Top Post Ad

भारतीय संविधानामुळे सावित्रीची एक लेक पायलट झाली...


 अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांची मुलगी सिद्धी परदेशात जाऊन वैमानिक झाल्याबद्दल एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगी वैमानिक झाल्याचं कौतुक करताना ती कोणतीही सवलत,आरक्षण नसताना स्वतःच्या जोरावर वैमानिक झाल्याचं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका होत आहे.

 काँग्रेसचे प्रवक्ते आणि पत्रकार युवराज मोहिते म्हणतात,  “अभिनेते शरद पोंक्षेंनी त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. सावित्रीची एक लेक पायलट झाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र ही माहिती देताना नेहमीप्रमाणे शरद पोंक्षेंनी विकृत जातीय टिप्पणी केली. ते आरक्षणाशिवाय लेक पायलट झाली असं म्हणत आहेत. या विकृत माणसाने काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे.  
अमोल यादव हा तरूण जेट एअरवेजमध्ये डेप्युटी चीफ कॅप्टन आहे. त्याने थेट विमान बनवण्याचा एक ध्यास घेतला होता. आंबेडकरी चळवळीतील त्याचे वडील प्राध्यापक एस. एस. यादव यांनी कर्ज काढून त्याला पैसे दिले. अमोलने जुगाड करत कांदिवलीतील इमारतीच्या गच्चीवर विमानाची जुळणी सुरू केली, अनंत अडचणींवर मात करत त्याने विमानही बनवलं. भारतीय बनावटीचं ते पहिलं विमान ठरलं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या विमानाबरोबर मिरवत मेक इन इंडियाचा बोलबोला केला. अमोलला या उद्योगासाठी जमीन देऊ केली. गेली ९ वर्ष अमोल या जमिनीसाठी चकरा मारतोय,
“गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील एका कुटुंबातील प्रतिक सुखदेव ऐवळे अप्रतिम सेवा बजावत स्वकर्तृत्वावर एअर इंडियामध्ये मुख्य पायलट झाला. ज्यावेळी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा तिथे असंख्य भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. मुलांचे हाल झाले. बोंबाबोंब झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना भारतात आणायची मोहीम सुरू झाली. हे जोखमीचं काम होतं. प्रतिक या कामगिरीवर तैनात झाला. न थकता त्याने ये-जा केली. कमी कालावधीत मुलांना सुखरूप भारतात आणलं. या कामगिरीबाबत अनेकांना त्याचा सत्कार करायचा होता. मात्र, प्रतिकने नम्र नकार दिला.”

“हजारो वर्षे पोंक्षे प्रभुतींना सर्वच क्षेत्रात निर्विवाद आरक्षण होतं. अमोल, प्रतिक हे प्रातिनिधिक आहेत. आरक्षणातून संधी मिळाल्यानंतर ही मुलं काय करू शकतात याचं हे उदाहरण आहेत. हजारो वर्षे पोंक्षे प्रभुतींना सर्वच क्षेत्रात निर्विवाद आरक्षण होतं. आता कुठे पिचलेल्या समाजातील मुलं संविधानाचं बोट पकडून गगनाला गवसणी घालू शकत आहेत. ही पोंक्षेंची पोटदुखी म्हणावी का? शरद पोंक्षे आपल्याला दिर्घायुष्य लाभो. मात्र विकृत विचारांच्या कॅन्सरवर संविधानाची केमो घ्यावी एवढीच अपेक्षा आहे. लवकर बरे व्हा,” - युवराज मोहितें 

---

तुम्ही ज्या आरक्षणाबद्दल प्रचंड तिरस्कृतपणाने लिहलत ना, , त्या आरक्षणाची लाभार्थी होणे मला सहज शक्य असताना सुद्धा माझं संपूर्ण शिक्षण मी खुल्या प्रवर्गातून पूर्ण केले आहे. आणि हो नुसतं पूर्ण केलं नाही तर विशेष प्राविण्यासह आणि विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल पाच सुवर्णपदकांसह पूर्ण केले आहे. त्यामुळे आरक्षण लाभार्थी होणे शक्य असतानाही ते नाकारण्याची हिंमत जर मी करू शकत असेल तर तुमच्यासारख्या माणसाला (?) आरसा दाखवण्याची हिंमत मी करूच शकते. अहो शरदराव कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे यासाठी कुठेही अर्ज केलेला नसतो हे माहीत असेलच तुम्हाला त्यामुळे जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपले कसलेही स्वकर्तृत्व नाही त्याची जशी लाज असू नये तसा माजही असू नये याचं भान असेलच तुम्हाला, अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

