पहिलीच वेळ आहे की पालक आणि कष्टकरी लोक इतक्या संयमाने, समर्पणाने आणि उत्साहाने संगीत नोटेशन्स शिकत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील जसे की अॅनेक्सियातील डॉक्टर, पशु आणि प्राण्यांचे डॉक्टरच नव्हे तर नेत्ररोगतज्ज्ञ, अभियंते,  तंत्रज्ञ आणि कॉर्पोरेट बहुराष्ट्रीय फर्ममध्ये व्यवस्थापक आहेत. म्हणूनच हा कार्यक्रम त्यांच्या कलेला समर्पित करण्यात आला.  हा पालक वर्ग त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून या मंचावर येऊन आपली कला दाखवू लागला ही मोठी उपलब्धी असल्याचे मत विजय मानकर यांनी व्यक्त केले. 

सुर आणि स्वर या कार्यक्रमाची स्थापना २००५ मध्ये केली. या माध्यमातून प्रत्येक वर्षी एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये सर्व विद्यार्थी त्यांचे संगीत कौशल्य दाखवतात. ठाण्यातील मोठ्या सुप्रसिद्ध सभागृहात व्यावसायिकांप्रमाणे थेट सादरीकरण करणे हा विद्यार्थ्यांसाठी एक मोठा मैलाचा दगड ठरतो.  हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना संगीत वाजवण्याच्या आपल्या कलेला अधिक प्रगल्भ करतो. तसेच प्रेक्षकांसमोर आपली कला अधिक आत्मविश्वासाने सादर करण्याची प्रेरणा देतो. यामुळे अनेक विद्यार्थी व्यावसायिकरित्या स्थिर झाले आहेत. तर काहींचा संयुक्त म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ देखील आहे, काहींनी शॉर्ट्स डॉक्युमेंट्री आणि टीव्ही मालिकांसाठी  रेकॉर्डिंग, पार्श्वसंगीत देखील दिले आहे. इतकेच नव्हे तर काहींनी स्वतःचा रॉक म्युझिकल बँड देखील तयार केला आहे. या कार्याचे श्रेय नक्कीच विजय मयेकर यांना जाते. अशाच एका कार्यक्रमातून त्यांनी नवीन प्रयोग केला. ज्यातून त्यांनी पालक वर्गालाच स्टेजवर आणण्याचे धाडस केले. या प्रयोगाचेही अनेक स्तरावरून प्रचंड स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com