Top Post Ad

हा तर हिंदू धर्माला बदनाम करण्याचा डाव


 हा हिंदू धर्माला बदनाम करण्याचा डाव आहे. हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? आपण गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱयाला जाहीर आव्हान देत आहोत की त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱया मुलांचे नाव-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. महाराष्ट्रात सध्या धार्मिक विद्वेषातून शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा तर मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहे.  या  संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल, असा  इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.  

त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावित. जर, खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करीत होते?  आता संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरे बंद झाली आहेत. ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले होते; त्यांनी त्यावेळी धर्मांतरे केली होती. कारण स्वत;च्या धर्मात सन्मान नसल्यानेच अनेकांनी धर्मांतरे केली होती. पण, आता धर्मांतरे बंद झाली आहेत. संविधान आल्यामुळे ते अस्पृश्य लोक माणूस म्हणून जगू शकले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आता तुम्ही या संविधानावरच तलवार चालवित आहात. हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण आहेत?  हे सर्व शिजवलेले नाटÎ आहे. महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव समोर दिसत आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून असा फुसका बार सोडण्यात येत आहे. तसेच, कोणाकडून तरी दंगल घडवायची, असे प्रकार सुरु असल्याचा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

आज मुंब्रा, कौसा, शिळ या भागात 5 कोटी चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. या घरांची विक्री मोठÎा प्रमाणात होत असतानाच अशा खोटÎा बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उद ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मांतराची ही बातमी खोटी आहेच; पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे. महाराष्टाची निवडणूक जिंकायची आहे म्हणून काय पातळीवरचे राजकारण केले जात आहे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे. मग, जितेंद्र आव्हाड तिथे आहेत. मग, आपल्यावर तलवार चालवायची. माझ्या एकटÎासाठी  काय काय करणार आहात? 

हे सर्व शिजवलेले नाटÎ आहे. महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव समोर दिसत आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून असा फुसका बार सोडण्यात येत आहे. तसेच, कोणाकडून तरी दंगल घडवायची, असे प्रकार सुरु आहेत. आपण चार महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, महाराष्ट्रामध्ये दंगल घडविली जाणार. त्याची पार्श्वभूमी ही राजकीय असेल. भाजपचे राजा नामक नेते येऊन केले. त्यांनी नागरिकांना भडकावले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, जो कोणी धर्मद्वेष पसरविणारे भाषण करेल. त्याच्या विरोधात तक्रार आली नाही तरी पोलिसांनी त्या भाषणावर त्वरीत गुन्हा दाखल करावा. ठाणे पोलिसांनी आजवर का गुन्हा दाखल केला नाही.  हा गुन्हा दाखल न करणाऱया पोलिसांना निल़ंबित करणार का?

  काय चालविले आहे? तुमच्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही महाराष्ट्रात जाळून टाकाल. हा वणवा आहे. त्यामध्ये सर्वच जळून खाक होतील. आपले स्पष्ट म्हणणे आहे की, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी महाराष्ट्राला सांगावे की गाझीयाबादमधून पोलीस अधिकाऱयाने जे सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे? अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करुन हिंदू-मुस्लीम यांचा एकत्रित मोर्चा काढू. 

आमचे शहर असे बदनाम होऊ देणार नाही. या शहाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून येथे सर्व धर्मिय लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा शहराला बदनाम करणे योग्य नाही. आपण मुंब्रा शहराचे प्रतिनिधीत्व करीत असल्यानेच मी हा जाब विचारत आहे. अन् मी संविधानावर हात ठेवून धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे ज्या शहरात असे धर्मांतर घडलेच नाही. त्याची बदनामी करणाऱयाला भरपाई करावीच लागेल. या प्रकरणात सरकारला उत्तर द्यावेच लागेल. ज्या पद्धतीने केरळ स्टोरीमध्ये 32 हजार मुलींची खोटी कथा सांगण्यात आली. तसाच हा प्रकार आहे, असेही डॉ. आव्हाड म्हणाले.  

दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना मारण्याचा कट रचला आला होता, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अमोल केंद्रे आणि रोहिदास मुंडे यांना मारण्यासाठी कट रचण्यात आला होता. सुदैवाने ते त्यांच्या हाती लागले नाहीत म्हणून बचावले. भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कट रचले जात असतील तर काय होणार या शहराचे? , असा सवाल डॉ. आव्हाड यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com