Top Post Ad

देशाच्या प्रजातंत्रावर जो कोणी आघात करेल त्याचा आम्ही विरोध करू


    महाबैठकीनंतर विरोधकांनी दिला एकजुटीचा नारा

भाजपच्या मोदी सरकारला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष आज पाटण्यामध्ये एकत्र आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक पार पडली.  मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्षांनी एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येथून रणशिंग फुंकले. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली.

 या बैठकीत २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय निर्णय घेण्यासाठी नितीश कुमार यांना नियुक्त करण्यात आले. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी होणाऱ्या आगामी बैठका आणि सर्व राजकीय निर्णयांसाठी नितीश कुमार हे जबाबदार असतील. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यानंतर इतर पक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. नितीश कुमार यांच्या नावावर सर्व पक्षांच्या प्रमुखांनी सहमती व्यक्त केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.  विरोधी ऐक्यासाठी बनणाऱ्या आघाडीचे मुख्य कर्तेधर्ते तसेच सर्व पक्षांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी ते रणनीती आखतील. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (जेडीयू) यांच्या नेतृत्वाखालील  पाटणातील या बैठकीला १५ पक्षांचे २७ नेते उपस्थित होते. त्यात राहुल गांधी(काँग्रेस), उद्धव ठाकरे (शिवसेना-ठाकरे) शरद पवार(एनसीपी), ममता बॅनर्जी(तृणमूल), एमके स्टॅलिन(डिएमके), मल्लिकार्जुन खरगे(काँग्रेस),  अरविंद केजरीवाल(आप), हेमंत सोरेन (झामुमो),  लालू प्रसाद यादव(राजद), भगवंत मान(आप), अखिलेश यादव(सपा), केसी वेणुगोपाळ (काँग्रेस), सुप्रिया सुळे(एनसीपी), प्रफुल पटेल(एनसीपी), मनोज झा(राजद), फिरहाद हकीम (एआयटीसी), राघव चड्डा (आप), संजय सिंह(आप), संजय राऊत(शिवसेना-ठाकरे), ललन सिंह(जेडीयू), संजय झा(राजद),  सीताराम येचुरी (सीपीआयएम), उमर अब्दुल्ला (नेका), टीआर बालू (डिएमके), मेहबुबा मुफ्ती 

आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीला अंतिम रूप येईल. विरोधकांमध्ये मतभेद नाहीत. देशहितासाठी सगळे एकत्र येत आहेत याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील आव्हानांना एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. वंचित बहुजन आघाडी (प्रकाश आंबेडकर), भारत राष्ट्र समिती (के. चंद्रशेखर राव), एमआयएम (असदुद्दीन ओवैसी), बहुजन समाज पार्टी (मायावती) हे पक्ष जर स्वतंत्रपणे लढले तर विरोधकांच्या एकजुटीला धोका निर्माण होऊ शकते, अशी भीती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बैठकीत व्यक्त केली.

 “भाजपसोबत लढायचं असेल तर जुने मतभेद विसरुन एकत्र या. जागावाटपात काँग्रेस समझौता करेल. देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान देण्यास तयार आहे. भाजपची नीती भारत तोडो आहे. भाजपच्या भारत तोडो नीतीला भारत जोडोनं विरोध करतोय”,  भारताच्या पायावर आक्रमक होतेय, ही विचारधारेची लढाई आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. आमच्या नक्कीच मतभेद आहेत परंतु आम्ही एकत्र काम करू, विचारधारेचं रक्षण करू असं आम्ही ठरवलंय. आज जी बैठकीत चर्चा झाली, त्यावर आणखी विचार विनिमय होईल. विरोधकांची ही बैठक आणखी पुढे जाईल असं राहुल गांधी म्हणाले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  म्हणाले, आज देशात प्रत्येक दिवशी एक नवी समस्या आम्ही पाहत आहे, धार्मिक तेढ निर्मान करण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी होत आहे. समाजाच्या एकोप्यासाठी आज भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात आपल्याला सामना करावा लागेल. हा सामना सर्वांनी मिळून करावा लागेल. काही मतभेद जरुर असतील मात्र देशहितासाठी आपसातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन पुढे जाण्याचे ठरविले आहे. मला विश्वास आहे की पाटण्यातून सुरु झालेली ही सुरुवात देशात बदल घडवून आणण्याची सुरुवात आहे.

