Top Post Ad

कोकणातील मंडळ पद्धती आणि सध्याची स्थिती


  विषयानुसार बोलायचे झाले तर सदर लेखातील  माहिती ही अभ्यासपूर्ण आणि वास्तविकरित्या पाहणी आणि पडताळणी करून  लिहली आहे .सुरूवात कुठून करू समजत नाही कारण विषयाचे गांभीर्य लोकांना आहेच नाही.असो तरी ही सांगतो .

कोकणात बौद्ध समाज हा वाडी निहाय आहे म्हणजे प्रत्येक गावात एक बौद्ध वाडी आहे आणि प्रत्येक वाडीची परिस्थिती सारखीच आहे.प्रत्येक वाडीत मंडळे आहेत आणि प्रत्येक वाडीचे दोन भाग आहे(काही अपवाद)वाडीतील लोकांची परिस्थिती आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती खुप वाईट आहे दिसत नाही पण ती आहे हे मान्य करावे लागेल.भावकी भावकीत वाद आहेत वाडीतल्या वाडीत गटबाजी होते . खरंच आपली परिस्थिती खुप चांगली आहे का ?  हा प्रश्न मला विचारावा वाटतो .झाडु खाते सोडले तर बी. एम.सीत कुणालाच पिटीकेस नाही.आणि कोकणातील बहुतांश समाज हा नोकरवर्ग आहे त्यात सरकारी वर्ग कर्जबाजारी आहे सगळेच नाही काही अपवाद वगळून. पण एक गोष्ट नक्कीच की सरकारी नोकरीत असुन ही कोकणातील बौद्धांची मुले ही बारावीच्या पुढे सुशिक्षित नाही. *80% लोक व्यसनाधीन आहेत  व्यसन नाही अशी फक्त 20%लोक आहेत.*

आता आपण विषयाकडे येऊया

कोकणात मंडळ पद्धती आहे.म्हणजे काय असतं वाडीत एक मंडळ (भावकी) असते.मग त्या मंडळात अध्यक्ष, सचिव वगैरे वगैरे पदे असतात हे लोक वाडी सांभाळतात आणि वाडीतील लोकांच्या मदतीला धावतात ,मदत करतात, लोकांसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात.ही मंडळ पद्धतीची एक बाजु.*दुसरी बाजु हे मंडळ वर्गणी काढुन जयंत्या,कार्यक्रम करते.*

पण  सांगण्याचा मुद्दा असा की जेवढा पैसा जयंतीसाठी खर्च होतो तोच पैसा वाडीतीलच एखाद्या  हुशार गरीब मुलाच्या शिक्षणावर करताना ही मंडळे  दिसत नाही.आता काहीजण म्हणतात अशी हुशार गरीब मुले वाडीत नाहीत.अरे पण ती का नाहीत. हा प्रश्न वाडीतील लोकांना पडु नये का? आपण वाडीचे मंडळ म्हणुन काम पाहतो ते फक्त कार्यक्रम करण्यापुरतेच का? बाबासाहेबांचा समाज शिकण्याची इच्छा असणारा नाही.अस ग्राह्य धरावे का?.मंडळातील काही लोक( मोजकेच)एखाद्याला वैयक्तिक कारणाने टार्गेट करतात ही बाब कोकणातल्या मंडळ पद्धतीत प्रखरपणे दिसुन आली आहे.*कोकणात बौद्ध मंडळे ही फक्त मोठेपणा आणि पदासाठी धडपडत असतात*.

हो मान्य काही मंडळे खरेच चांगली कामगिरी करतात.पण निम्म्याहून जास्त कोकणातील मंडळात वादच दिसुन येतो. या मंडळाचा फायदा काहीच नाही असे नाही पण जे कार्य या मंडळानी करायला हवे ते दिसत नाही .ज्या वाडीचे ,शाखेचे पद तुम्ही सांभाळता तेथील लोकांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, परिस्थितीत सुधारणा करण्याचे तुम्ही काम करत असाल तर तुम्ही खरे बाबासाहेबांचे अनुयायी पण परिस्थिती खरेच खुप खराब आहे .*कोकणातील मंडळ पद्धत ही एक फंडासारखी झाली आहे वर्गणी काढा जयंत्या करा,कुणाचे बारसे,बारावे करा यापलिकडे कोणतेच काम नाही.*

  • *काही प्रश्न आहेत मंडळ पद्धतीत असणाऱ्या सर्व गावातील मंडळाना*
  • 1) किती मंडळांनी आतापर्यंत गरिब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला 
  • 2) किती मंडळानी वाडीत ग्रंथालय उभारले
  • 3)किती मंडळानी मुलांना ज्ञान मिळावे म्हणुन संगणकाची वाडीत व्यवस्था केली.
  • 4) किती मुलांना मार्गदर्शन करून त्यांना नोकरी लावुन दिली 
  • 5) किती घरातील लोकांना समाजकल्याण मधुन मिळणाऱ्या सोयीसुविधासाठी मदत केली,
  • 6)किती विधवा स्त्रियांना आर्थिक सहाय्य मिळवुन दिले.

