Top Post Ad

मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील नर्गिस दत्त नगर पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत

 


  मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि आसपासच्या दहा – बारा झोपड्या आगीत भस्मसात झाल्या. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. वांद्रे पश्चिम येथील के. सी. मार्गावर लालमट्टी परिसरातील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत दुमजली झोपड्या असून दहा – बारा झोपड्यांना आगीचा विळखा पडला होता. या आगीमध्ये विद्युत वाहिन्या, लाकडी सामान, कपडे आदी घरातील सर्व सामान जळून खाक झाले.  या ठिकाणी या आधीही अनेक वेळा आगीचे प्रकार घडले आहेत. मात्र यावर कायमस्वरुपी कोणतीही उपाययोजना प्रशासन करीत नसल्याचे दिसून येत आहे. आता या भीषण आगीनंतर नर्गिस दत्त नगरमधील लोकांची नितांत गरज आहे ती म्हणजे पुनर्विकासाची. कारण, येथे आगीने अनेकवेळा भीषण रूप धारण केले आहे.  

 झोपडपट्ट्या आणि शहरातील कलंकित जागा पाहिल्यावर तथाकथित उच्चभ्रू लोक नाक-डोळे मुरडतात. मात्र झोपडपट्ट्या हे शहरी भारतातील नियोजन प्रक्रियेच्या अपयशाचे प्रतीक आहे. शहरांच्या राजकीय-आर्थिक जीवनातील स्थलांतर आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतराचे प्रश्न समजून घेण्यात नगर नियोजक प्रशासन अयशस्वी ठरले आहे. शहरांतील कष्टकरी लोकांसाठी व्यवस्थित जिवनशैली जगता यावी अशी जागा निर्माण अद्यापही निर्माण करण्यात आलीच नाही.  झोपडपट्ट्यांना नेहमीच घाणेरडे ठिकाण म्हणून पाहिले जाते, जिथे गुन्हेगारी आणि रोगराई फोफावल्याची चर्चा नेहमीच रंगवली जाते.  परिणामी त्यांना दूर करण्याचे नेहमीच प्रयत्न करण्यात येतात.  

90 च्या दशकाच्या मध्यात विकासाची मार्गदर्शक चौकट म्हणून नव-उदारमतवाद स्वीकारला गेला. झोपडपट्टीवासीयांच्या ताब्यात असलेली जमीन उच्च मूल्याची मानली जात होती आणि त्यांचे स्थलांतर जवळपास निश्चित होते. झोपडपट्ट्यांचे स्थलांतर सुरू झाले. या नवीन बाजारू मॉडेल अंतर्गत, खाजगी भांडवल जसे की रिअल इस्टेट बिल्डर्सनी झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधण्यास सुरुवात केली. ही घरे एक किंवा दोन मजली असण्याऐवजी, मुंबईतील पुनर्वसन मॉडेलप्रमाणे सुमारे 10-12 मजल्यांच्या उंच इमारती होत्या. 

त्याच प्रमाणे आता वांद्रे नर्गिस दत्त नगरमध्ये 1200 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे. अशी आशा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. झोपडपट्टीवासीयांसाठी त्यांचे स्वप्न साकार करण्याची ही सुवर्णसंधी आहे.  झोपडपट्टी पुनर्विकासाचे मॉडेल आले. म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्यांची घरे त्याच जागेवर बांधली जातील. मात्र अशा प्रकारे तयार केलेल्या जागेचा वापर बिल्डरकडून जमीन रोखण्यासाठी केला जाईल आणि झोपडपट्टीतील रहिवाशांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानंतर ती रिकामी केली जाईल आणि उर्वरित जमिनीवर बांधलेल्या अपार्टमेंटची विक्री व्यावसायिक स्वरुपाने करण्यासाठी वापरली जाईल. 

या पुनर्विकासाची काही मॉडेल्स मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. खाजगी विकासकांनी  घरे बांधली. झोपडपट्टीतील रहिवासी अशा घरांमध्ये राहतात ज्यांना आता जास्त बदलाची आवश्यकता नाही. केवळ जमिनीच्या हक्काचा विकासावर परिणाम होईल. पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते इत्यादी सामाजिक मूलभूत सुविधा पुरविल्या जाव्यात आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा, याची खात्री सरकारने देणे गरजेचे आहे. ही खात्री विकासक आणि प्रशासनाने दिली तर या परिसराचा विकास तात्काळ शक्य आहे. जेव्हा झोपडपट्ट्यांचा प्रश्न येतो तेव्हा आपण येथील नागरिकांना प्राधान्य दिले पाहिजे. या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, स्थलांतर करण्यापेक्षा त्यांना आहे त्या जागेत सशक्त बनवणे गरजेचे आहे.

 वांद्रे येथील नर्गिस दत्त नगर गेल्या अनेक वर्षांपासून एका बिल्डरकडून विकसित होण्याची प्रतीक्षा आहे. ओंकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्सने या झोपडपट्टीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कदाचित भविष्यात येथील नागरिकांचे  आपल्या सुंदर घराचे स्वप्न साकार होईल. चार भिंती आणि छताला फक्त घर म्हणतात. जिथे घरातील सर्व सदस्य सद्भावनेने राहू लागतात. सुख-समाधानाचे जीवन जगतात. अशा प्रकारचा या नगराचा विकास करण्यात येईल अशी आशा आता येथील नागरिकांना वाटू लागली आहे. काम कठीण आहे पण ओंकार विकासकाकडून याच अपेक्षा आता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com