Top Post Ad

दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात जातीभेदाच्या घटनांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

 


दर्शन सोळंकीच्या कुटुंबियांचा आरोप

मुंबई

१२ फेब्रुवारी २०१३ रोजी माझा मुलगा दर्शन सोलकीचा मृत्यू झाला त्याला आज जवळपास तीन महिने उलटून गेलेत, जो आयआयटी बॉम्बे मधील बी.टेक (केमिकल) प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता, तो सदर शिक्षण संस्थेत तीव्र जातीय भेदभावाचा सामना करत होता त्याच्या मृत्यूनंतर पवई पोलिसांनी जातीभेदाचा पुरावा असतानाही प्राथमिक माहिती अहवाल (FIR) नोंदविण्याऐवजी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि त्यानुसार तपास सुरु केला. नंतर वाढत्या सार्वजनिक दबावामुळे आणि डॉ. मुणगेकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची मागणी केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठीच्या सदर पथकात  लखमी गौतम, सह पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग), मुंबई, उपाध्याय, पोलीस उपायुक्त, आणि भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.  मात्र अनेक नोंदी आणि प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध असतानाही जातीभेदाच्या घटनांकडे दुर्लक्ष करीत या प्रकरणाची चौकशी एसआयटी करीत असल्याचा आरोप आज दर्शन सोळंकी यांच्या कुटुंबियांनी केला. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्यसभा पूर्व सांसद डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले, आज दि. ११ मे रोजी  मुंबईतील प्रेस क्लब येथे या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. 

सोशल माध्यमाद्वारे इन्स्टाग्रामवर दर्शनचे काही संवाद उपलब्ध आहेत. हे संवाद आम्ही एसआयटीच्या चौकशीकरिता वारंवार मागत असूनसुद्धा एसआयटी याकडे दुर्लक्ष करीत आहे.  याबाबत दर्शन सोळंकीचे चॅट तपासल्यास अधिक पुरावे मिळू शकतात. जे दर्शनच्या आत्महत्येस कारणीभूत ठरले आहेत. याआधीही दर्शन जेव्हा आम्हाला भेटायला आला होता तेव्हा त्याने काकींना सांगितले की मला तिथे दलित दलित म्हणून हिनवले जात आहे. सुरुवातीला ही मित्रमंडळी माझ्यासोबत चांगली होती. मात्र जेव्हा त्यांना कळले मी एस.सी.मधून आहे तेव्हा ते माझ्यापासून दूर जाऊ लागले आणि मला चिडवत होते. याबाबत त्याच्या काकीने ही बाब तुझ्या वडलांना का सांगत नाहीस असे विचारले असता ते मला कॉलेजमधून काढतील मला तिथेच शिकायचे आहे. म्हणून मी सांगत नाही असे सांगितले होते. मात्र या सर्व बाबी एसआयटी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दर्शन सोळंकीचे वडील आणि त्याची बहिण यांनी केला आहे. 

दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी एफआयआर नोंद करण्यासाठी आमच्या कुटुंबाला अतोनात संघर्ष करावा लागला असून, सातत्यपूर्ण जातीभेदभावाच्या घटनामुळे आम्हाला चिंता वाटत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात दर्शनाची बहीण, जान्हवी सोलंकी, सोशल मीडियावर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असताना दर्शनाच्या सोशल मीडिया खात्यावर गेली, इस्टाग्रामवरील "सँग राजपूत" या एका अकाऊंटवरून ती दर्शनाच्या चॅटमध्ये आली (२७ फेब्रुवारी २०१३ रोजी, दर्शनच्या निधनाच्या काही दिवस आधी सँम राजपूतने दर्शनला त्याच्या आयआयटी-जेईई रेक (गुणवत्तायादी क्रमांक) बद्दल विचारले होते. तेव्हा दर्शनने त्याला त्याची जेईई बैंक सांगितली. त्यानंतर, दर्शनने चॅटमध्ये सांगितले की मला आता दर्शनची बँक माहित असल्याने, त्यालासुद्धा कदाचित दर्शन यापुढे आवडणार नाही, आरक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांना अवाजवी फायदा मिळतो, असे सॅमने समजू नये, असेही दर्शन पुढे म्हणाला. दुसऱ्या व्यक्तीला 'सुद्धा' आपण आवडणार नाही अशी दर्शनने व्यक्त केलेली भीती हे आमच्या कुटुंबाला चिंतेचे कारण वाटते. यातून हेच सूचित होते कि दर्शनाच्या आयआयटी-बॉम्बेमधील अनुभवानुसार, तो राखीव श्रेणीचा विद्यार्थी असल्याचे समजल्यानंतर  तेथील  मित्रमंडळींनी त्याच्यासोबत हेवेदावे करणे सुरू केले. त्याच्या जातीवरून  टोमणे मारले गेले, तो अलिप्त आणि बहिष्कृत राहण्याच्याच योग्यतेचा होता हे त्याला दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याचाच परिणाम त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. त्याला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला याकडे निर्देश करणाऱ्या आजवरच्या अनेक आधीच उघड झालेल्या पुराव्यांच्या साखळीतला हा आणखी एक पुरावा आहे.

