Top Post Ad

वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्टच्या वतीने बुद्ध पोर्णिमा उस्थाहात साजरी

 


वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्धांचा 2567 वा जयंती सोहळा तापड़िया नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मे रोजी संपन्न झाला.

            कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माननीय भदंत डॉ. पोरनचाई पालवधम्मो (अध्यक्ष, वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. न्या. सी. एल. थुल (माजी अध्यक्ष, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई, महाराष्ट्र), मा. डॉ. मिथिला चौधरी ( जॉइन्ट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट), मा. डॉ. सबूज बरूआ (उपाध्यक्ष, वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट), मा. आमदार संजयजी शिरसाट यांची उपस्थिती होती.

           कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कला प्रदर्शनाने झाली. संबोधी अकादमीच्या प्रशिक्षणार्थींनी प्रथम बुद्धवंदनेने कला प्रदर्शनास सुरुवात केली. प्रशिक्षणार्थींनी प्रार्थना सादर केल्यानंतर पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झाले.

त्यानंतर बुद्धमूर्ति पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न झाले.

            प्रमुख अतिथी भदंत डॉ. पालवधम्मो, मा. न्या. थुल, आणि मा. आमदार संजय शिरसाट यांचे स्वागत संबोधी अकादमीचे संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांनी केले. डॉ. मिथिला चौधरी यांचे स्वागत संबोधी अकादमीच्या महाव्यवस्थापिका प्रा भाग्यश्री सातदिवे यांनी केले. डॉ. सबूज बरूआ यांचे स्वागत संबोधी अकादमीचे तज्ज प्रशिक्षक प्रा. साईनाथ बोराळकर यांनी केले.

          मा. नगरसेवक हुशारसिंग चव्हाण हे वाल्मिकी समाजाचे नेते कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. काही दिवसांनी ते आपल्या वाल्मिकी बांधवांच्या सोबत धम्म दीक्षा घेणार असल्याचे समजले. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

          त्यानंतर संबोधी अकादमीच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा धावता आढावा घेतला गेला. कार्यक्रमाची प्रास्ताविका भीमराव हत्तीअंबीरे यांनी सादर केले. प्रास्ताविकेनंतर आमदार शिरसाट यांनी श्रोत्यांना संबोधित केले. बुद्धांची शिकवण, त्यांचा त्याग आणि सध्या सत्तेसाठी व संपत्तीसाठी लोकांची खटाटोप यातील विरोधाभास त्यांनी दाखवून दिला.

            डॉ. सबूज बरूआ यांनी छ. संभाजीनगर शहराविषयी आणि इथल्या बौद्ध अनुयायी संख्या पाहून कुतूहल व्यक्त केले आणि पुन्हा एकदा भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली.

            डॉ. मिथिला चौधरी यांनी सांस्कृतिक कला प्रदर्शनातील संबोधी अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले आणि अकादमीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणातील कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. मा. न्या. थुल यांनी भिमराव हत्तीअंबीरे यांच्यासह केलेल्या एकत्रित कामांचा थोडक्यात आढावा घेतला आणि इथून पुढेही सहभागाची तत्परता दाखविली.

            सर्वात शेवटी कार्यक्रमाचे मुख्य अतिथि भदंत डॉ. पालवधम्मो यांनी बुद्ध धर्माची गरज आणि महती सांगितली. बुद्धाच्या धर्तीवर आल्याबद्दल त्यांनी धन्यता व्यक्त केली आणि सभागृहातील अनुयायांना धम्मदेसना दिली.

            मान्यवरांच्या मनोगतानंतर संबोधी अकादमीच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे केंद्राचे महाव्यवस्थापक प्रा. भाग्यश्री सातदिवे, समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर हरकळ, तज्ज प्रशिक्षक प्रा. साईनाथ बोराळकर, डॉ कैलास फुलउंबरकर, प्रा. संजय बिडवे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा अनिल नाईक, प्रा विठल पुंगळे, प्रा बोरसे पाटील, प्रा मंगेश लोंढे, प्रा अमोल तळणकर,प्रा चांदोरीकर, प्रा जितेंद्र तरटे,प्रा राज्याराम जेवे, अकादमीचे इतर तज्ञ प्रशिक्षक आणि व्यवस्थापक राजेश पवार, पवन चव्हाण,अर्जुन बनसोडे, कमलेश नरवाडे, आदर्श भवरे,पूजा खटे, शंकर लहणे, संजय डबडे,बाबासाहेब भराडे, विशाल जलारे, सुंदर चव्हाण, महेंद्र काटेकर, प्रशांत मकासारे, अंकुश साळवे आदींनि परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सांगता ही खीर वाटपणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुजारी आणि मेघा इंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन गवई यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com