Top Post Ad

...सावरकराचं नाटक ब्रिटिशांनी बंद पाडलं

स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी व मुस्लिम द्वेषाने पछाडलेल्या विनायक सावरकर ने 1927 साली संगीत उ:शाप नावाचं नाटक लिहिले या नाटकामध्ये धर्मांतरित झालेला शंकर महार यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा पश्चाताप त्या नाटकांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न सावरकरने केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं प्रसंगी हिंदूत्वावर लाथ मारेन परंतु समतेचा हाक मिळवून देईल या त्यांच्या भीमगर्जनेने गर्भ गळीत झालेले जातीचा अभिमान बाळगणारे विनायक सावरकर त्याकाळी नाटकातून मुस्लिम द्वेष व महार समाजाचं हिंदू प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला. केवळ मुस्लिम विरोधी प्रचार हाच या नाटक निर्मितीचा मुख्य हेतू सावरकरांचा होता.

या नाटकातील एका अस्पृश्य पात्राच्या तोंडी संवाद होता तो असा दिल्लीच्या मयूरासनावर बसण्यासाठी मी हिंदुत्वाचा त्याग करणार नाही .अस्पृश्यतेची छळसोशीन पण हिंदू बंधूच्या दाराशी पायाविना तळमळत पडेन. हिंदूंच्या रूढीच्या हत्तीखाली चिरडून मरेन मी ही हिंदू महारच राहणार, हिंदू म्हणूनच जगणार, हिंदू म्हणूनच मरणार ,हिंदू म्हणूनच हिंदू कुळात परत जन्म घेईन अशी वाक्य सावरकरांनी त्या नाटकात टाकलेली होती. सावरकरांनी एका अंकामध्ये गंगाजी ही वेश्या कमलींनीस (ही अस्पृश्य ) सांगते माझं रक्त मास आणि प्राण अजूनही निर्मळ आहेत . हिंदूचे हिंदू आहेत त्यास तुझ्या हिंदुत्वाच्या रक्षणार्थ आहोत देऊन मी स्वतःच्या हिंदुत्वाचे रक्षण करेल इत्यादी.
सावरकरांच्या या नाटकात पाचव्या अंकातील दुसऱ्या प्रवेशात कमलिनी हि तिच्यावर बलात्कार करू पाहणार्या बंगषखानास ठार मारते. ते पाहून दुसरा शिपाई (याचा इरादा देखील कमलिनीवर बलात्कार करण्याचाच ) तिच्या रोखीने धावतो. त्याला गंगाजी ही विरंगणा ठार करते .त्या झटपटीत गंगाजीही मरते .दरम्यान आणखीन एक शिपाई कमलिनीच्या दिशेने पुढे येतो होतो त्याला शंकर (उर्फ सिकंदर )हा कमलिनीच्या प्रियकर ठार करतो. महार शंकरला इस्लाम धर्म स्वीकारल्याचा पश्चाताप होतो व तो आत्महत्या करतो आणि हे पाहून कमलनीही आत्महत्या करते.
द्वेष पसरविण्यासाठी सावरकर एका नाटकांमध्ये एका झटक्यात स्टेजवर सात मुडदे पाडतात. सावरकर चा उद्देश एका मुसलमान पात्रामुळे जनतेमध्ये शोभ निर्माण होईल हाच आहे. ब्रिटिशनिष्ठ विनायक सावरकराला ब्रिटिशांनी या नाटकात बदल करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यवीर म्हणून ज्याची टिमकी वाजवली जाती त्या लोकांना प्रश्न माझा हा आहे ब्रिटिशांची माफी मागून बाहेर आलेले विनायक सावरकर 1924 ते 1947 एखादं तरी वाक्य ब्रिटिशाविरुद्ध दाखवा. विनायक सावरकर हा स्वातंत्र्यपूर्व काळात देशद्रोहा बरोबरच महात्मा गांधीच्या ऐक्याला तडे देण्यासाठी नाटकातून लेखक लेखनातून व कृतीतून मुस्लिम द्वेष दलित द्वेष करण्यापलीकडे त्याचं स्वातंत्र्यलढ्यात कुठलंच काम नाही हे त्याच्याच लिखाणातून ब्रिटिशांच्या कागदपत्रातून सिद्ध होत आहे .
(संदर्भ आदरणीय मदन पाटील यांचं अकथित सावरकर)
जय हिंद जय भारत जय संविधान .
हरिभाऊ सोळंके

(माझ्या पोस्टमध्ये महार समाज हा नावाचा उल्लेख त्याकाळी तो समाज त्या नावानेच ओळखला जात होता म्हणून हा उल्लेख आहे कुणाच्याही भावना दुखणे हा माझा उद्देश नाही खरा इतिहास समोर येणे हाच उद्देश आहे)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com