Top Post Ad

कृत्रिम-नैसर्गिक संकटात: मदतीचा बळकट हात!


 (आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन विशेष)

  रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गरजूंना आपातकाळी सेवा देते. ही संस्था रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकले असलेल्या लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे कार्य करते. रेडक्रॉस मोहिमेचे जन्मदाते जीन हेन्री ड्यूनेन्ट यांचा जन्म दि.८ मे १८२८ रोजी झाला. त्यांच्या जन्मदिन संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक रेडक्रॉस दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. ही संस्था तब्बल दीडशे वर्षांपासून काम करीत आहे. ही संस्था नैसर्गिक आणीबाणी प्रसंगी अडकलेल्या गरजूंना आपली निःस्वार्थ सेवा देत असते. सदर ज्ञानवर्धक लेख श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांच्या शब्दांत अवश्य वाचा... संपादक._ 

    भारतात इ.स.१९२०मध्ये पार्लियामेंट्री एक्टच्या अंतर्गत भारतीय रेडक्रॉस समितीचे गठन केले गेले. तेव्हापासून रेडक्रॉसचे स्वयंसेवक आपली निःस्वार्थ सेवा देत आहेत. विश्वाचे तब्बल दोनशे देश एकाच विचारांवर ठाम आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संस्था नैसर्गिक आपदांमध्ये अडकलेल्या लोकांना तसेच युद्धामध्ये घायाळ झालेल्या  वीरांना मदतीचा हात देऊन त्यांना यथोचित साहाय्य करतात. रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गरजूंना आपातकाळी सेवा देते. ही संस्था रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकले असलेल्या लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे कार्य करते. रेडक्रॉस मोहिमेचे जन्मदाते जीन हेन्री ड्यूनेन्ट यांचा जन्म दि.८ मे १८२८ रोजी झाला. त्यांच्या जन्मदिन संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक रेडक्रॉस दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. ही संस्था तब्बल दीडशे वर्षांपासून काम करीत आहे. ही संस्था नैसर्गिक आणीबाणी प्रसंगी अडकलेल्या गरजूंना आपली निःस्वार्थ सेवा देत असते. 

     रेडक्रॉसचा मुख्य उद्देश्य रुग्णाची, युद्धामध्ये घायाळ झालेल्या लोकांची सेवा करणे आहे. सन १९१९पासून रेडक्रॉस मानवाचा त्रास कमी करण्याकडे विशेष लक्ष देत आहे. हेन्रीने सेवाकार्यात वाहिलेल्या या समितीला रेडक्रॉस नाव दिले. या समितीची ओळख पटण्यासाठी एका पांढऱ्या पट्टीवर लाल रंगाच्या क्रॉस चिन्हाला मान्य करण्यात आले. आता हे चिन्ह संपूर्ण विश्वात मानवास समर्पित निःस्वार्थ सेवाभाव म्हणून ओळखले जाते. पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर अधिक चिन्हासारखी तांबडी फुली हे या संघटनेचे बोधचिन्ह असून त्यावरूनच संघटनेचे ‘रेडक्रॉस’ हे नाव पडले आहे. द्यूनां हे स्वत्झर्लंडचे नागरिक असल्याने त्या देशाच्या सन्मानार्थ त्याच्या तांबड्या पार्श्वभूमीवरील पांढरी फुली असलेल्या राष्ट्रध्वजावरच्या रंगांची अदलाबदल करून हे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे. इस्लामी राष्ट्रांत तांबड्या फुलीऐवजी पांढऱ्या पार्श्वभूमीवर चंद्रकोर- रेडक्रेसेंट तर इराणमध्ये उगवता तांबडा सूर्य व सिंह- रेड लायन अँड सन तर इज्राईलमध्ये तांबडा डेव्हिडचा तारा असा या बोधचिन्हात बदल केलेला आहे. हे बोधचिन्ह असलेली वाहने, इमारती तसेच ते धारण करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर गोळीबार, बाँबफेक अथवा हल्ला करू नये, असेही ठरविण्यात आलेले आहे. अर्थात अशा वाहनांत वा इमारतींत युद्धसाहित्य अथवा सैनिक असता कामा नये. अशा प्रकारे संरक्षण योग्य ठिकाणे व व्यक्ती ओळखू येण्यासाठी हे चिन्ह वापरतात. आता तर हे चिन्ह वैद्यकीय व्यवसायाचेही निदर्शक झाले आहे.

     सध्याच्या काळात १८६ देशांमध्ये रेडक्रॉस समिती कार्य करीत आहे. सन १९०१ साली हेन्री ड्यूनेन्ट यांना त्यांच्या सेवाभावास पहिले नोबल शांती पारितोषिक देण्यात आले. विश्वाची पहिली ब्लड बँक- रक्त पेढी अमेरिकेमध्ये सन १९३७ साली उघडली गेली. आजच्या काळात जगातील जास्तीत जास्त ब्लड बँका रेडक्रॉस आणि त्यांच्या सहयोगी संस्था राबवत आहेत.  रेडक्रॉस संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे हजारो लोक थॅलेसेमिया, कर्करोग, रक्ताल्पता- एनिमिया यासारख्या आजारांपासून वाचत आहेत. रेडक्रॉस संघाच्या रूग्णसेवा कार्यालयात सन १९५१ साली समाजसेवा विभाग समाविष्ट करण्यात आला. हा विभाग माहिती विषयक सेवा पुरवितो. रेडक्रॉसच्या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार निवडतो व सल्ला देतो. तसेच रेडक्रॉस रूग्णसेवा शाळा, रूग्णपरिचारिकांचे मदतनीस व गृहरूग्णसेवा शिक्षक यांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करतो. संघाच्या प्रादेशिक परिषदांमुळे राष्ट्रीय संस्थांना विविध देशांसमोर येणाऱ्या सामाईक अडीअडचणींच्या माहितीची देवाणघेवाण करता येते. जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना, अन्न व कृषि संघटना, युनेस्को इत्यादींची उद्दिष्टे व रेडक्रॉसची उद्दीष्टे यांत बऱ्याच बाबतींत सारखेपणा असल्याने संघ त्यांच्याशी संपर्क ठेवून असतो व त्यांच्याशी सहकार्यही करतो. संघाचे वेगळे कनिष्ठ रेडक्रॉस कार्यालय असून त्याच्यातर्फे कनिष्ठ विभागांना साहाय्य देण्यात येते. राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांमार्फत ७५ पेक्षा अधिक देशांमध्ये मुख्यत्वे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे कनिष्ठ विभाग संघटित करण्यात आलेले आहेत. विविध वंशांच्या भिन्न संस्कृतींत वाढणाऱ्या मुलांमधील मैत्री व परस्परांविषयीची जाणीव वाढविणे, हेच या विभागांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

!! विश्व रेडक्रॉस दिनाच्या सर्वांना प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

  •  कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
  • (भारताच्या वैभवशाली इतिहास-अस्मितेचे गाढे अभ्यासक.)
  • मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
  •  जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com