छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलशाही येण्याऐवजी पेशवाई कशी काय आली ? “प्रसिद्ध इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणतात की , ‘छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या नियमानुसार करण्यात आली आहे’.
१) अंगाची कातडी सोलने
२) हातापायाची नखे , बोटे तोडने
३) नाक , कान , जीभ तोडने
४) कानात शिसे ओतने
५) डोळ्यात सळई खुपसने
६) संपूर्ण शरीरावरती वार करणे
७) संपूर्ण हातपाय , शीर धडावेगळे करणे
८) डोक्याचे केस कापणे
९) संपूर्ण शरीराचे बारीक बारीक तुकडे करने
छत्रपती संभाजी महाराजांनी बालवयातच सर्व शिक्षण पूर्ण केले होते , लहान वयातच त्यांनी चार-चार ग्रंथ लिहिले , अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची युद्धनीती मोठमोठ्या राजा लोकांना प्रभावित करत असे , त्यांनी केलेल्या एकाही युद्धात त्यांना पराभवास सामोरे जावे लागले नाही , मग प्रश्न हा निर्माण होतो की , एवढा मोठा पराक्रमी राजा शत्रूच्या सहजासहजी कसा हाती लागतो ? स्वराज्याचे दुश्मन कोण होते ? कोण फितूर झाले ? कोणी महाराजांना पकडून दिले ?
१) औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली असेल ? तर महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे किंवा मुस्लिमांचे राज्य येण्याऐवजी पेशवाई कशी काय आली ?
२) छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी करणारे महार जातीचे लोक होते , त्यांच्या अंत्यविधीसाठी एक ही मराठी सैनिक आणि पेशवे नव्हते , असे का ?
पेशव्यांनी आणि काही फितूर लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले आणि त्याचे खापर मात्र मुस्लिम लोकांवर फोडण्यात आले. मुस्लिम त्यावेळेस ही निष्ठावंत होते , आणि आजही आहेत. परंतु स्वराज्याचे दुश्मन कोण होते ? ज्यांनी कोटी चंड यज्ञ केला , ज्यांनी ‘स्वराज्याची धुळधाण व्हावी’ असे म्हटले तेच खरे ऐतिहासिक आणि वर्तमान काळातील शत्रू होय , सध्या काही लोकं हिंदू आणि मुस्लिम दंगली घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत , त्यांचा हा डाव प्रत्येक शिवप्रेमींनी हाणून पाडावा , त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलशाही येण्याऐवजी पेशवाई कशी काय आली ? यावर सर्व कुणबी- मराठा बांधवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे”.
- निरंजन लांडगे. ....भारत मुक्ति मोर्चा
0 टिप्पण्या