या नवीन पुराव्यामुळे आयआयटी- बॉम्बेमध्ये दर्शनाला झालेल्या जातीय भेदभावाबाबत यापूर्वीच सादर केलेल्या अनेक साक्षीमध्ये भर पडली आहे. या साक्षीमध्ये आयआयटी बॉम्बेमथील माजी विद्यार्थी उदयसिंग मीना, दर्शनाची बहीण जानवी सोलकी आणि त्याची काकी दिव्यावेन सोलंकी यांच्यासह कुटुबातील सदस्यांनी दिलेल्या जबाबांचा समावेश आहे. या सर्वांनी आपापल्या निवेदनात दर्शनला त्याच्या जातीमुळे त्रास दिला जात असल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्याच्या रूममेटकडून होणाच्या त्रासामुळे त्याला त्याची रूम बदलायची होती. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इतर विषयांच्या ज्ञानाबद्दलच्या प्रश्नाबद्दल त्याच्या समवयस्क मित्रांनी त्याची थट्टा केली होती. दर्शनाची जात समजल्यावर त्यांनी त्याला बहिष्कृत केले, त्याच्याशी संवाद कमी केला आणि अनुसूचित जातीच्या वर्गाचा असल्यानं त्याचा अपमान केला. दर्शनने त्याची बहीण जानवीला सांगितले होते की जेव्हा त्याच्या सोबतच्या विद्यार्थ्यांना कळले की तो अनुसूचित जाती समुदायाचा आहे, तेव्हा ते तो त्यांच्यात सोबत अभ्यासासाठी किंवा जेवणासाठी सामील व्हायला आल्यावर त्याला दलित आला, दलित आला असे चिडवत. अनुसूचित जाती वर्गातील त्याच्या वर्गमित्राने आयआयटी बॉम्बे अंतर्गत समितीला नमूद केले आहे की दर्शन त्याच्या जातीबद्दल संवेदनशील होता आणि आयआयटी बॉम्बे सारख्या संस्थेत शिकत असलेल्या आरक्षितवर्गातील विद्यार्थ्याबद्दल इतर कार्य विचार करतील याचा अनेकदा विचार करत असे. 

दर्शनाला त्याच्या रूममेट, वर्गमित्र आणि संस्थेतील इतर लोकांकडून जातीय भेदभावाचा सामना करावा लागत होता आणि ज्याचा त्याच्यावर गंभीर परिणाम झाला होता, हे या साक्षीमधून समोर आले आहे, याकडे लक्ष वेधणान्या सर्व साक्षीपुराव्याकडे SIT ज्या प्रकारे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, ती बाब अत्यंत संशयास्पद आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि जातीय अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करणारी एसआयटी जातिभेदाच्या दृष्टिकोनातूनही याकडे पाहत नाही आणि त्याऐवजी एका वेगळ्या प्रकरणात सर्व दोष एका विद्यार्थ्याच्या माथी मारला आहे. एसआयटी या जबाबांच्या अनुषंगाने तपास का करत नाही आणि ते विद्यार्थी आणि व्यक्ती कोण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न का करत नाही ज्यांनी दर्शनशी त्याच्या जातीवरून भेदभाव केला आणि त्रास दिला? त्याच्या संगणकीय ज्ञानाची कोणी खिल्ली उडवली, दलित आला, दलित आला असा टोमणा त्याला कोणी मारला किंवा कोणामुळे त्याला त्याची खोली बदलायची होती हे शोधण्याचा ते प्रयत्न का करत नाहीत? दर्शनचा छळ करणारे आणि त्याच्या दलित ओळखीच्या आधारे त्याच्याशी भेदभाव करणारे हे विद्यार्थी कोण आहेत? चौकशीत त्याची नावे अद्याप का आली नाहीत?

