Top Post Ad

कलम १५३ अंतर्गत भिडेंना अटक करा...आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी


गुरुवारी सायंकाळी अमरावती शहरातील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे संभाजी भिडे यांनी जाहीर सभेत राष्ट्रपिता व अहिंसेचे पुजारी म्हणून परिचित महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करीत त्यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले.  महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावरून शुक्रवारी विधानसभेत विरोधी पक्ष आक्रमक झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून सातत्याने समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर ते बाहेर कसे फिरू शकतात. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत भिडेंना अटक केली पाहिजे,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी.”

भिडेंनी आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण त्यांच्यावर कधीच कोणती कारवाई होत नाही. संभाजी भिडे नावाचे महाशय शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला आले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली, इतकेच नव्हे तर भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्‍तव्‍य केले.  संभाजी भिडे कायम वाट्टेल ते बरळतात, इतिहासाची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, त्यांना पूर्णपणे मुभा देते. संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी. भिडेंची समाजप्रबोधन करण्याची पात्रता नाही. भिडेंची जागा कारागृहात आहे. दंगली पेटविण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या भिडेंवर कठोर कारवाई करण्यात यावी. परंतु राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, याचा अर्थ काय?  संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण? आणि त्यांना अभय कुणाचे?   यापुढे जर संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना त्याच पद्धतीने प्रत्‍युत्तर देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. -आमदार ॲड. यशोमती ठाकूर 

आंबे खाऊन मुले होतात,  संतापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे,  हातात तलवारी घ्याव्या लागतील., इंग्रजी शिकणे मूर्खपणा आहे. म्लेंच्छ(संस्कृत भाषा न येणारे)मारले पाहिजेत.. लेंडकांनो,...काकडा लावावा लागेल.. शिकून माणूस गांडु होतो. आरक्षण आणि शेतीमालाला हमी भाव मागणे म्हणजे देशप्रेम नव्हे. .महात्मा फुले देशद्रोही होते.  जपान मनुस्मृतीनुसार चालतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचे समर्थक होते. बुद्ध कामाचा नाही. अशी देशविरोधी वक्तव्ये करून समाजासमाजात तेढ निर्माण  करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची विणापरवानगी सभा आयोजित केल्याप्रकरणी संबंधित आयोजकाविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने देखील पोलिस प्रशासनाकडे केली आहे.


महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितल्या जाते, परंतु करमचंद गांधी हे मोहनदासचे खरे बाप (वडील) नसून मोहनदास हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामावर होते तो मुस्लिम जमीनदार हाच मोहनदासचा खरा बाप आहे असे म्हणत यावेळी त्यांनी सर्वधर्म समभावचा नारा देणाऱ्या नेत्यांना चक्क गांडू व हिजडे संबोधित करून भीडे यांनी सभेला उपस्थित अनुयायांना सर्वधर्म समभाव शिकविणाऱ्या गांडू- हिजड्यांचे राजकारण संपविण्याची शपथ दिली.  मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शीलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या अनुयायांना दिली सर्वधर्मसमभाव शिकविणाऱ्यांचे राजकारण संपविण्याची शपथ. चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांचेशी पत्नीसारखा व्यवहार केला. दरम्यान करमचंद हे तीन वर्ष फरार होते. त्याच तीन वर्षात मोहनदासचा जन्म झाला आहे. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लिम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी विविध दाखले देत केला.

 संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त दाव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडेंच्या सभेला होणारा विरोध लक्षात घेता सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.. वादग्रस्त विधाने करीत रोष ओढवून घेणाऱ्या संभाजी भिडे यांचा ताफा अडविण्याचा आणि जयभारत मंगलम् येथे होणारी सभा उधळण्याचा प्रयत्न आंबेडकरी चळवळीतील युवकांनी केला. सातुर्णा चौकात आंदोलन करणाऱ्या युवकांनी प्रचंड नारेबाजी करीत संभाजी भिडे यांचे लागलेले पोस्टर तुडविले. यावेळी उपस्थित पोलिसांनी हे आंदोलन दडपून घोषणाबाजी करणाऱ्या सर्व युवकांना अटक करीत पोलीस ठाण्यात नेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com