रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील जे.एस.डब्ल्यू साळाव कंपनीने येथील चेहेर मिठेखार, निडी परिसरातील शेतकऱ्यांसोबत केलेल्या सामंजस्य कराराचे उल्लंघन केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना निवेदन देत मागणी केली आहे.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी सिकॉम करिता महाराष्ट्र शासनाने भूसंपादन करून भाडेपटट्याने घेतलेल्या जमिनीवर १९८९ मध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज यांचा विक्रम इस्पात हा प्रकल्प वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड यांनी विकत घेतला होता तदनंतर हा कारखाना JSW स्टील लिमिटेड, साळाव या कंपनीने अधिग्रहित केला परंतू सुरवातीला वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड व वरील जमीन मालक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये सन २०१० साली सामजस्य करार करण्यात आला होत मात्र वर नमूद कारखानदाराने या करारामध्ये नमूद सर्व अटींचे वारंवार उल्लंघन करीत शेतकऱ्यावर अन्याय केला असल्याने वरील गावांमधील १२६ शेतकन्यांवर गेल्या ३२ वर्षांपासून होत असलेल्या अन्यायामुळे अखेर आमच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी आम्हाला परत द्यायची मागणी केली असून कंपनीला जर आमच्या जमिनी पाहिजे असतील तर त्यांनी दलालांसोबत चर्चा करण्याऐवजी थेट शेतकऱ्यासोबत चर्चा करावी अशी मागणी असल्याचे या शेतकऱ्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
याबाबत अन्याय दूर करण्यासाठी व पुढील लढा लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी चेहेर, मिठेखार, निडी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून यापुढे शासन, प्रशासन तसेच JSW स्टील लिमिटेड वा ईतर कोणाशीही चर्चा, विनिमय वचेहेर, मिठेखार, निडी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती साळाव रोहा, ता. मुरुड, जुने चेहेर, जि. रायगड वाटाघाटी किंवा आंदोलनात्मक भूमिका घेण्याकरिता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत कायदेशीर प्रतिनिधी म्हणून रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष नागा ठाकूर अजय चवरकर, अॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन. अॅड. विनायक शेडगे, मुरुड तालुका अध्यक्ष आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी यांची निवड करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मॅक्सस्टील लिमिटेड कंपनी यांच्याशी सन २०१० साली सामजंस करार झाला होता. त्यानंतर जेएसडब्ल्यू या कंपनी विक्रीनंतर हस्तांतरीत करण्यात आला होता. या सामजंस करारानुसार प्रकल्पबाधित यांना मोबदला आणि त्यांना कुंटूंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही स्थानिक यांना रोजगार अथवा नोकरी मिळालेली नाही. या करारानुसार नमूद सर्व अटींचे उल्लंघन करण्यात आले आहे. सध्या १२६ शेतकऱ्यांवर गेल्या ३२ वर्षापासून अन्याय होत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते संतोष नागा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. कराराचे पालन होत नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला परत कराव्यात,अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
एका बाजुला हा प्रकल्प उभा रहावा,यासाठी गावक-यांनी विकासासाठी रोजगार निर्मिती व्हावी,त्यासाठीच या जमिनी देण्यात आल्या आहेत.परंतु रोजगारच उपलब्ध होत नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला परत करण्यात आल्या पाहिजे, यासाठी आमचा आता व्यापक लढा सुरु झाल्याची माहिती अँड. सिध्दार्थ इंगळे यांनी दिली.
मुंबई, रायगडच्या मुरुड तालुक्यातील चेहेरे, मिठेखार ,निडी, वाघुळवाडी,साळाव,नवीन चेहरे या गावातील प्रकल्पबाधित यांना अद्यापही नोक-याच मिळालेल्या नाहीत,त्यामुळे उद्रेक दिसत असून जेएसडब्ल्यू कंपनीचे मालक जिंदाल यांच्याविरोधात अनोखे आंदोलन छेडण्याचा इशाराच प्रकल्पबाधित यांनी दिला आहे.
यावेळी अजय चवरकर,विनायक शेंडगे हे मुंबई मराठी पत्रकार परिषदेत पत्रकारांना याबाबतची माहिती देताना उपस्थितीत होते.
0 टिप्पण्या