Top Post Ad

विश्वविजेता "चक्रवर्ती सम्राट अशोक" यांची प्रतिमा लवकरच दिक्षाभूमीवर......


  विश्वविजेता "चक्रवर्ती सम्राट अशोक"  यांची प्रतिमा लवकरच दिक्षाभूमीवर..

तामिळनाडू तील "बुद्धिस्ट फॅटरनिटी मुव्हमेन्ट" या संस्थेतर्फ चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा हा 10 फूट उंच ब्रांच चा पुतळा बनवण्यात आला आहे आणि हा पुतळा दीक्षाभूमीवर स्थानापन्न करण्यात येणार आहे.केरळ राज्यातून निघालेली ही धम्म यात्रा  दि.21/10/2023 रोजी नागपूर मधील दीक्षाभूमीवर पोहोचणार आहे. सोबत हजारो लोक अशोक विजयादशमी दिनी दीक्षाभूमीवर धर्मांतर करणार आहेत.

तामिळनाडू मधील "बौद्ध बंधुता परिषद" ही गेल्या वीस वर्षांपासून बुद्धविचारांचा प्रचार व प्रसार करणारी संस्था आहे. त्यातील चेन्नईचा एक तरुण, डॉ. भारती प्रभू ज्यांचा PhD चा विषय होता "तमिळ साहित्यावर बुद्धविचरांचा प्रभाव" यांनी एक मोठा संकल्प सोडला आणि तो आकारास आला आहे.
येत्या धम्मचक्कपवत्तन दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी वर, सम्राट अशोक यांचे ब्राँझ धातूचे 10 फूट उंचीचे शिल्प उभारण्यात येणार आहे.  या शिल्पात सम्राट अशोक हे तलवार (हिंसा) त्यागत असून बुद्ध धम्म जवळ करीत आहे हे गांधार शैलीच्या धर्तीवर आधारित आहे.
सदर शिल्प ते सब्रिमलाई ते नागपूर (महाराष्ट्र)... अशा 6 राज्यातून 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान धम्मयात्रेद्वारे नागपूर येथे येत आहे.  या शिल्पासाठी सुमारे 12 लाखाहून अधिक खर्च झाला आहे. जनमानसातून मदतीद्वारे हा निधी उभारण्यात आला असल्याची माहीती डॉ. भारती प्रभू (9087259401) यांनी दिली आहे.
-------------------------

 नागांच्या नागभूमीत जगज्जेते चक्रवर्ती विश्वसम्राट प्रियदर्शी महान अशोक
भारतात महान अशोकांचे अशोकराज्य अर्थात धम्मशासन पुनर्स्थापित करायचे आहे.
महान अशोकांचा भारत निर्माण करायचा आहे.
                  जगाच्या / पृथ्वीच्या सर्वाधिक भूभागावर राज्य करणारे , आपली हुकूमत निर्माण करणारे जागतिक इतिहासातले जगातले एकमेव चक्रवर्ती विश्वसम्राट ,  ज्यांच्या काळात भारत पहिल्यांदा व शेवटचा जागतिक महासत्ता बनला होता , ज्यांच्या काळाला सुवर्णयुग म्हणल्या जाते , ज्यांच्या काळात भारतात सोन्याचा धूर निघत होता , ज्यांच्या काळात भारताला सोने की चिडीया म्हणत , तुकड्या-तुकड्यांमध्ये खंडित झालेल्या भारताला एकाच सूत्रात बांधणारे , केवळ माणसांकरिताच नव्हे तर जनावरांसाठी सुद्धा दवाखाने निर्माण करणारे करुणामयी विश्वसम्राट  , आपल्या प्रजेच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधणारे ,रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणारे , तथागत गौतम बुद्धांच्या महान मानवकल्याणकारी विचारांची जगभर प्रसार आणि प्रचार करणारे , तथागतांच्या महान विचारांना लेण्यांच्या माध्यमातून दगडांवर कोरून ठेवणारे महान धम्माशासक , देवनामप्रिय चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणूनच स्थान दिले आहे. 

प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच अखंडित भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत.

           सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते , ह्या शिलालेखातूनच भारताचा व त्याकाळचा सत्य इतिहास समजला.ह्या शिलालेखांमध्ये महान अशोकांनी स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध हे त्यांच्या जीवनातला एक महत्वाचा परिवर्तनीय टप्पा ठरला.कलिंग युद्धानंतर त्यांचे झालेले मनपरिवर्तन, त्यांनी स्वीकार केलेला बौद्धधम्म, बौद्ध धम्माची तत्त्वे आणि एकूणच धम्मप्रसाराचे कार्य , महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हे ह्या  काळातील भारतातील पहिले व शेवटचे चक्रवर्ती राजा होय. सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय.सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने त्यांनी अनेक उपक्रम राबविले.

          साऱ्या जगाच्या इतिहासात चक्रवर्ती विश्वसम्राट प्रियदर्शी महान अशोकांसारखा महान प्रशासक कोणी झालाच नाही आणि भविष्यातही कोणी होणार नाही , इतकं महान कार्य अशोकांनी करून ठेवलंय. अश्या ह्या भारताच्या महान सुपुत्राचा १० फूट उंच पुतळा नागभूमीत अर्थात नागपूरच्या दीक्षाभूमीवर अशोका विजयादशमी दिनी म्हणजे २४ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थापित करण्यात येणार असून, सदरहू ऐतिहासिक क्षणानिमित्त तमाम सुज्ञानी प्रबुद्ध भारतीयांना महामंगल सदिच्छा.
मा.राजेश गवळी 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com