कोकणाचं (नियोजित 'बारसू-सोलगाव' रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर) काश्मीरशी नातं काय...?
प्रथम एक प्रश्न विचारात घेऊया : काश्मीरमधून ३७० कलम का हटविण्यात आलं?
...याचं खरं उत्तर एकच, ते म्हणजे, "धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाडी-पंजाबी भांडवलदार लोकांना 'पृथ्वीतलावरचा स्वर्ग' असलेला, 'काश्मीर' हवा होता म्हणूनच आणि त्यांचंच तर हे भाजपाई 'भांडवली-सरकार' आहे केंद्रात"!
...त्यांना काश्मीर हवाय; पण, काश्मिरीयत नकोय, काश्मिरी लोकं नकोत"... ज्याप्रकारे अमेरिका, कॅनडातील मूळ आदिवासी (रेड इंडियन्स वगैरे) भूमिपुत्रांचा, गोर्या पाश्चात्य लोकांनी वंशविच्छेद केला; खरंतरं, तसाच या सगळ्या भांडवलदारांना काश्मिरी लोकांचा समूळ काटा काढायचाय... पण, या भारतीय-राज्यघटनेवर आधारित असलेल्या लोकशाहीत, ते त्यांना शक्य होत नाही म्हणून केवळ... अन्यथा, तो ही नरसंहार त्यांच्याकरवी घडवला गेला असता आणि थंड रक्ताच्या या भांडवलदारांनी काश्मीरच्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर लाल रक्ताची चादर पसरवली असती आणि 'दल लेक'सारखा (Dal Lake) लाल 'रक्ताचा लेक' (Blood Lake) निर्माण केला असता.
...अगदी तस्संच, याच लोकांना आमचं निसर्गसुंदर 'कोकण' हवंय; पण, 'कोकणी बाणा' नकोय, कोकणी लोकं तर अजिबात नकोत. ३७० कलम काढून टाकूनही काश्मीरचा अजून 'भारत' न करता आल्याचं, मोठं शल्य त्यांच्या उरात ठसठसतंय... म्हणूनच जबरदस्तीने, हडेलहप्पीने 'कोकणाचा काश्मीर' करायला, ते सरसावलेत... तेव्हा, सावध व्हा! ...आणि, या त्यांच्या नीच कर्माला पाशवी स्वार्थापोटी साथ कोणाची, तर ती स्थानिक हितसंबंधी 'दलाल-राजकारण्यां'ची (ओळखा पाहू)!
या सगळ्याच लोकांची एकत्रित गिधाडासारखी दुष्ट-पैशाचिक नजर केव्हाचीच, महाराष्ट्राच्या 'मर्मबंधातली ठेव' असणाऱ्या, कोकणाच्या अमोघ अशा नैसर्गिक-साधनसंपत्तीवर पडलेली आहे. म्हणूनच, बारसू-सोलगाव तेलशुद्धीकरण-प्रकल्प किंवा जैतापूर-अणुप्रकल्पासारख्या विनाशकारी 'विकास-प्रकल्पां'च्या नावाखाली त्यांना, कोकणी माणसांना हाकलून लावून विस्थापित करायचंय, नव्हे तसं केलं जातं आहेच.
या देशात, गेल्या काही वर्षांत अमानुष आर्थिक-विषमतेचा अक्षरशः कहर माजलाय... अंबानी-अदानीसारख्या शे-दिडशे भांडवलदारांच्या इशाऱ्यावर, हा देश चालवला जातोय आणि त्यामुळेच, गरीब एवढे गरीब होत चाललेत की, कुणीही त्यांना त्यांच्या जमीनजुमल्यासकट कधिही, कसाही खरेदी करु शकतो. हा असाच, दिवसाढवळ्या राजरोस कोकण विकला जातोय, विकला गेलाय... कोकणाची लाल माती, मराठी माणसाच्या मुठीतून-चिमटीतून निसटत चाललीय!
...तेव्हा, जर ही परिस्थिती कोकणी-भूमिपुत्रांसाठी दिवसेंदिवस अशीच अधिकाधिक गंभीर व घातक बनत जाणार असेल... तर, काश्मीरमधून काढलेलं ३७० कलम, या संपूर्ण कोकणात लावा आणि धनदांडग्या परप्रांतीय भांडवलदारांना कोकणात जमीनजुमला खरेदी करायला, नोकरी-व्यवसाय-धंदा-उद्योग करायला बंदी घाला आणि 'विशेष कायदा' (४४व्या घटनादुरुस्तीनुसार 'संपत्ती', हा 'मूलभूत हक्क' नव्हेच) करुन, आजवर कोकणात परप्रांतीय धनदांडग्यांनी विकत घेतलेल्या शेकडो-हजारो हेक्टर जमिनी 'सरकारजमा' करा व तिथे जैववैविध्यपूर्ण सार्वजनिक जंगलं (कोकणातल्या 'देवराई' सारखी) उभारा, ही 'धर्मराज्य पक्षा'ची जाहीर मागणी आहे !!!
...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
0 टिप्पण्या