चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशेचे परिणाम- दुष्परिणाम यांच्याविषयीची माहिती घाटकोपर अंमल पदार्थ विरोधी कक्षाच्यावतीने देण्यात आली. हया अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशेमुळे बाधित झालेली व्यक्ती शारीरिक, मानसिक, आथिर्क, सामाजिकदृष्ट्या उध्वस्त होत असते. याशिवाय या अंमली पदार्थांचे सेवन करणा्या, तस्करी करणांया व्यक्तीस १० ते २० वर्षेाची शिक्षा भोगावी लागते. यासाठी विद्यार्थ्यांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राघवेंद्र लोंढे यांनी सांगितले.
: तसेच या महाविद्यालयातील १२वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस अधिकारी आणि पथक यांनी अंमली पदार्थ विरोधी( नशेबाजी विरोधी) शपथ ही घेण्यात आली.
: यावेळेस नालंदा एज्युकेशनल संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी सोनल शेंडकर, प्राचार्या डॉ. छाया मित्तल, एन एस एस च्या समन्वयक दिपीका फुलवाडिया, ज्युनियर कॉलेजचे इनचाज् मोबिन सर, आरती मॅडम, विद्यार्थी समन्वयक फिरोज इनामदार सर, तसेच प्रभाग क्रमांक १५०च्या माजी नगरसेविका संगिता ताई हंडोरे, इम्रान पटेल सर, उज्ज्वला म्हात्रे मॅडम, शैलेंद्र धांडोरे सर, प्रमिला शेळके मॅडम, मनिषा मकवाना मॅडम, राहुल थोरात सर, मदनलाल पाल सर, दिलीप कुमार शहा सर आणि घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राघवेंद्र लोंढे, हवालदार चौगुले, गोरे, कानडे, आणि म्हात्रे आदी पथकाने सहभाग घेतला होता.
: सुरेश गायकवाड
, ९२२४२५०८७३
0 टिप्पण्या