माणसा माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब यांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही. माझ्या राजकीय कारकीर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना कुठलं जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलंच आहे. अर्थात् कुठलेही जातीय आर्थिक किँवा वांशिक निकष न लावता निव्वळ माझ्यातल्या गुणवत्तेची पारख करत मला राज्यभर काम करण्याची संधी देणारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मानवतावादी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हे तुमच्यासारख्या माणूसद्वेष्ट्यांना अजिबात कळणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

शरद राव तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात. पण या आजारा दरम्यान उपचार घेत असताना रक्त लघवी तपासण्याचे ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील, शस्त्रक्रिया दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ , केमोथेरपी देणारे डॉक्टर्स, रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या जाती तुम्हाला माहीत होत्या का हो..., असा सवाल सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षेंना विचारला आहे. 


शरद पोंक्षे, ... अरे, छत्रपती संभाजी महाराजांची,११ मार्च १६८९ रोजी हत्या करून मुस्लीमांची सत्ता स्थापन व्हायला पाहिजे होती, पण आली कोणाची? पेशव्यांची म्हणजे ब्राह्मण पेशवे संभाजी महाराज यांचा खून करण्यात औरंगजेबाला सुपारी देऊन सामील होते हे उघड आहे. पेशवाई १जानेवारी १८१८ रोजी शिदनाकाच्या मर्दांनी बुडवली पण शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक कोणी फडकावला? तोही नातू नावाचा ब्राह्मणच होता. तेव्हापासून पुरोहित होऊन ब्राह्मण दवळांचा, ओबीसींना  ज्योतिष,भविष्याच्या खोट्या कंड्या पिकवून, अंधश्रद्धाळू बनवून शंभर टक्के आरक्षण हजारो वर्षे भोगत आहात त्याची शरम वाटली होती का?

भटमान्य बाळ गंगाधर टिळक याला भटांची  सत्ता गेल्याचं दुःख येवढं झालं होतं की त्याने भटांना चिथावणीवजा हिंट दिली,"Swarajya Is My Birthright & I will have it!" म्हणजे ब्राह्मणांचं स्वतः:चं राज्य हवं होतं.पण भटमान्य टिळक मेल्यावर मो.क.गांधी  या बनियाचा उदय होऊन , गांधीच्या हाती ‌ जाते की म्हणून १९३४सालापासून अनेक वेळा गांधीला मारण्याचा प्रयत्न करत करत शेवटी ३० जानेवारी १९४८ रोजी भटांनी कंडी, कट करून नथूराम गोडसेने  निहत्या गांधींचा खून केला.का? तर हजारो वर्षे साजूक तुपाचा शिरा बिनाकष्ट खात होते ते सत्तेवर बनिया बसला तर दुरापास्त होईल की काय अशी भीती वाटत होती म्हणून मधला काटा काढला आणि आता मंदिरांचा मलीदा खाऊनही निर्लज्ज सांगतोस का तुझी मुलगी आरक्षणा शिवाय पायलट झाली? इ.स.पूर्व १८५ सालापासून,पुष्यमित्र शृंगापासून  जो वर्ग पायदळी तुडवत जाला आहात नी दगडांच्या देवांची भीती दाखवून आरक्षणावर डल्ला मारत आहात त्याचं काय?  -साराभाई वेळुंजकर. २८:७:२०२३.


  • नेटकऱ्यांनी वाजवले

  • "अबे Sharad Ponkshe डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर तुझी लेक आज pilot झाली नसती."
  • "Congrats पण कमर्शिअल पायलट मध्ये कुठून आलं आरक्षण ? आणि देशसेवेचा काय संबंध ?"
  • "साधारण 2000 वर्षे शिक्षणाचा निवडक अधिकार, आरक्षण, एकाच समाजाला होतं. ह्या पेक्षा मोठं आरक्षण असूच शकत नाही कोणत्याही समाजासाठी. असो."
  • "सिध्दी बेटा तुझे हार्दीक अभिनंदन ,परंतु तुझ्या बापाला आरक्षणवाले डोळ्याला खुपतात याचे वाईट वाटते ,आरक्षण घेणारे झोपडपट्टीत राहूनही कलेक्टर होतात आणि कलेक्टर होण्यासाठी फक्त आरक्षणच नव्हे तर बुद्धिमत्ता ही लागते."
  • अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी शरद पोंक्षेंची चांगलीच शाळा घेतलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com