दर्शनाला भेडसावणारा जातिभेद आणि त्याचा त्याच्यावर झालेला परिणाम याकडे लक्ष वेधणारे भरभक्कम पुरावे असताना एसआयटी दर्शनाला सामोरे जावे लागलेल्या जाति आधारित भेदभावाच्या घटनांना बाजूला सारत आहे हे पाहणे अत्यंत भयावह आहे. दर्शनाला त्याच्या वर्गमित्र आणि रूममेट यांच्याकडून मिळालेल्या जातीभेदपूर्ण वागणुकीच्या शक्यतेला नाकारणारा SIT चा निष्कर्ष सुचवणारे माध्यमांचे अलीकडचे वृत्तांकन हस्तलिखीत चिठ्ठीतल्या एका विद्यार्थ्याच्या नावाआधारे आहे. (जेव्हा कि ते हस्ताक्षर कोणाचे माझा आणि माझी मुलगी जानवी यांच्या मते विवादित आहे). एक राखीव प्रवर्गातील विद्यार्थी या नात्याने झालेल्या छळामुळे दर्शनची हत्या करण्यात / आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे मत आहे, हे त्या संदर्भातील "भरघोस पुराव्यांवरून स्पष्ट होते.

पवई पोलिस स्टेशनच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दर्शनच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांनी त्याच्याकडील इतर वस्तूसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे (त्याचा मोबाइल फोन, लॅपटॉप आणि पेनड्राइव्हसह) जप्त केली. मात्र, वारंवार मागणी करूनही कुटुंबाला जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती देण्यात आलेल्या नाहीत. तपासाच्या आडून त्याला जातिनिहाय भेदभावाचा सामना करावा लागला होता असे दाखवणारी अशी आणखी उदाहरणे दडपली जातील अशी भीती कुटुंबाला वाटते.

दर्शनाला होणारा जातीय भेदभाव हा पैलू बाजूला सारून ज्या पद्धतीने तपास केला जात आहे आणि त्याबाबत आमच्या कुटुंबाला अंधारात कसे ठेवले जाते हे पाहणे अत्यंत चिंताजनक आहे. हे पाहता SIT आणि पोलिस अधिकार्याकडून करण्यात येत असलेला तपास आत्मविश्वास निर्माण करत नाही आणि केवळ IIT बॉम्बेमध्ये दर्शनाला झालेल्या जाती-आधारित भेदभावावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुटुंबाने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला तक्रार पत्रे लिहिली आहेत. ज्यात चालू तपासात जातीय भेदभावाचा पैलू बाजूला सारला जाऊ नये आणि महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून आमच्या कुटुंबाला न्याय मिळेल. यासाठी प्रसार माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावे अशी आर्त हाक दर्शनच्या वडीलांनी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

यावेळी कॉ.सुबोध मोरे यांनी देखील सुुरवातीपासून इथली पोलिस यंत्रणा या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा कसा प्रयत्न करीत होती. यासाठीच पोलिस एफआयआर नोंद करीत नव्हती. आजही पोलिस या कुटुंबाला अपेक्षित असलेला एफआयआर नोंदवून घेत नाहीत या मागे कुणाचा हात आहे. हे आता जाहिर झालं पाहिजे.  इतकंच नव्हे तर लोकसत्तामध्ये छापून आलेला लेख हा नवीन नसून तो यापूर्वी विवेक मध्ये छापून आल्याची माहितीही मोरे यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com