Top Post Ad

ही सर्वात प्रगत शासनव्यवस्था आहे


 राजेशाही, लोकशाही आणि ब्राह्मणशाही... शाही म्हणजे सत्ता, शाही म्हणजे शासन, शाही म्हणजे सरकार. ... मानवी सभ्यतेचा जेव्हापासून विकास झाला तेव्हापासून मानवी समूहास नियंत्रित करण्याकरिता आणि विकासाच्या,प्रगतीच्या व सुरक्षिततेच्या दिशेने चालना देण्याकरिता विविध प्रकारच्या सत्ता, यंत्रणा, व्यवस्था अस्तित्वात आल्यात त्यात लोकशाही ही प्रमुख संस्था आहे, व्यवस्था आहे.  ही सर्वात प्रगत यंत्रणा आहे प्रगत शासनव्यवस्था आहे. 

भारतातील जनतेने प्रदीर्घकाळ राजेशाहीचा अनुभव घेतलेला आहे. इस्लाम धर्मियांनी भारतावर 550 वर्श राज्य केले तर ईंग्रजांनी 200 वर्श राज्य केले आहे. भारतावर अरब  मुसलमान राजवटीचा काळ 1192 पासून सुरु होतो तर मुघल राजवटीचा काळ 1526 पासून म्हणजे जहिरउद्दीन महंमद बाबर  पासून सुरू होतो इराण आणि अरबस्थानातून आक्रमण करणारे आक्रमक म्हणजे अरबमुस्लिम तर मंगोलियातून येऊन भारतावर आक्रमण करून राज्य करणारे हे मुघलमुस्लिम होते हे इथे लक्षात घेतले पाहिजे. मुघलांची राजवट ही राजेशाहीची होती. 

त्यानंतर या देशात इसवीसन 1751 पासून इंग्रजांची राजवट सुरू झाली. अरबांनी व मोगलांची राजवट राजेशाहीची होती तर इंग्रजांची राजवट ही लोकशाही पद्धतीची होती पण या सर्वांच्या राजवटीत  भारतीयांवर सतत राज्य करणारी, भारतीयांना गुलाम करणारी एक अदृश्यशाही लपलेली होती ती म्हणजे आक्रमक आर्यांची ब्राह्मणशाही होय. मोगलशाही  गेली, संपली, इंग्रजी राजवटही गेली,संपली  पण ब्राह्मणशाही आजही जिवंत आहे, सक्रिय आहे आणि आमच्यावर धर्माच्या आणि लोकशाहीच्या माध्यमातून राज्य करीत आहे. हे आम्हाला विसरता येत नाही. आजच्या लोकशाही राजवटीपुर्वीही कधीकाळी  ब्राह्मणशाही उघडपणे राज्य करीत होती तो काळ म्हणजे बुध्दपुर्व काळ, पुष्यमित्र शृंगाचा काळ आणि पेशवाईचा काळ होय.

राजेशाही मध्ये सर्व अंतिम अधिकार हे राजाकडे असतात अंतिम निर्णय हा राजा घेत असतो राजेशाही मध्ये मंत्रिमंडळ असतेच पण मंत्रिमंडळाचा सल्ला मंत्रीमंडळाचा निर्णय राजाला बंधनकारक नसतो. राजेशाहीत राजा हाच सैन्यदलाचा प्रमुख असतो राजा हाच नायव्यवस्थेचा प्रमुख असतो आणि राजा हाच प्रशासन यंत्रणेचाही प्रमुख असतो राजेशाही मध्ये सर्व अंतीम अधिकार राजालाच असतात लोकशाहीमध्ये अंतिम अधिकार संसदेला म्हणजेच लोकप्रतिनिधीला असतात आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र असते,प्रेस मिडिया स्वतंत्र असते. लोकशाहीला राज्यघटनेची चौकट असते ती सर्व शासकीय निमशासकीय व स्वतंत्र संस्थांना बंधनकारक असते जनतेला विशिष्ट असे मूलभूत अधिकार असतात त्या मूलभूत अधिकारांवर राज्यकर्तेसुध्दा बंधने आणू शकत नाही किंवा त्या अधिकाराचा राज्यकर्ते संकोचही करू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर राज्यकर्ते दबाव आणू शकत नाही. 

