Top Post Ad

जॅकच्या हत्या करणाऱ्याला फाशी दया


   जॅक हा खूप हुशार, प्रेमळ, लाडका. तो लहानपणापासून मस्तीखोर, हट्टी, कुठे ही जात नव्हता. मात्र वयात आल्यावर तो शेजारील श्रीनगर सोसायटीत जात असे. तेथे असलेल्या सवंगड्यांसोबत खेळत असे.त्या वेळी त्याचेवर हल्ला केला जात होता. त्याच्या त्या जखमाची काळजी घेऊन त्याचेवर देवनार पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केला जात असे. माझी मुलगी शितल, मुलगा निखिल, पत्नी सुरेखा आणि मी, त्याची काळजी घेत. त्याची सेवा करीत. तोही लडिवाळपणे खेळायचा, मस्ती करायचा. आणि नेहमी प्रमाणे जॅक त्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान त्या सोसायटीत गेला, ती तारीख होती गुरूवार १ जानेवारी २०२३.

जॅक हा नेहमीप्रमाणे घरी येऊन वाट पाहत होतो. पण तो काही आला नाही. तसा तो एक एक, दोन दोन दिवस येत नव्हता. त्या दिवशी न आल्याने मला राहिले नाही, अगदी बेचैन झाल्याने सोसायटीत जाऊन चौकशी केली. परंतु तेथील चौकीदार काहीच कळू देत नव्हते, काही सांगत नव्हते. अखेर जॅक येथे येत जात होता. तो चिकन मटण खात नव्हता, फक्त कॅट फूड, फिश खायचा. तो अत्यंत हेल्दी असलेला, दोनेक वर्षेाचा असेल. त्या सोडून सोसायटीतील चित्रा नावाच्या इमारतीतील कुणा नतद्रष्टयाने, हत्या करण्या याने त्याला दूधावाटे वा त्याच्या खाऊवाटे त्याला विष दिल्याची माहिती मिळाली.

 कारण तेथील पशुपे्मीला धमकी दिली होती की, मी तुम्हांला धडा शिकवेन, मी कुणा कॅटला सोडणार नाही, आणि त्या बदमाशानेच हत्या केली असणारच असा विश्वास व्यक्त करून या अगोदर ही एक दोन कॅटची अशीच हत्या केली आहे. त्याचे कारण असे कि, मी त्याची पोस्टमॉर्टेमला बॉडी पाठवणार असल्याचे सांगितले असता मला काही कळायच्या आत झाडू मारणा्या,साफसफाई करण्याया महिलेने त्याला तेथून उचलून फेकले. पण कुणा स्वरा नावाच्या व्यकिने त्याचा फोटो काढला असल्याचे सांगितले आणि जॅकच्या फोटोची शहानिशा करण्यासाठी फोटो पाठविला तसा त्या व्यक्तीने जॅकच्या हत्येचा दुजोरा दिला.

जॅकसह इतराची हत्या करण्या्या हत्याराचा शोध घेऊन, त्यांना जेरबंद करून फाशी देण्यात यावी जेणेकरून मुक्या, निष्पाप, प्राण्यांची हत्या करणा्यास माफी देता कामा नये म्हणून मा,न्यायाधीश साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन त्या हत्या करणा्यास जेरबंद करून फाशी दयावी. तरच त्यांना कायदयाचा धाक बसेल, अन्यथा जॅक असेच मारले जातील, त्यांची हत्या केली जातील...

सुरेश गायकवाड, पञकार, ९२२४२५०८७३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com