Top Post Ad

पत्रकारांना मारहाण केली जाते ही अतिशय गंभीर बाब

 मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासमोरच पत्रकारांना जबर मारहाण झाल्याचा प्रकार चुनाभट्टी येथे घडला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम सुरु असतानाच हा प्रकार घडला.  मुंबई महानगरपालिकेच्या महिलांना यंत्रसामुग्री वाटप कार्यक्रमातील हा दुर्दैवी प्रकार आहे. कार्यक्रमाच्यावेळी काही पत्रकारांनी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढल्याने उपस्थित राजकीय गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास देखील नकार दिला. 

चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात पालिकेच्या महिला-बाल कल्याण विभागाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंतत्री यांच्या हस्ते शहरातील 27 हजार गरजू महिलांना यंत्रसामुग्री वाटप केले जाणार होते. या कार्यक्रमात कोणतीही यंत्रासामुग्री मिळणार नाही, फक्त कूपन दिले जाणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिलांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच महिला कार्यक्रमातून निघून जाऊ लागल्या. मैदानातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. 

त्याचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना राजकीय गुंडांनी मारहाण केली. या पत्रकारांना चुनाभट्टी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गुंडांच्या घोळक्यातून बाहेर काढले. हे गुंड पोलिसांवरही धावून जात होते. पोलिसांना न जुमानता त्यांची गुंडगिरी सुरू होती. जिगरबाज पोलिसांमुळे या पत्रकारांचा जीव बचावला. पोलिसांना न जुमानता गुंडांकडून पत्रकारांना मारहाण होत असताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर होते. 

मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राज्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे.पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन याबाबत कारवाई करण्याची गरज आहे. राजकीय व्यक्तींनी देखील अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनी देखील कार्यकर्त्यांना आवर घालणे आवश्यक आहे. असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

----------------------------------------------


  पत्रकारांचे शोषण कोणी थांबवेल का ? कोणी पत्रकारांची बाजू मांडून न्याय मिळवून देईल का ? काही मोठे पत्रकार ज्यांचे लाखो फोलोवर असून देखील राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय व फक्त मोठमोठ्या नेत्यांविषयी , राजकारणाविषयी बोलणाऱ्यानी निदान शोषण होणाऱ्या कंत्राटी पत्रकारांविषयी पण बोलला तर बरं होईल ? आपल्या दृष्टीने हा विषय एवढा महत्वाचा नाहीये का ? मी व अजून पण या सगळ्या शोषणाचा बळी आहेत.

★ संपादक,मालक व काही मिडिया कंपनीचे अधिकृत व्यक्ती कोणी सांगेल का ? काही ग्रामीण व शहरी कंत्राटी (स्ट्रेंजर्स)पत्रकार जेव्हा जॉइंट होतात.★तेव्हा वर्षभर काम करणाऱ्या ग्रामीण व शहरी कंत्राटी पत्रकारांना पगार 2500/ 5000/10000 हा पगाराचा भाव चालू आहे हे खरं आहे का ??? याविषयी आपलं काय म्हणणं आहे ? 1. कंत्राटी पत्रकाराना (स्ट्रेनजर्स) ऑफर लेटर देतात का?आय कार्ड देतात का ? पत्रकारिता सोडून सेल्स करायला, ऍड आणायला सांगतात का ?
2.शासनाच्या नियमाप्रमाणे किमान पगार किती देतात का? 3.पगार कधी दीड महिन्याने तर कधी दोन महिन्याने कधी वेळेवर तरी देतात का? 4.गाडी भाड्याचा होणारा खर्च देण्याविषयी दर महिन्याला काही पॉलिसी केली आहे का ? 5. पी.एफ तरी देतात का ? 6.नेहमी फिल्डवर बातमी कवर करायला जाताना, स्ट्रेनजर्स पत्रकारांना अचानक कधी अपघात किंवा आजारी पडून हॉस्पिटलाईस झाले किंवा मृत्युमुखी पडले तर मेडिक्लेम इन्शुरन्स ,अपघाती इन्शुरन्स किंवा ग्रुप टर्म इन्शुरन्स देतात का ?
वरीलपैकी ग्रामीण व शहरी कंत्राटी पत्रकारांना काय देता ,काय नाही कृपया सांगितले तर बरं होईल.
★ संपादक,मालक साहेब पत्रकार वाट बघताहेत आपण गप्प न राहता या महत्वाच्या विषयी आतातरी बोलाल आणि न्याय द्याल ???
★एकच अपेक्षा संपादक,मालक साहेब आपण एक मॅनेजमेंटचा,कंपनीचा एक भाग आहात म्हणून हा विषय मनावर घेऊन पत्रकारांच्या अडचणी लक्षात घेतल्या तर पत्रकारांना न्याय मिळायला नक्कीच मदत होईल नाहीतर पत्रकारांच्या अडचणी कधी आणि कशा संपणार ? सांगा आपणच...