लोकशाही आणि राजेशाही मध्ये चालणारा कारभार चूकीचा असल्यास लोकांच्या स्पष्ट लक्षामध्ये येतो राजेशाही मध्ये चुकीच्या कारभाराचे खापर शेवटी राज्याच्या डोक्यावर फुटते आणि लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयाचे खापर प्रधानमंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर फुटते लोकशाहीमध्ये याची परतफेड दर पाच वर्षांनी राज्यकर्त्यांना करावी लागते पण ब्राह्मणशाही मात्र या दोन्ही सत्ताव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे ब्राह्मणशाही ही दिसत नाही पण लोकशाहीमध्ये ही लोकशाहीच्या पडद्याआडून काम करते. हुकूमशाही मध्ये हुकूमशहाच्या पडद्यावरून काम करते तर राजेशाही मध्ये राजेशाहीच्या पडद्याआडून काम करते म्हणून मोघलांचे काळात ब्राह्मणवर्गाचे काही विशेष बिघडले नाही कारण शहरांमध्ये आणि गावपंचायतीमध्ये हिंदुधर्मिय समाजाचा न्यायनिवाडा मनुस्मृतीनुसारच होत होता आणि मनुस्मृति ही पुर्णतः ब्राह्मणवर्गाच्या फेवरेबल आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मनुस्मृतीनुसारच शिक्षा देण्यात येत होत्या न्यायनिवाडा करण्यात येत होता. संभाजी महाराजांना  मनुस्मृतीनुसारच शिक्षा करण्यात आली आहे. ब्राह्मणशाही ही दिसत नसली तरी ती सदैव  ब्राह्मणवर्गाच्या हितासाठी कार्य करीत असते, सक्रिय असते म्हणून ती आजही जिवंत आहे आणि सक्रिय आहे. 

इतिहास पडताळून पाहिला तर असे दिसते की ब्राह्मण हा शक्यतोवरी राजा बनलेला नाही,पण राजाचा प्रमुख सल्लागार राहिलेला आहे, प्रमुख पुरोहित राहिलेला आहे. राज्याच्या संपूर्ण कारभार ब्राह्मणाच्या सल्ल्याने व ब्राह्मणांच्या नियमाने चाललेला आहे म्हणून मोहन भागवत म्हणतात की  " सत्तेच्या खुर्चीवर कोण बसले आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही तर सत्तेची खुर्ची ही कुणासाठी काम करते हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे"  

इसवी सन 1720 मध्ये बाळाजी बाजीराव ब्राम्हण हा पेशवा झाला बाळाजी बाजीराव हा पराक्रमी पेशवा होता, लढवय्या होता, पण तो राजा नव्हता तर पेशवा होता पेशवा हा फारसी शब्द आहे  "पेशवा म्हणजे प्रमुख"  बाळाजी बाजीराव पेशवा बनला, त्यावेळी राजा म्हणजे छत्रपती हा साताऱ्याचा शाहू होता पण शाहू हे शाहू नामदार होते आणि राज्याचा संपूर्ण कारभार हा बाळाजी बाजीरावच करीत होता. 

 वर्णव्यवस्थेत ब्राह्मणधर्मानुसार राजाचे स्थान हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे म्हणजेच दुय्यम आहे  आणि ब्राह्मणाचे स्थान हे पहिल्या क्रमांकाचे आहेत म्हणून ब्राह्मण हे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान साधारणतः स्वीकारत नाही ते स्वतःला पेशवा म्हणतील पण राजा म्हणवत नाही छत्रपती म्हणवत नाही बाळाजी बाजीराव पेशव्यांनी ठरवले असते तर त्याने  स्वतःला सहज छत्रपती घोषित केले असते, राजा घोषित केले असते पण  ब्राह्मण तसे करीत नाही कारण हे वर्णव्यवस्थे विरुद्ध होते म्हणजेच ब्राह्मण धर्मा विरुद्ध होते. 

क्षेत्र कोणतेही असो, शिक्षणाचे क्षेत्र असो की प्रेस मीडियाचे राजकारणाचे क्षेत्र असो की न्यायव्यवस्थेचे धर्माचे क्षेत्र असो की प्रशासनाचे ब्राह्मण स्वतःला नेहमी एक नंबर वर ठेवतात तोच त्यांचा धर्म आहे त्याकरता त्यांना निती आणि अनीतीची चाळ नसते ब्राह्मणाला सर्व क्षेत्रात सर्वोच्च स्थानी ठेवणे म्हणजेच प्रथम क्रमांकावर ठेवणे हीच त्यांची नीती आहे आणि जर ते स्वतःला एकनंबर वर ठेवू शकले नाही तर एकनंबर वर असलेल्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात तरी ते ठेवतातच. 

