Top Post Ad

माझ्या मराठा ज्ञाती बांधवांना न्याय मिळवुन द्या....

अस्पृश्यना मंदिरात प्रवेश नव्हता हे आपणास माहीत आहे. पण 100 वर्षा पूर्वी मराठयांना सुद्धा पंढरपुराच्या मंदिरात प्रवेश नव्हता  हे खालील पोस्ट मध्ये पुराव्यासह वाचा व आपल्या  सर्व  मित्रास जरूर फॉरवर्ड करा. अश्पृश्य म्हणजे शुद्र नव्हे तर महाराष्ट्रात मराठे हे शुद्र होत आणि अश्पृश्य हे अतिशूद्र होत हे खालील लेखा तुन समजन्यास मदत होईल. मराठा बांधवांना ब्राम्हणांनी मंदिरात प्रवेश नाकारला होता कारण मराठा पण शुद्रच आहेत !!!...... 

......१६ सप्टेंबर १९२० पंढरपूरच्या पांडूरंगाच्या मंदीरात सात मराठा ज्ञाती बांधवांनी  प्रवेश केला होता. शूद्रांनी देव बाटवला म्हणुन मंदीराचे बडवे म्हणजे पुरोहितांनी मंदीराची दारे - खिडक्या बंद केल्या आणि त्या सात मराठा ज्ञाती बांधवांना  एवढी अमानुष  मारहाण केली की, त्यातील ३ जन बेशुध्द पडले. ही बातमी जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कळली तेव्हा ते ज्ञानार्जनासाठी विलायते मध्ये होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत विचलीत झाले."मी विदेशात आहे माझ्या बांधवांवर  झालेल्या अन्याया विरुध्द मी काहीच करु शकत नाही." काही वेळ चिंतन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तडक एक पत्र "मुकनायक" च्या संपादकांना लिहले. (मुकनायक हे वृत्तपत्र भारतातील तमाम शोषीत पिडीत शुद्र अतीशुद्र समाजाची वेदना वेशीवर टांगण्यासाठी ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेले वर्तमान पत्र.) या पत्रात ते लिहतात......

.......१६ सप्टेंबर १९२० पंढरपूर च्या पांडूरंगाच्या मंदीरात माझ्या सात  मराठा ज्ञाती बांधवांवर  जो अमानुष अत्याचार झाला तो एकाही ब्राम्हण पत्रकाराने आपल्या पत्रकात छापला नाही.तुम्ही या अत्याचाराची बातमी आपल्या मुकनायक च्या पहिल्या पानावर छापा आणि माझ्या मराठा ज्ञाती बांधवांना न्याय मिळवुन द्या."......

......हे पत्र जेव्हा मुंबईत मुकनायकच्या संपादकांना मिळत तेंव्हा ही बातमी ते २३ ऑक्टोबर १९२० च्या "मुकनायक"च्या पहिल्या पानावर छापतात. आणि या बातमीमुळे मराठी मुलखासह संपूर्ण देशात वैदिक व्यवस्था संकल्पित हिंदू धर्मातील जातीय मानसिकते विरुध्द संतापाची लाट उसळते......

( संदर्भः इतिहासातील निवडक गांधीगिरी  - पान क्र.१३, १४ लेखक प्रा. सूरेश ब्राम्हणे )

......आज पासून सूमारे 98  वर्षापूर्वी मराठा समाजाला माझे मराठी ज्ञाती बांधव असे आत्मियतेने उल्लेखणारा व त्यांना विदेशात असताना ही न्याय मिळवुन देणारा जात, धर्म, प्रांत, लिंग या पलीकडील तथागत बुध्दाची मानवता व मानवी मुल्ये या द्वारे भारतातील प्रत्येक उपेक्षित शोषित समाज घटकास न्याय मिळवुन देण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण कारणी लावणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उर्फ भिमराव रामजी आंबेडकर हे महामानव माझ्या भारत देशाच्या वैदिक व्यवस्था निर्मित स्वयंम संकल्पीत जातीय अहंकार असलेल्या बहुसंख्य समाजास न कळल्याने आज ही पूण्यातील खोलेबाईं सारखी जातीय मानसिकता समाजात अधुनमधुन विष पेरण्याच काम करते हिच खरी शोकांतिका आहे.असो..... परंतु,

.........पंढरपूरच्या पांडूरंगाच्या मंदीरात घडलेल्या या जातीय अन्यायाला आज 98  वर्ष होत आहेत. किमान या दिवसा पासून तरी या देशातील तमाम जनता जातीयतेच्या अहंकाराचा खोटा मुखवटा बाजुला सारुन 'माणसातील माणूस शोधण्याची व त्याच्या मानवीय मुल्यांना न्याय मिळवुन देण्याची *फुले- शाहू - आंबेडकर* यांची मानवी मुल्य आत्मसात करण्यास कटिबध्द होतील हिच अपेक्षा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com