Top Post Ad

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार


खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

 ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी सन २०१४ ला खासदार पदाची धुरा सांभाळल्यानंतर ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी लोकसभेत वारंवार मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. खासदार राजन विचारे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ठाणे रेल्वे स्थानकात आणून प्रवाशांच्या समस्या जाणून दिल्या. त्यानंतर या ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाला भेट देणारे पहिले रेल्वेमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला होता. या ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा पडणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी त्यांनी ऐरोली - कळवा एलिव्हेटेड प्रकल्पाला तसेच ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी दिली असून त्याचे काम सुरु आहे.

ठाणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक करण्यासाठी खासदार राजन विचारे प्रयत्नशील होते. ठाणे रेल्वे स्थानकात अति धोकादायक झालेल्या जुन्या इमारती पाडून स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक हितेन शेट्टी यांच्याकडूनही संकल्प चित्र तयार करून घेतले होते. परंतु रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी या विभागाने पी. के. दास असोसिएट या वास्तु विशारद याची नियुक्ती करून श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर, ठाणे, कल्याण व ठाकुरली या ५ रेल्वे स्थानकांचा नियोजित मास्टर प्लॅन तयार केला होता. या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने ३६०० करोड निधी मंजूर केला आहे. त्यापैकी श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्थानकासाठी २५०० कोटी मंजूर झाले असून याचे कामही सुरू झाले आहे व ठाणे रेल्वे स्थानकासाठी ९८३ कोटी मंजूर करण्यात आले असून जानेवारी २०२४ पर्यंत काम सुरू होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी शुक्रवार दि. ०९ जून २०२३ रोजी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा रेल्वे अधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात आला. तत्पूर्वी रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथोरिटीचे डी जी एम श्री खोत यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यावेळी खासदार राजन विचारे, , जिल्हाप्रमुख केदार दिघे,  उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, कृष्णकुमार कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे,  सचिव संजीव कुलकर्णी, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, तुषार रसाळ, संजय दळवी, अमोल हिंगे, रमेश शिर्के, अनिता घोंगे, राजू शिरोडकर युवासेना अधिकारी किरण जाधव, कोपरी पाचपाखाडी विभाग अधिकारी राजेश वायाळ, मध्य रेल्वेचे मुख्य प्रकल्प अभियंता पैठणकर, रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथोरिटीचे विभागाचे डीजीएम श्री खोत, स्टेशन डायरेक्टर डॉ. अरुण प्रताप, स्टेशन मास्तर केशव तावडे, महापालिकेचे स्मार्ट सिटीचे सुधीर गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, आर पी एफ व जी आर पी सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार राजन विचारे यांनी आपल्या पाहणी दौऱ्यात ठाणे रेल्वे स्थानकाच्या सादरी करणानंतर येणारा पावसाळा लक्षात घेता ठाणे रेल्वे स्थानकातील ठाणे महापालिकेच्या सहाय्याने रेल्वे मार्फत पब्लिक पादचारी पुलाचे काम निधी अभावी रखडले होते. यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा करून उर्वरित निधी लवकरात लवकर रेल्वेकडे जमा करावा जेणेकरून पादचारी पुलाचे काम मार्गी लागेल. यासाठी  फलाटावरील काढलेले पत्रे पुन्हा बसवावे असे अधिकाऱ्यांना बजावले. अधिकाऱ्यांनी १० ते १५ दिवसात काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच खासदार राजन विचारे यांनी शौचालयाच्या अस्वच्छतेवर नाराजी व्यक्त करून प्रवाशांकडून बेसुमार पैसे लुटणाऱ्या कंत्राटी ठेकेदाराला धारेवर धरले.

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या प्रतीक्षा कक्षाची पाहणी करून त्या ठिकाणी महिलांसाठी व पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावे अशी मागणी त्यावेळी केली. वाहतूक शाखेच्या पोलिसांना तसेच स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडथळा ठरणारी वाहने येथे उभे करून देऊ नका अशी तंबी त्यांना दिली. खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्या. रेल्वेच्या फेऱ्यात वाढ, शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी व सरकते जिने, सुरक्षा यामध्ये वाढ करून काळजीने लक्ष घ्या असे सांगितले.


खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम बाजूस सॅटीसचे काम सुरु झाले आहे. नागरिकांना दुचाकी व चारचाकी वाहनांना ये-जा करण्यासाठी कनेक्टीव्हिटीचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात यावा. अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी RLDA चे डी जी एम खोत यांच्याकडे केली. याचे काम २०२४ ला सुरु होणार असून ५ ते ६ वर्षामध्ये काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

तब्बल १७० वर्षांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
सदर पुनर्विकास रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी विभागामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी ९८३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना फलाटावर उभे राहण्यासाठी अपुरे पडणारे फलाट तसेच प्रवाश्यांना आपला प्रवास सुखकर होण्यासाठी एअरपोर्ट च्या धरतीवर स्थानकांचा विकास होणार आहे. आर एल डी ए ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ठाणे रेल्वे स्थानकातून एका तासाला ५२ हजार ५०० प्रवासी ये-जा करीत असतात. तर दिवसाला सहा ते सात लाखाहून अधिक प्रवासी ये-जा करीत असतात. या सर्वेक्षणामध्ये सन २०६२ ला दहा लाखाहून अधिक प्रवासी ये जा करीत असतील याचा विचार करून ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे.


पहिल्या टप्प्यात - प्लॅटफॉर्म लेव्हल  - प्रवाशांना अपूर्ण पडणारी फलाट तोडून एकूण 25 हजार 500 स्क्वेअर मीटर मध्ये डेव्हलपमेंट करणार आहे.
रूप प्लाझा लेव्हल - 52 हजार 500 स्क्वेअर मीटर जागेवर डेव्हलपमेंट होणार आहे प्रवाशांना लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधां असणार आहेत. त्या पुढील प्रमाणे – प्रतीक्षाकक्ष, शौचालय, एक्झिक्यूटिव्ह लाँच, केटरिंग साठी स्टॉल,
दुसरा मजला - १३ हजार ५०० स्क्वेअर मीटर डेव्हलपमेंट होणार असून त्यामध्ये शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट व इतर सुविधा यांचा समावेश असणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात- पश्चिमेस असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे वसाहतींच्या जागेवर व इतर कार्यालयांच्या जागेवर पी पी पीच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यामध्ये ३ कमर्शियल टॉवर उभारण्यात येणार आहे. त्या बदल्यात रेल्वे वसाहतीतील १६४ घरे, मल्टी लेवल पार्किंग असणार आहे.

दुचाकी १८०० /  चार चाकी १५०० असणार आहे याची कनेक्टिव्हिटी मेट्रोला ही देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com