,आपली मुबई' हा मुंबईतील विविध विभागात सामाजिक बांधिलकीने सामाजिक काम करणाऱ्या संघटनेच्या वतीने. 'आपली मुंबई, आपले आरोग्य' हि मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी. यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती ओमप्रकाश पासी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
यामध्ये महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन शेवटच्या माणसाला आरोग्य सुविधा वापरताना आनंद झाला पाहिले अशी सर्व सोयीयुक्त रुग्णालये निर्माण केली पाहिजेत. हि शासनाची प्राथमिकता असली पाहिजे. सध्या मुंबईसह महाराष्ट्रभरातील आरोग्य सुविधेवर प्रचंड ताण येत असल्याने रुण, डॉक्टर, कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईस महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर आहे. जर वेळीच त्यावर उपाययोजना केली गेली नाहीतर गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य जनतेला जे परवडणार नाही. कोरोना काळानंतर अनेक रोगाची लागण होत आहे. त्यावर उपचार करणे सर्वसामान्यांच्या अवाक्यापलीकडचे होत चालले आहे.
अनेकदा उपचाराविना रुग्णांना जीव सोडावा लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अशा वेळेस काहीही करता येत नाही. पैशांअभावी अनेक रुपांना योग्य ते उपचार घेता येत नाही. यामुळे सरकारने सर्वांना सर्व प्रकारची आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी आमची भूमिका आहे. चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध झाली तर रुग्णालयात आनंददायी वातावरणात रुग्णांवर उपचार करता येतील त्याचा फायदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांना होईल. हे सर्व सुधारण्यासाठी आम्ही संघटना म्हणून प्रयत्नशील आहोत. यासाठी पुढील मुख्य मागण्या आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत. त्यावर गंभीरपणे विचारविमर्श केला जावा. आम्ही आशा करतो कि, महाराष्ट्र सरकार यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षाही पासी यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संघटनेने सर्वांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सर्वसोयी सुविधा युक्त सर्व प्रकारच्या रुग्णांकरिता मोफत रुग्ण सेवा उपलब्ध होईल असे रुग्णालय उभारले जावे. सध्या मुंबईसह महाराष्ट्रभरात असलेल्या आरोग्य सुविधेत सुधारणा केली जावी. सर्व आजारा संदर्भात आवश्यक त्या सर्व तपासण्याची सोय तसेच आवश्यक औषधोपचाराची सोय ही शासना मार्फतच होईल याची राज्य शासनाने हमी घेवून त्या संदर्भात त्याच्या अमंलबजावणी साठी आवश्यक यंत्रणा उभी करावी. अशा मागण्या केल्या आहेत.
निमंत्रक ;
संजय शिंद, जॉन अल्मेडा, ओमप्रकाश पासी, रवि भिलाणे, श्रीधर क्षीरसागर, ज्ञानेश पाटील, मनोहर राजगुरू, विलास कोंडगेकर, अमित बिड़लान, ज्योती बडेकर, हिलडा नाडार . वैशाली सावंत, वासवी विलका, गुणवंत पोळ, काशिनाथ निकाळजे, सचिन बच्छाव, संतोष लिंबोरे-पाटील, संतोष सुर्वे, दिलीप गाडेकर, गिरीराज शेरखाने, शंकर खिल्लारे, प्रवीण मसुरकर, बाळासाहेब पगारे, राजीव पाताडे, निसार अली, व अन्य सहकारी
0 टिप्पण्या