Top Post Ad

आरक्षण द्या अन्यथा राजीनामा द्या

 


जर गरीब मराठा समाजाची जाण नसेल तर आम्हीं यापुढे आमदार असो की खासदार, मंत्री असो, त्यांच्या घरी जाऊन  लोकशाही मार्गाने सर्वसामान्य मराठा समाजाला घटनात्मक 50% आतील ओबीसी मधुनच आरक्षण मिळवून द्यावे म्हणून निवेदनाद्वारे विनंती करणार आहोत.   सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात 50% आतील गरीब मराठा समाजाचा हक्क आहे की नाही याबाबत चर्चा करावी. 50% आतील ओबीसी मधुनच गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मागणी मान्य करावी. ही मागणी मान्य झाली नाही तर मात्र नाईलाजास्तव आरक्षण द्या अन्यथा राजीनामा द्या. अशी मागणी महाराष्ट्रातील मराठा समाज आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन करेल.  सामान्य मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आमचे मोठ्या प्रमाणावर नोकरी व शैक्षणीक, आर्थिक नुकसान होत आहे. म्हणूनच आजही आम्ही एवढा संघर्ष सुरु ठेवला आहे. मात्र आज 26 जुलै पासून मराठा वनवास यात्रा आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत अशी घोषणा मराठा वनवास यात्रा / सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याचे  सुनिल नागणे, प्रतापसिंह काचन-पाटील आदी मान्यवरांनी यावेळी केली.  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे  प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.  

५०% च्या आत ओबीसी मधुनच गोरगरीब सामान्य मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी 6 मे 2023 राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी श्रीक्षेत्र तुळजापूर ते मंत्रालय मुंबई पर्यंत पायी चालत निघालो होतो. 6 जुन 2023 रोजी विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिवशी आझाद मैदान मुंबई येथे पोचलो असताना त्याचं दिवसापासुन आरक्षण हक्कासाठी मैदानावर ठिय्या मांडून बसलो होतो की जोपर्यंत आरक्षण) मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही व मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्यानं मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले दुसरे उपुख्यमंत्री अजित  पवार यांनी गोरगरीब सामान्य मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण न्याय देण्यासाठी आमच्या सोबत चर्चा करण्यास आझाद मैदानावर यावं अशी आंदोलनकर्त्यांची भावना होती. मात्र पदरी घोर निराशाच पडली असल्याचे खंत पाटील यांनी व्यक्त केली. 

या आंदोलन काळात केवळ भुम परंडा तालुक्यातील लोकप्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी आझाद मैदानावर उपस्थीत सहभाग नोंदवला.  त्यानंतर  धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात या मागणीबाबत प्रश्न उपस्थित केला. या व्यतिरिक्त मराठा वनवास यात्रा आझाद मैदानावर ठाण मांडून बसली असताना त्याकडे  अक्षरश: पाठ फिरवली आहे. गोरगरीब सामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही एकमेव मागणीसाठी आंदोलन असतानाच लोकप्रतिनिधीकडून अशी दुय्यम वागणूक मिळणे म्हणजे या प्रश्नाचं गांभिर्य नसणे असा आरोपही यावेळी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com