विज्ञान तंत्रज्ञान विषयात निर्माण होणार आवड
: ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६० आणि क्रमांक ११२ मध्ये अमेझॉन वेब सर्व्हिसेस तर्फे थिंक बिग स्पेस हा उपक्रम सुरू करण्यात आला असून ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते आणि एडब्ल्यूएसचे साजी पीके तसेच माजी नगरसेवक देवराम भोईर , संजय भोईर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा फायदा वंचित समूहातील तसेच सहा ते १५ वर्षे वयोगटातील २२० हून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित (STEAM) विषयांमध्ये विद्यार्थ्यांची आवड जोपासण्यावर केंद्रित असलेला उपक्रम आहे.
याबाबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, म्हणाले की, “आमच्या महापालिका शाळांमध्ये थिंक बिग स्पेसेस कार्यक्रम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्टीम विषयांमध्ये त्यांची आवड निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे. यामुळे तरुण विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधींची दारे खुली होतील. या कार्यक्रमाचे नाव खूपच प्रेरणादायी आहे. हे विद्यार्थ्यांना मोठा विचार करण्यास आणि मर्यादेपलीकडे स्वप्न पाहण्यास प्रोत्साहित करते. आमच्या विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि क्षमता दाखविणाऱ्या या कार्यक्रमासाठी ठाण्यातील अनेक शाळांमधून या शाळांची निवड केल्याचा आम्हाला आनंद आहे. एकत्रितपणे, आम्ही आमच्या मुलांना या प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यास आणि या विषयात त्यांची जिज्ञासा विकसित करण्यास सक्षम करू.”
अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे जपान आणि चीन एशिया पॅसिफिक डेटा सेंटर ऑपरेशन्स संचालक साजी पीके म्हणाले की," आम्ही जेथे कार्य करतो त्या समुदायांचे जीवन सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. हे वंचित समुदायांच्या अभ्यासाच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते. आमचा हा उपक्रम शालेय मुलांना रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांची ओळख करून देतो आणि त्यांना वर्गात जे शिकतो ते लागू करण्यास मदत करतो. ठाण्यात हा उपक्रम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ठाणे महापालिकेचे आभारी आहोत" असे यावेळी ते म्हणाले.
0 टिप्पण्या