उदाहरणार्थ आज आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही प्रधानमंत्र्याच्या म्हणजेच नरेंद्र मोदींच्या  नियंत्रणात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच ब्राम्हणांच्या नियंत्रणात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसाच्या नियंत्रणात आहेत म्हणजे ब्राम्हणांच्या नियंत्रणात आहेत. ही खरी ब्राह्मणशाही आहे. आज भारताच्या प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रात,राज्यव्यवस्थेत, प्रशासनात, प्रेस मीडियात, न्यायव्यवस्थेत, संरक्षण क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि प्रत्येक क्षेत्रात प्रमुख प्रदांवर ब्राह्मण बसलेला आहे आणि या सर्व ब्राह्मणांचा आपसात योग्य समन्वय आहे कारण हे सगळे ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जुळलेले आहेत. 

आज भारतात लोकशाही ही दाखवायला आहे पण सक्रियपणे कार्य  ब्राह्मणशाहीच करीत आहे  म्हणून भारतात बहुजनांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, अल्पसंख्याकाचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, मागासवर्गीय जातीचे प्रश्न सुटत नाही.  ब्राह्मणशाही ही समुद्रातल्या  आईसबर्ग सारखी आहे ज्याप्रमाणे समुद्रात  आईसबर्गचा फक्त 30 टक्के भाग पाण्यावर तरंगताना दिसतो आणि त्याचा  70 टक्के भाग पाण्याखाली लपलेला असतो आपल्याला दिसत नाही  मग टायटॅनिक सारखे मोठे जहाज धोका खाते व आईसबर्गला टक्कर होवून मोठा अपघात होतो लोक मरतात अशाच प्रकारे ब्राह्मणशाहीचे आहे ब्राह्मणशाही जी  दिसते ती फक्त 30% आहे 70 % त्यांचे कार्य चूपचाप,लपून देव, धर्म, मंदिर व संस्कृतीच्या आडून होत असते. 

आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण करून मुळ भारतीयांची सिंधू संस्कृती नष्ट केली इथल्या मूळनिवासीयांना शूद्र केले म्हणजेच गुलाम केले आणि आजतागायत त्यांनी इथल्या मूळनिवासीयांना शूद्र म्हणजे गुलामच ठेवलेले आहे. तेही ब्राह्मण धर्माच्या म्हणजेच हिंदू धर्माच्या नावाने आज जगात कुठे  गुलामगिरीची प्रथा जिवंत असेल तर ती फक्त भारतात जिवंत आहे, पण अजूनही सामान्य लोकांच्या लक्षात आली नाही एवढेच. ज्याप्रमाणे समुद्रातल्या आईसबर्गचा 70 टक्के भाग जसा दिसत नाही तशीच भारतातली 70 टक्के ब्राह्मणशाही दिसत नाही व बहुजनांना गुलामगिरी समजत नाही पण परिणाम मात्र जाणवतात. ब्राह्मणशाही ही इथल्या माणसाच्या मर्दानगीला, पुरुषत्वाला निकामी  करून टाकते शून्य करून टाकते. ब्राह्मणशाहीने भारतीय पुरुषाला निकस,सत्वहीन, नामर्द करून टाकल्यामुळे 

भारतावर शक, हुन, अरब, मुघल, अफगान,तुर्क, फ्रान्सिसि, इंग्रज एवढेच नाही तरी इतर देशातील गुलाम आणि हब्शीनीं सुध्दा राज्य केले आहे. कां केले ? तर इथल्या सामान्य जनतेला ब्राह्मणशाहीने नामर्द करून टाकले आपसात विभागुन कमजोर करून टाकले ब्राह्मणवाद हा एवढा भयानक आहे की तो तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्यातले सत्व खाऊन टाकतो तो इथल्या सामान्य नागरिकांना शूद्र करून टाकतो आणि वरुन शिकवण  देतो की 

" ठेविले जैसे अनंते तैसेची रहावे ....चित्ती असू द्यावे समाधान " .....यामुळे इथल्ये सर्वसामान्य मुलनिवासी नागरिक वर्षानुवर्ष नशीब संकल्पनेवर विश्वास ठेवून  त्याच अवस्थेत सडत राहिले. त्यांनी नविन विचार स्वीकारला नाही व त्यांनी या अन्यायाविरुद्ध क्रांती केली नाही (याला अपवाद फक्त बौद्धकाळ आहे.)  

