प.बंगाल चे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू आणि स्वातंत्र्य लढ्यात छातीवर गोळी झेलत लढणाऱ्या रणरागिणी कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर ही दुई कम्युनिस्ट होते. कॉम्रेड होते. दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शिपाई पण राजकारणी (खर म्हणजे राजकारण हे जनतेच्या समृद्धी, प्रगती आणि विकसित जीवनासाठी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे असे असावे)मात्र सध्या हा उद्देश दूर सरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला राजकारण घाण,चिखल वगैरे सांगून (जनतेचे अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण, आरोग्य,नागरी सुविधा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी असलेली यंत्रणा बदनाम केली जात) खरं तर हे राजकारणच समाजात बदल घडवून आणू शकतो. ( त्यासाठी स्वच्छ, प्रामाणिक,जनतेच्या हिताला सर्वतोपरी प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी निवडणे हाच खरा पर्याय आहे. हे ठासून सांगण्याची गरज आहे.)
महाराष्ट्रातील सत्तेच्या व स्वार्थाच्या लालसेपोटी सुरू असलेला बेशरम सत्ताबाजार आणि त्याचे सुरू असलेले किळसवाण समर्थन याचा निषेध होणे आवश्यक आहे. तर या दोन्ही कम्युनिस्ट नेत्याच्या स्मृतिदिनी स्वच्छ व प्रामाणिक राजकारणाचे जागर करण्याची गरज आहे. त्यासाठी हा सारा प्रपंच......
कॉम्रेड ज्योती बसू हे सलग 25 वर्षे प. बंगाल चे मुख्यमंत्री होते. हा देशातील पहिला रेकॉर्ड होता. आणि तो ही कम्युनिस्ट विचारांच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी आपल्या कारकिर्दीत प.बंगाल मधील शेतकरी,कामगार,मजूर,महिला, युवक आणि विद्यार्थी या सर्व थरातील नागरीकांना त्यांचे मूलभूत हक्क गरजा(अन्न, वस्त्र,रोजगार,निवारा,आरोग्य,
शिक्षण ) देण्यासाठी आपलं राजकारण केलं व सत्ता राबविली. त्यामुळे त्यांच्यानंतर पुढील दहा वर्षे ही सत्ता टिकू शकली. त्यांनी या काळात भुके कंगाल,भूमीहीन प. बंगाल मधील शेतमजूर, शेतकरी यांना त्यांचे जीवन जगता यावे याकरिता अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आजही देशात भूमीहीन कुटुंबांना लाखो हेक्टर सरकारी जमीनी देऊन लाखो कुटुंबाना हक्काच्या शेती उद्योग व व्यवसाय दिला.
देशातील पहिली मेट्रो या प. बंगाल मध्ये सुरू केली. (या मेट्रो मधून मी स्वतः 1989 म्हणजे 34 वर्षांपूर्वी प्रवास केला.) अनेकदा कम्युनिस्टांनी काय विकास केला असा सवाल करीत अपप्रचार केला जातो. प. बंगाल मधील शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचं कधी आज पर्यंत ऐकलं आहे का ? या विरुद्ध महाराष्ट्रात विकास झालाय महाराष्ट्र श्रीमंत आहे, ना मग येथील शेतकरी आत्महत्या हत्या का करतात. हे का कोणी विचारत नाही.प. बंगाल हा अनेक प्रकारच्या शेती माल उत्पादनात अग्रेसर आहे. ( यामध्ये बटाटा उत्पादक राज्य म्हणून प्रथम आहे) देशात केरळ नंतर 12 वी पर्यंत मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा व त्याची अंमलबजावणी त्यांनीच केली. (आज महाराष्ट्रात मोफत शिक्षणाचा निर्णय आहे,कोणतं शिक्षण मोफत मिळत का?) प. बंगाल हे देशातील सर्वात स्वस्त सार्वजनिक प्रवास सुविधा देणार राज्य आहे. ते ज्योती बसू आणि कम्युनिस्ट सरकारने केलं. त्याचप्रमाणे राज्यातील बंदर विकसित केले. उद्योग उभारले,मोठ्या संख्येने मुस्लिम असूनही कम्युनिस्ट राज्य असतांना एक ही जातीय दंगा झाला नव्हता.
सत्ता आणि लालसा लाथालणारे, देशाचे पंतप्रधान पद नाकारणारे ज्योती बसू यांनी आपल्या 25 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात स्व- पक्षाला एकहाती बहुमत असतांना ही सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन समर्थपणे आणि स्थीर सरकार चालविले. त्यामुळे देशाचे पंतप्रधान पद मिळत असतांना ही केवळ जनतेच्या हिताचे निर्णय घेतांना आपल्या स्वतः कडे बहुमत नसल्याने शक्य होणार आणि हा पक्षाचा विचार शीरोधार्य मानणारे देशाच्या सर्वोच्च पद नाकारणे कम्युनिस्टांचे नेते कॉम्रेड ज्योती बसू हे होते.
कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर- स्वातंत्र्य सेनानी,लढवय्या नेत्या मुंबईतील नगरसेवक ते खासदार असलेल्या अहिल्याताई रांगणेकर याही कम्युनिस्ट होत्या. 1946 ला मुंबईत ब्रिटिश साम्राज्या विरोधात झालेल्या नाविक बंडात नौदलाच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी लढणाऱ्या आणि गोळीबारात सुदैवानं वाचलेल्या लढवय्या रणरागिणी होत्या. स्वातंत्र्य सैनिक असून ही सरकारी पेन्शन सह कोणतीही सुविधा न घेणाऱ्या सदैव जनतेसाठी तत्पर राहणाऱ्या स्व खर्चाने जनतेची कामे करणाऱ्या आदर्श राजकारणी कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर या होत्या.
त्यामुळे राजकारण गलिच्छ, चिखल नाही (तर जनतेला पुढे घेऊन जाणारे खरे राजकारण व्हायला हवं) मात्र स्वतःच्या,कुटुंबातील व्यक्तीच्या फायद्यासाठी उपयोग करून घेत जनतेला लुटणाऱ्या गलिच्छ सत्ताधाऱ्यांना नाकारणे हाच खरा मार्ग असू शकतो.
0 टिप्पण्या