लोकशाहीचे चार स्तंभ १.लोकसभा विधिमंडळ २.न्याय पालिका ३.प्रशासन ४.प्रसारमाध्यमे.जनमत घडवण्यात प्रसार माध्यमांचा महत्वाच्या भूमिकेमुळे प्रसारमाध्यम लोकशाहीचा सर्वात महत्वाचा चौथा आधार स्तंभ आहे.पण याच प्रसार माध्यमातील बरीच वर्ष काम करणाऱ्या काही ग्रामीण व शहरी स्ट्रेंनजर्सना (कंत्राटी पत्रकार) जनतेवर अन्यायाची दखल घेऊन महत्त्वाची बातमी गोळा करायला दिवस रात्र एक करावा लागतो.तेव्हा जाऊन कुठे प्रसार माध्यमांचा टी. आर.पी. वाढायला मदत होते.पण त्यामागे उन्हातान्हात, पावसाळ्यात,हिवाळ्यात कसली परवा न करता फिल्डवर,डेस्कवर काम करणाऱ्या या पत्रकारां मुळे महत्वाच्या बातम्या मिळाल्यामुळे शक्य होतं.

पण या पत्रकारांना संपादक , मॅनेजमेंट कडून मिळतं काय तर जेमतेम कमी पगार , गाडी भाडं नाही ,इन्शुरन्स नाही( मेडि क्लेम व ग्रुप टर्म इन्शुरन्स ).सतत फिल्डवर उन्हातान्हात झळा लागत असतानाही जोखीम पत्करून नेहमी बातमी घेऊन येणाऱ्याना देतात काय ? हे संपादकांनी स्वतः सांगावं की ते सतत एसी केबीन सोडून बाहेर ,ऑफिसबाहेर स्वतः महिन्यातून किती वेळा बाहेर पडतात ? जे पत्रकार फिल्डवर,डेस्कवर,लाईव्ह काम करून जोखीम घेऊन बातमी कवर करणाऱ्या , आणणाऱ्या पत्रकाराला कमीत कमी कमी शासकीय नियमाप्रमाणे किती पगार,गाडी भाडे ,इन्शुरन्स ( मेडी क्लेम , ग्रुप टर्म इन्शुरन्स ) देतात ? संपादक स्वतः एक दिवस नाही तर बहुतेक वेळेला फिल्डवर गेल्यावर समजेल की प्रवास खर्च किती वाढलाय. प्रवासखर्च,घर चालवायला व कुटुंबाच्या सुरक्षे साठी किती गाडी भाड्याची, पगाराची व इन्शुरन्सची गरज असते ? कारण आपले सुरवातीच्या काळातले दिवस संपादक झाल्यावर फिल्डवरचे ,डेस्क वरचे दिवस विसरले नसतीलच ? म्हणून एकच अपेक्षा संपादक साहेब आपण मॅनेजमेंटचा एक भाग आहात म्हणून हा विषय मनावर घेऊन पत्रकारांच्या अडचणी लक्षात घेतल्या तर न्याय मिळायला नक्कीच मदत होईल नाहीतर पत्रकारांच्या अडचणी कधी आणि कशा संपणार ?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com