Top Post Ad

या महिलांकडे मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष

 


 महाराष्ट्र राज्यातील आरोग्य उपकेंद्रातील महिलांचे भर तळपत्या उन्हात किमान वेतनसाठी दहा दिवसांपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन .... राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप 

राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील १० हजार ६७३ महिला परिचर महाराष्ट्र दिन १ मे पासून संपावर गेल्या आहेत. गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील महिला परिचर भर तळपत्या उन्हात किमान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. दरम्यान गेल्या १० दिवसांपासून सरकार कडून या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

     महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ यांच्यावतीने राज्य सरकारकडे सातत्याने किमान वेतनसह इतर मागण्या करण्यात येत होत्या, त्यासाठी प्रशासकीय बैठकाही आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु त्यावर तोडगा निघत नव्हता. अखेर या महिला परिचर १० दिवसांपासून संपावर गेल्या आहेत. त्यामुळे उपकेंद्र आरोग्य केंद्राच्या क्मकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. आरोग्य उपकेंद्रातील शेकडो महिला राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. गेल्या दहा दिवस त्यांना मुंबईत रहावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्याकडील पैसेही संपले आहेत. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून त्यांच्या आंदोलनाची दखल अद्याप ही दखल न  गेल्याने महिला आंदोलक सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

     ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी यांना १४ हजार पगार,पाणीपुरवठा कर्मचारी यांना मासिक १७ हजार रुपयांपर्यंत वेतन, अंगणवाडी सेविका यांच्याही मानधनात वाढ केली असताना आरोग्य उपकेंद्रातील परिचर या दिवस रात्र राबत असतानाही त्यांना किमान वेतन का नाही? असा सवाल महिला परिचर महासंघाच्या राज्य अध्यक्ष मंगला मेश्राम यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1