Top Post Ad

शिवसेना पदाधिकारी परिषदेत नरेश मणेरा यांनी घेतला मतदारसंघाचा आढावा


निवडणूक व्यवस्थापनासंदर्भात १४६ ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची परिषद संपन्न

गुजरातच्या सत्तेचा रस्ता ठाण्यातून जातो, अशा स्थितीत ठाण्यात शिवसेनेचा झेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फडकवणे अत्यंत गरजेचे आहे. हा मूलमंत्र घेऊन शिवसेनेचे (ठाकरे) १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी रविवार १६ जुलै रोजी १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. निवडणूक व्यवस्थापनासंदर्भात मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची परिषद राहुल कॉलेज उत्सव हॉल, भाईंदर नवघर रोड येथे आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निमंत्रक, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्त्यांसह  युवासेनेचे पदाधिकाऱी देखील मोठ्या संख्येने या परिषदेस उपस्थित होते.

खासदार राजन विचारे यांनीही परिषदेला विशेष उपस्थिती दर्शवली.  केवळ या परिषदेला येणे पुरेसे नाही, तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आपली सत्ता कशी येईल, या उद्देशाने काम करणे अधिक महत्त्वाचे आहे असल्याचे मत विचारे यांनी व्यक्त केले.

या पदाधिकारी परिषदेत पुण्याचे निवडणूक रणनीती तज्ञ वैभव वाघ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. वाघ म्हणाले की, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम आपण शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत की नाही, याचे मूल्यमापन केले पाहिजे. याशिवाय ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागाची त्यांना चांगली माहिती असावी. याशिवाय त्या प्रभागाचा सर्व्हे करण्याचे तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेण्याची ताकद त्यांच्याकडे असली पाहिजे. एवढेच नव्हे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या पात्रतेनुसार जबाबदारी दिली पाहिजे. तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा पक्षासाठी योग्य वापर झाला पाहिजे.  निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 


 याप्रसंगी पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख चंद्रकांत मुद्रास, शहरप्रमुख शिवशंकर तिवारी, उपजिल्हाप्रमुख गणेश धर्माजी पाटील, उपजिल्हाप्रमुख जयराम मेणसे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, जिल्हा समन्वयक स्नेहा मा. ताई सावंत, उपजिल्हा समन्वयक हेमलता जोशी, माजी उपमहापौर प्रवीण पाटील, नगरसेवक दिनेश नलावडे, नगरसेविका तारा घरत, नगरसेविका नीलम ढवळ, प्राची पाटील तसेच विभागप्रमुख विश्वास घाग, उपशहरप्रमुख पांडुरंग पवार, केशव पाटोळे, कांचन लाड, आकांक्षा वीरकर, नाना धारिवाल, चेतना म्हाळे, आस्तिक म्हात्रे, नंदकुमार बंड, दयानंद नर, संजय पेडकर,  युवा सेना विधानसभा अधिकारी नतेश पाटील, विभागप्रमुख माया पाटील शाखाप्रमुख जयवंत म्हात्रे, भरत शेळके, दिनेश पाटील, जीतू राऊत आदी उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com