मागील आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये एका पाठोपाठ एक अशा धक्कादायक घटना घडल्या. यामध्ये बहुजन वर्गातील अनेक तरुण तरुणींना आपला जीव गमवाला लागला. नांदेड जिल्ह्यामधील बोढार गावामधील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्याची जयंती साजरी केली ह्याचा ठपका ठेऊन अक्षय भालेराव ह्या बौध्द समाजातील युवकाची येथील गावगुंडांनी निघृण हत्या केली. त्यानंतर मुबंई येथील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले हॉस्टेल मध्ये इंजिनियर शिकत असणारी बौद्ध समाजातील हिना मैश्राम हिची सुध्दा वैदिक नराधमानी अत्याचार करून निघृणपणे हत्या केली. तसेच कल्याण मधील बौद्ध समाजातील मोहित गायकवाड ह्याची सुध्दा गावगुडांनी निघृणपणाने हत्या केली.
मात्र येथील शासन प्रशासन याबाबत अद्यापही गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात येत नसून शासन केवळ चालढकल करण्यात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अद्यापही या प्रकारातील आरोपी किंवा त्यांना प्रोत्साहीत करणा-या मास्टरमांइड गुंडांचा शोध घेण्यात येत नाही या विरोधात आज रविवार दि. ११ मे रोजी मुंबईतील शिव रेल्वे स्थानकासमोर धारावीतील अनेक संस्था संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रशासनविरोधात निदर्शने करण्यात आली. ह्या संपुर्ण घटनेचा व कुचकामी, बेजबाबदार सरकारचा तमाम जनतेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून अक्षय भालेराव, हिना मेश्राम, मोहित गायकवाड ह्याच्या मारेकरानां तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक पध्दतीने खटला चालवुन लवकरात लवकर त्याना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे, तसेच नितीन दिवेकर, सुनिल जाधव, प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशनच्या गौतमी जाधव यांच्यासह संजीवन जैस्वार, प्रतिक कांबळे तसेच सदिच्छा सामाजिक संघटना , लोकनिर्माण फाऊंडेशन, सुकेशनी महिला बचत गट आदी संस्था संघटनांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या