Top Post Ad

पेपर आणि टिव्ही करमणुकीची साधने!


   आम्ही जागृत जनमंच ची टीम  जळगाव शहरात व जिल्ह्यात काम करते.पण जिल्ह्यातील पत्रकार प्रसिद्ध करीत नाहीत.पण  राजकीय चोरांचे मोठमोठे फोटो पेपर च्या खाली सांडतात.गुन्हेगारांचे फोटो पेपरच्या पहिल्या पानावर छापतात.त्यामुळे पेपर आणि टिव्ही हे न्यायाचा समतोल राखण्याचे साधन राहिले नाही.श्रीमंतांचे कौतुक आणि गरीबांची अब्रूची चिरफाड पेपरमधे जास्त असते.खरे म्हणजे चोरांची अब्रूची चिरफाड आणि गरीबांच्या हक्काचे रक्षण पेपर मधे छापले पाहिजे.पण तसे होताना दिसत नाही.म्हणून आम्ही सोशल मीडिया चा वापर करतो.त्यात चांगला प्रतिसाद मिळतो.तुमच्या पर्यंत पोहचतो.तुम्ही आमच्या पर्यंत पोहचले.    आम्ही चुकलो नाही तरीही पेपरमधे आमचीच चूक लिहितात.आम्ही निर्दोष असलो तरीही बातमी छापत नाहीत.

    जळगाव महापालिका मधे बोगस लोकशाही दिन दाखवून अहवाल पाठवला जात असे.आम्ही दोन लोकांनी असाच एक लोकशाही दिनाचे पोस्ट मार्टेम केले.तर आमच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आयपीसी ३५३,फाईली फाडणे वगैरे आरोप लावून एफआयआर नोंदवली.लांचखोरी व कामचोरी हे सुद्धा सरकारी काम आहे.असा त्यांचा व पोलिसांचा अभ्यास आहे. जळगाव महापालिका मधे लोकशाही दिन नव्हताच.फक्त पेपरमधे बातमी देऊन अहवाल बनवायचा होता.आम्ही याबाबत तक्रार केली होती. कोर्टात सर्वच आरोप निराधार ठरले.निर्दोष ठरलो.त्याची बातमी जळगाव मधील पेपरने छापली नाही.

पण आम्ही हाणामारी केली नाही.कोणत्याही कार्यालयात शिरलोच नाही.फाईली तर नव्हत्या.फाडणे वगैरे चा संबंध येतच नाही.तरीही जळगाव मधील आठ पेपरमधे अर्धा पान बातमी छापली होती.अशी खोटी बातमी महानगरपालिका महापौर व आयुक्त यांनी पैसे देऊन छापून आणली होती.अट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला.पण कोणी कर्मचारी तयार झाला नाही म्हणून फसला.एका घेंगट नावाच्या माणसाला उभे केले.पण तो त्या दिवशी ,त्या वेळेस हजर नसल्याने ते ही फसले.शिवाय तो कोर्टात साक्ष देताना बोलला की,माझा या केस शी काहीच संबंध नाही.माझी यांचे विरोध काहीच तक्रार नाही.मी तक्रार नोंदवलीच नाही.तेंव्हा कुठे न्यायाधिश महोदयांनी सत्य ओळखले.आम्हाला निर्दोष सोडले.    जळगाव महापालिका असे खोटे काम करते,पेपर त्यांना साथ देतात.तर जळगाव कोणी सावरायचे?दिल्ली , मुंबई च्या लोकांनी?खडसे, महाजन, भोळे यांनी जळगांव सावरले कि लुटले?हे उघड उघड सांगण्याची वेळ आली आहे.

     पेपर मधे सर्वच माहिती गोलमाल असते.श्रीमंत चोरांच्या विरोधात आम्ही बोललो तरीही चकार छापत नाहीत.जळगांव शहरातील ईच्छा देवी चौक ते डी मार्ट रस्ता अर्धवट असतांना आमदार सुरेश भोळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी श्रेय उपटण्याचे बैनर झळकावले. रस्ता बनला नाही आणि क्रेडिट घेतले.जसा काही,भोळे आणि महाजन यांनी त्यांचे शेत आणि घर विकून रस्ता बनवला.आम्ही जळगाव जागृत जनमंच ने यांचा उहापोह केला.व्हीडीओ व्हायरल केला.हा व्हिडिओ महाराष्ट्र व विधानसभेत सर्वच आमदारांनी एकमेकांना दाखवला.महाजन व भोळे यांची छी थू झाली. भोळे आणि महाजन यांनी ते बैनर ताबडतोब उतरवले.पण एकाही पेपर ने ही बातमी छापली नाही.यात पेपर ची कामगिरी व हेतू लक्षात येतो.म्हणून ही माध्यमे आता करमणुकीची साधने उरली आहेत.ते काम अमिताभ बच्चन व गौतमी पाटील सुद्धा करतात.माध्यमांपेक्षा उत्तम.पण ते करमणुक करतात,हे तरी खरे खरे सांगतात.उघड उघड सांगतात.

  • ... शिवराम पाटील...९२७०९६३१२२
  • महाराष्ट्र जागृत जनमंच...जळगाव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com