Top Post Ad

मणिपूरची परिस्थिती आणि तिथे चाललेला नरसंहाराच्या विरोधात ठाण्यात निदर्शने

मणिपूरची परिस्थिती आणि तिथे चाललेल्या नरसंहाराबद्दल ज्येष्ठ पत्रकार सौमित्र राय यांनी केलेला खुलासा...

ही गोष्ट केवळ मणिपूरचीच नाही तर देशातील सर्व राज्यांची आहे जिथे आदिवासी भागात खनिज संपत्ती आहे.  GSI चा सर्वेक्षण नकाशात मणिपूरच्या जंगलात निकेल, तांबे आणि प्लॅटिनम गटातील धातूंची उपस्थिती दर्शवितो. कुकी आदिवासी मणिपूरच्या जंगलात राहतात. मणिपूरची 80% जमीन डोंगराळ आहे, म्हणजे कुकी.  भाजपने काय केले? त्यांनी डोंगरावर कब्जा करण्यासाठी मैदानी प्रदेशातील मैतींना एसटीचा दर्जा दिला. 4 मे रोजी, दंगल भडकवण्यासाठी एक बनावट व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या दिल्लीतील मुलीला मैतेयी महिला म्हणून खोटे चित्रित केले होते.

परिणामी, शेकडो मैती पुरुषांनी 2 कुकी महिलांना सार्वजनिकरित्या विवस्त्र केले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. विचार करा असे बनावट व्हिडीओ कोणत्या कारखान्यात बनवले जात असतील? अगदी बरोबर, जो विचार करत आहात तेच बरोबर आहे. खरं तर, मणिपूरवर पंतप्रधान मोदींनी मौन बाळगण्याचा कारण हा आहे की त्यांनी राज्यातील पर्वत आपल्या मित्र कॉर्पोरेट्सना विकले आहेत. होय. मणिपूर विकले गेले आहे, त्याच्या जमिनीवरील मौल्यवान खजिन्याचा लिलाव झाला आहे. कुकी आदिवासी असेपर्यंत पर्वत खोदणे कठीण आहे, म्हणून वांशिक नरसंहार सुरू आहे. मैतीने ते पर्वत काबीज करावे आणि कुकीला पळवून लावावे ही मोदी सरकारची युक्ती आहे. देश लुटला गेला आहे मित्रांनो कधीच, आता फक्त मृतदेहाची विटंबना सुरू आहे.
- - सौमित्र राय....ज्येष्ठ पत्रकार ( अजय कुडे यांची फेसबुक पोस्टवरील एक कॉमेंट,)


 


 मणिपूर येथील घटनेचा  ठाण्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध केला. श्रमिक जनता संघ, स्वराज अभियान, म्युझ फाऊंडेशन, शोषित जनआंदोलन, समता विचार प्रसारक संस्था, बहुजन विकास संघ, एनएपीएम आणि इतर विविध नागरी संघटना आणि जागरूक नागरिकांनी महिलांवरील सामूहिक अत्याचार, नग्न शोषणाच्या अमानुष घटनेबद्दल सरकारच्या अपयशाचा तीव्र निषेध केला.


 मणिपूर. खैरलांजी 

मणिपूर दोन स्त्रियांची नग्न धिंड काढून सामुदायिक बलात्काराची व्हिडिओ प्रसारीत आल्यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला आहे व ते साहजिकच आहे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना तिचा निषेध झालाच पाहिजे  ह्या घटनेवर संसदेत व महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेत गदारोळ होवून विधान सभा व लोकसभेचे कामकाज ठप्प झाले आहे. सिनेस्टार अक्षय कुमार व बॉलिवुड हळहळले मणिपूर गुन्हेगारांना अशी शिक्षा द्या की पुन्हा असे सैतानी कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही  आम्ही देखील तेच म्हणत होतो खैरलांजी गुन्हेगारांना जर कठोर शिक्षा झाली असती तर मणिपूर घडले नसते मणिपूर वर गळा काढणार्‍या देशातल्या व राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना खैरलांजी प्रकरणातील तुमच्या तोंडात बोळे घुसले होते का 

खैरलांजी व मणिपूर ह्या दोन्ही घटना मध्ये कमालीचे साम्य आहे मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली त्यांच्या वर सामुदायिक बलात्कार करण्यात आला इज्जत वाचविणाऱ्या भावाचा खून करण्यात आला.    खैरलांजी येथे देखील सुरेखा व प्रियांका या मायलेकीचा नग्न धिंड काढण्यात आली त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार करण्यात आला आई व बहिणीची इज्जत वाचविण्यासाठी गेलेल्या रोशन व सुधीर या दोन भावंडांचा मुडदा पडण्यात आला ही घटना दिवसा ढवळा संपूर्ण गावकर्‍यांसमोर पोलिसांच्या उपस्थितीत घडली असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी खैरलांजी गावाला भेट दिली नाही गृहमंत्री आर आर पाटील यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही दोन महिलांचे विवस्त्र देह आढळून येवून देखील बलात्कार झाल्याच्या दृष्टीने मेडिकल झाली नाही. हा गुन्हा जमिनीच्या वादातून झाला असून जातीयवाद नसल्यामुळे AtrositiAct लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही  ओरीसा राज्यात फादर स्टेन याची हत्या झाली असता सोनिया गांधी रातोरात धावून गेल्या मुख्यमंत्र्याची हकालपट्टी केली आरोपी दारासिंग यास अटक करून फासावर देखील लटकावले. मात्र  सर्वात निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ह्या खैरलांजी गावाला तंटा मुक्त गाव घोषित करून गौरव करण्यात आला. मणीपुर जळत ते कळत पन खैरलांजी पेटते न्यायासाठी जनता रस्त्यावर उतरते तेव्हा आंबेडकरवादी आंदोलनाला नक्षलवादी ठरवून आंदोलन चिरडून टाकणार्‍या काँग्रेस पक्षाला नैतिक अधिकार देखील आहे का.

-------------------------

कुंकू टिकली वाल्या काकू या मणिपूर प्रकरणावर काहीच बोलत नाहियेत.. परवा परवा पर्यंत इस्त्रो मधल्या स्त्रीया कसं साडी, गजरे घालून आपल्या संस्कृतीच रक्षण करतायत, हल्लीच्या स्त्रीया कशा स्वैराचाराकडे वळल्यात वगैरे ग्यान झोडणारे संस्कृतीरक्षक पण मूग गिळून बसलेत..“ बाईपण भारी देवा” च्या पोस्टरबरोबर साडी, गाॅगल, नथ असा पेहराव करून फोटो काढणाऱ्या स्त्रीयांना पण एकंदरित प्रकरणावर काहीच बोलाव वाटत नाहीये..!!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com