Top Post Ad

चंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मीची दादरमध्ये निदर्शने

 


 भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनेचे संस्थापक अॅड चंद्रशेखर आजाद यांच्यावर काल उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज मुंबईसह राज्यभरात उमटले.मुंबईत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर येथे जोरदार निदर्शने करीत आजाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली.

आजाद यांच्या गाडीवर काल सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात आजाद  गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.भीम आर्मीसह विविध सामाजिक राजकीय पक्ष संघटनांनी सदर घटनेचा निषेध करतानाच पुणे, लातूर औरंगाबाद जालना नागपूर, बुलढाणा, अकोला,चंद्रपूर, अहमदनगर ,नाशिक,नंदूरबार, सह राज्यभरात रास्ता रोको तसेच निदर्शने केली.

मुबईतील स्वामी नारायण मंदीर दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जोरदार निदर्शने केली.या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे ,महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड,दिनेश शर्मा,विजय कांबळे, संतोष वाकळे,सुशीलाताई कापुरे,सुरेश धाडी,

, बाळू साळे, रमेश बालेश, श्रीकांत धावारे, अविनाश समींदर, विजय कांबळे, प्रकाश पाईकराव ,अमोल निकाळजे,मिलिंद चिंचवलकर,

यांच्यासह जाती अंत चळवळीचे सुबोध मोरे ,शाहीर सुरेंद्र बर्वे,संदेश गायकवाड, सुनील कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करून कडक कारवाई करावी ,सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच आजाद यांना त्वरीत झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन  आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीसांमार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

 


दरम्यान  येत्या २४ तासात गुन्हेगार अटक न झाल्यास राज्यभरात सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी दिला आहे सर्व आंदोलन कर्त्यांना  माटुंगा पोलीसांनी ताब्यात घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com