Top Post Ad

गुंड सावकाराचा मातंग व्यक्तीवर अमानूष अत्याचार

 


नादेड येथील बोंढार या गावात संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटनेला आठवडाही उलटला नसताना आज लातूर येथील रेणापूर मध्ये एका सावकाराकडून अवघ्या 3 हजार रुपयांसाठी गिरीरत्न तबकाले या मातंग तरुणाची हत्या करण्यात आली. गेल्या 4 दिवसात ह्या 2 घटना घडल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना या घटनेची साधी दखल घ्यायला वेळ नाही.  याबाबत सर्वत्र संपात व्यक्त करण्यात येत असून या विरोधात लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. 

गिरीरत्न तबकाले या हिन्दु मातंग व्यक्तीने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली. तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले. हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात तबकाले यांचा मृत्यू झाला. 

फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना घडणे हे अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी बाब आहे..! दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्ताडलेल्या हरामीने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली. नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?  राज्यातील दलितांवरील होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आरोपींना आम्ही सोडणार नाही. लवकरच राज्यभरात दलित अत्याचाराच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडणार आहोत. - आमदार जितेंद्र आव्हाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com