मला आठवते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात एक संदेश येथूनच दिला होता. ज्यामुळे संपूर्ण देशात वेगळे वातावरण निर्मान झाले होते. अनेक आंदोलनांची सुरुवात येथून झाली, आणि देशाच्या इतिहासाने ती स्विकारली. आजच्या वातावरणात नितीश कुमार यांनी बैठक बोलविली आणि सर्वजण येथे उपस्थित राहिले. बैठकीत जी चर्चा झाली त्यात सर्वांनी एकत्रीतपणे काम करण्याचे ठरविण्यात आले आहे. यामुळे आम्हाला एक नवा रस्ता दिसू लागला आहे. मला विश्वास आहे देशाची जनता याचे समर्थन करेल, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

 बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'तानाशाही' म्हणत भाजपच्या मोदी सरकारला लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले,  "सर्वांना एकत्रित केल्याबद्दल नितीश कुमार यांचे आभार. देशातील प्रमुख पक्षांचे प्रमुख आज इथे एकत्र आले आहेत. कश्मीर ते कन्याकुमारीपासून सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वांना माहिती आहे की, वेगवेगळे पक्ष आहेत, विचार वेगळे आहेत पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी आणि देशाची एकता तथा अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. याच्यापुढे देशाच्या प्रजातंत्रावर जो कोणी आघात करेल त्याचा आम्ही विरोध करू. जे देशद्रोही आहेत आणि तानाशाही लावू पाहत आहेत त्यांना आम्ही विरोध करूच. तसेच विचारधारा वेगळी असली तरी देशाला  वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मोदी देशाला हुकुमशाहीकडे नेत आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. भाजप गरजेप्रमाणे रंग बदलते, 

लालूप्रसाद यादव म्हणाले- नरेंद्र मोदी चंदन वाटप करत फिरत आहेत. गोध्रा घटनेनंतर अमेरिकेने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना येथे येण्यास नकार दिला होता. त्यांच्या लोकांनाही भारतात जाण्यास नकार देण्यात आला. तुटलेल्या करारावर देश उभा आहे. आम्ही भेंडी घ्यायला जात नाही. भेंडी 60 रुपये किलो असल्याची माहिती आहे. पीठ आणि तांदळाची किंमत तुम्हा सर्वांना माहीत असेल. या देशात लोक हनुमानजींचे नाव घेऊन, हिंदू-मुस्लिमचा नारा देत निवडणुका लढवतात. कर्नाटकात हनुमानजींनी पाठीवर अशी गदा मारली की राहुलचा पक्ष जिंकला. हनुमानजी आमच्यात सामील झाले. आम्ही सर्व नल-नील गोळा करत आहोत. यावेळी हे निश्चित आहे... हे लोक गेले आहेत. भाजप आणि मोदींसाठी हे खूप वाईट असेल.

 काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्व नेते एकत्रित आले. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकजूट झाले. पुढील निवडणुका कशा लढायच्या याबाबत कॉमन अजेंडा बनवण्यात येईल. त्यानंतर पुढील महिन्यात १० किंवा १२ जुलैला हिमाचल प्रदेशातील शिमला इथं पुन्हा विरोधकांची बैठक होईल. वेगवेगळ्या राज्यात आम्हाला समान कार्यक्रमाची भूमिका घ्यावी लागेल. सर्व रणनीती आखून निर्णय घेऊ. हीच एकजूट ठेऊन २०२४ ची निवडणूक लढायची आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढायचा यात आम्हाला यश आले. आजची बैठक नितीश कुमार यांनी बोलावली, त्यांचे धन्यवाद देतो. भारत जोडो यात्रेतून आम्ही ज्याज्या ठिकाणी गेलो तिथले सगळे नेते आजच्या बैठकीला उपस्थित झालेत असं खरगेंनी सांगितले.

पाटण्यातून जी सुरुवात होते त्याचे पुढे जनआंदोलन होते, दिल्लीत आमच्या बैठका झाल्या पण निष्फळ ठरल्या. आता पाटणातून बैठकीला सुरूवात झालीय. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही एकत्रितपणे लढाईला सामोरे जाऊ. आम्ही देशाचे नागरिक, देशभक्त आहोत, मणिपूर जळण्याने आम्हालाही वेदना होतात. भाजपाचं हुकुमशाही सरकार आहे. भाजपाविरोधात जो बोलेल त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआयचा वापर केला जातो. तपास यंत्रणांचा दबाव आणून विरोधकांना दाबले जाते. बेरोजगारी, सामान्य जनतेचा विचार नाही. आर्थिक समस्येवर बोलत नाही. विकास निधी दिला जात नाही. भाजपा जितके काळे कायदे आणतील त्याविरोधात एकत्रित लढाई करू. रक्त सांडले तरी चालेल देश वाचवू असं ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर म्हटलं.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. “आम्ही गांधींच्या भारताला गोडसेचा देश होऊ देऊ शकत नाही.” महात्मा गांधींनी सांगितलेल्या आदर्शांचे जतन करण्यावर त्यांनी यावेळी भर दिला. तसेच गांधींच्या आदर्शाला मोडून काढणाऱ्यांच्या विरोधात प्रतिकार करण्याचा निर्धार देथील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव म्हणाले, मी आता शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झालो आहे, आणि मोदींना ‘फिट’ करण्याची वेळ आली आहे. देशातील जनेतची इच्छा आहे, आम्ही भाजप आणि आरएसएसविरोधात एकजुटीने लढले पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com