सर्व मंडळे नावाला रजिस्टर होतात आणि काम मात्र फक्त जयंत्या करणे यापलिकडे काहीच नाही.आता काही महाभाग असे म्हणतील ही जी कामे आहेत आम्ही कशी करणार शासन करेल पण अरे ते तुम्ही मिळवुन देण्यास मदत तर करू शकता की नाही

काही जण म्हणतात मी दहा वर्षे मी माझ्या गावचा अध्यक्ष होतो.मी वाडीसाठी काय काय केले .मग तो सांगेल आम्ही बौद्ध विहारे बांधली,वाडीतील ईतक्या लोकांची लग्न लावली,ईतक्या मुलांचे बारसे केले  पण यावर मला एक म्हणायचे आहे  की दहावर्षात एका मुलांला चांगले शिक्षण घेण्यास मदत केली असती आणि त्याला उच्च पदावर पोहोचण्यास सहकार्य केले असते तर आज एक समाजात उत्तम उदाहरण निर्माण झाले असते आणि समाजातले स्थान वाढले असते.मुलांसाठी विविध उपक्रम राबवून मुलांना चांगल्या मार्गास लावता आले असते.

*आता कोकणात प्रत्येक बौद्धवाडीत व्यसनाधीन मुले आहेत*. पण एका ही मंडळाने कधी प्रयत्न केला नाही की वाडी दारूमुक्त व्हावी. *कारण जे मंडळात कार्यकर्ते असतात ते स्वतः पिणारे खाणारे असतात.* काही मंडळे याला अपवाद आहेत आणि खरेच अशी मंडळे आदर्शच असतात.कोकणातील ही बौद्ध मंडळ पद्धत ही जेवढी चांगली आहे त्यापेक्षा तिचा वापर करता आला नाही. असे मला वाटते.काहीनी *मोठेपणासाठी वापर केला तर काही जणांनी पैशासाठी,तर काही जणांनी हुकूमशाही गाजवण्यासाठी*

कोकणातील बौद्ध मंडळ पद्धत ही फक्त नावालाच आहे कारण त्याचे काम हे फक्त ठरलेलेच असते. किती मंडळे स्थापन होतात पण वाडीतील लोकांच्या राहणीमानाचा,शिक्षणाचा दर्जा काही सुधारत नाही,कोकणातील मुलं ही फक्त हाऊसकिपींग, वेटर,झाडुवाला,अश्याच नोकरी करणारे असतात  कारण मुळात आम्हीच मागे आहोत हे कळतच नाही.*असो पण जे लोक मोठ मोठी भाषणे करताय त्यांनी सांगावे की आपण खरेच बाबासाहेबांचे काम करत आहात का?दरवेळेस बाबासाहेबांनी असे केले तसे केले सांगतो, अरे पण तुम्ही मंडळ म्हणुन आणि वैयक्तिक बाबांचा अनुयायी म्हणुन काय केलात?*

*कोकणातील मंडळे ऑर्केस्ट्रा, कव्वाली यासाठी खर्च करताना जराही विचार करणार नाहीत* पण तेच लाख दोन लाख एखाद्या पोराला व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी खर्च करताना दिसत नाहीत.दरमहिन्याला आणि जयत्यांना आम्ही पैसे काढायचे पण वाडीत कोण असा आहे का ज्याला पैशाची गरज आहे त्याला मदत करूया त्यासाठी पैसे काढुया असा विचार कुणाच्या मनात येत नाही.*आता काही जण म्हणतात मंडळाने त्याच्याकडे का जावे त्याने आमच्याकडे यावे आम्ही मदत करू आणि  हाच इगो मंडळात आग लावतो.* 

मंडळातील लोकांनी गरजु लोकांपर्यंत पोहोचायला हवे हे तुमचे काम आहे हेच बाबासाहेबांचे काम आहे पण काय आहे मंडळ पद्धतीत जेव्हा पदावर तो व्यक्ती असतो तेव्हा त्याला लय अभिमान स्वाभिमान निर्माण झालेला असतो(अपवाद वगळून).तो स्वतःला जरा जास्तच ग्रेट समजु लागतो.आणि मंडळात असंतोष निर्माण व्हायला हे ही एक कारणच आहे

कोकणातील मंडळ पद्धती चांगली होती आणि आहे पण लोकांनी तिचा वापर करावा तसा केला नाही.पदावर येणाऱ्या माणसांच्या मनात निस्वार्थ भावना ,तळमळ दिसतच नाही  मंडळे फक्त नावापुरतीच आणि कार्यक्रमापुरतीच राहिली माझा समाज होता तिथेच आहे  पण तसा तो दिसत नाही आहे.*तुम्हाला माझे विचार मान्य असो नसो पण जे आहे ते आहे.*

  • - राजन बनसोडे
  • मुख्याध्यापक 
  • मंडणगड सिनियर काॅलेज,मंडणगड 
  • संपर्क-9876543210

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com