Top Post Ad

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचा ठाण्यामधून शुभारंभ


 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मेळावे आगामी काळात होणार आहेत.  या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून होणार असून, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना मार्गदर्शन करणार आहेत.  सदर मेळावा गुरुवार दि.13 जुलै रोजी सायंकाळी टिप-टॉप प्लाझा, ठाणे येथे संपन्न होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली. या  मेळाव्यासाठी ठाण्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि समस्त शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.

वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीला सोडचिट्ठी देऊन महाआघाडी सरकारमधील अनेक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपासोबत गेले. यामध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराज देसाई, बच्चू कडू आदींचा समावेश होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदारांनी आम्हाला विकास निधी देताना अजित पवार हात आखडता घेत होते, असा आरोप केला होता. भाजप बरोबर आल्याने निधीची कमतरता राहणार नाही असे शिंदे गटाच्या आमदारांना वाटत होते. 

पण २ जुलै रोजी अजित पवार यांनी आठ मंत्र्यासोबत शपथ घेतली तेव्हापासून  शिंदे गटाची चिंता वाढली आहे. अजित पवार यांना अर्थमंत्री करू नका असा आग्रह शिवसेनेचे आमदार करत आहेत. शिवाय शिवसेना एकनाथ गटाच्या दोन मंत्र्यांची खाती काढून ती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाण्याकरिता मुख्यमंत्री महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्याची सुरुवात ठाण्यातून होत असून याबाबत ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा मनसुबा शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आखला आहे.

अचलपूरचे अनेक वर्ष आमदार असलेल्या बच्चू कडूंचा राज्य मंत्रिमंडळात अजून विचार न झाल्याने ते नाराज आहेत. म्हणूनच की काय हे सरकार कधीही कोसळू शकते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्राच्या जो शपथविधी झाला याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी दिली नसावी. त्यांना वेळेवर सांगण्यात आले असावे त्यामुळे आमच्या शपथविधीचा विचार झाला नाही असा धक्कदायक दावा बच्चू कडू यांनी केली. आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असतांना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो होता. अजित पवार यांची आमच्या मतदारसंघात आम्ही बिलकुल ढळाढवळ सहन करणार नाही. तीन इंजिनचे सरकार आहे हे मजबूत पण राहू शकते व कधीही कोसळू शकते. असेही बच्चु कडू यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com