ब्राह्मणशाही ही माणसाचे मन गुलाम करून माणसावर राज्य करणारी व्यवस्था आहे, सिस्टीम आहे जगात प्रत्येक व्यक्ती जो धर्म मानतो त्या धर्माच्या खोलात शिरून तो धर्म जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तसा त्याला अधिकारही असतो पण ब्राह्मणधर्मात म्हणजेच हिंदू धर्मात शूद्राला ती सोय  नाही भारतातला हिंदू धर्मीय स्वतःला हिंदू म्हणतो पण त्याला आजही हिंदूधर्माचा संस्थापक कोण आहे, हे माहीत नाही या धर्माचे मूलतत्त्व माहित नाही, त्याला या धर्माची प्रार्थना माहित नाही, त्याला या धर्माचे प्रचारक कोण हे माहीत नाही, हिंदू धर्माचा मुख्य मार्गदर्शक ग्रंथ कोणता हे माहीत नाही मग तो हिंदू साहित्यातल्या भोंगळ कथा, कहाण्यांनाच तो हिंदू धर्मग्रंथ समजतो आणि तरीपण त्याला हिंदू धर्मावर गर्व आहे याला म्हणतात सामान्य  माणसाचा मेंदू गोठवणे हीच ब्राह्मणशाही आहे 

ब्राह्मणशाहीत देशातल्या महत्वाच्या प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर ब्राह्मणच असतो नाहीतर ब्राह्मणाच्या आदेशानुसार व सल्ल्यानुसार काम करणारा ब्राह्मणसेवक  असतो. भारताच्या सुप्रीम कोर्टाचे जस्टिस, हायकोर्टाचे जस्टिस बहुसंख्येने ब्राह्मणच आहेत. बहुतेक न्यायाधीश ब्राह्मणच आहेत,  रंजन गोगोई सारखे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ब्राह्मणाचे आदेश पाळणारे असतात म्हणून ते भारतीय राज्यघटनेच्या विरोधात जाऊन राम मंदिराचा निकाल ब्राह्मणांच्या बाजूने देतात. भारताच्या प्रशासनात क्लासवन अधिकारी बहुसंख्येने ब्राह्मणच आहेत. मोठं मोठ्या प्रेस मीडियात संपादक  पदावर ब्राह्मणच आहेत. 

राज्यसत्तेत बहुसंख्या मुख्य पदावर ब्राह्मणच आहेत जिथे ब्राह्मण नाहीत तिथे ब्राह्मणाचे सेवक आहेत. विरोधी पक्षनेते ही जास्तीत जास्त संख्येने ब्राह्मणच आहेत बहुतेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू ब्राह्मणच आहेत शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य ब्राह्मणच आहेत संरक्षण खात्यातील प्रमुख पदावर ब्राह्मणच आहेत एवढेच नाहीतरी इथल्या सामान्य हिंदू लोकांची मानसिकताही ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरवणारी व श्रेष्ठ मानणारी मानसिकता आहे.  यावरही ताण म्हणजे इथल्या हिंसक चळवळीचे प्रमुख हे सुध्दा ब्राह्मणच आहेत आणि हे सर्व लोक रात्रंदिवस ब्राह्मणवर्गाला क्रमांक एक वर ठेवण्याकरिता सतत प्रयत्न करीत असतात यालाच ब्राह्मणशाही म्हणतात म्हणून ब्राह्मणशाहीचा पराभव करणे हे एक मोठे कठीण काम होवून बसले आहे.

जगात राजेशाही चा पराभव होणे शक्य आहे कारण राजा एकटाच असतो. सामंतशाही मध्ये सामंतांचा पराभव करणे शक्य आहे कारण हे संख्येने काही असतात. हुकूमशाहीमध्ये हिटलर सारख्या मुसोलीनी सारख्या हुकुमशहाचा पराभव शक्य आहे कारण हे एकटे असतात लोकशाहीत नेत्याचा पराभव शक्य आहे कारण नेता कोण असावा हे लोक ठरवतात पण ब्राह्मणशाहीत ब्राह्मणाचा पराभव कठीण होऊन बसले आहे, कारण जनतेवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व संस्थांचे संघटनाचे प्रमुख हे ब्राह्मणच असतात आणि जनतेचा मेंदू नियंत्रित ठेवणाऱ्या धर्माच्या प्रमुखपदी सुध्दा हेच असतात इथे राजकीय क्षेत्रात ब्राह्मणांची हार झाली तरी ब्राह्मणशाहीची हार होत नाही कारण राजकीय क्षेत्राव्यतिरीक्त इतर क्षेत्रात म्हणजेच 

धर्मात,न्यायालयात,प्रेस मीडियात, प्रशासनात, सांस्कृतिक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, व इतर सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात  ब्राह्मणच प्रमुख असतात आणि या सर्व ब्राह्मणांचा आपसात अत्यंत उत्तम प्रकारे समन्वय असतो म्हणून राज्यप्रमुख बनूनही ब्राह्मणशाहीमध्ये मायावतीला झिरो व्हावे लागते आणि लोकांच्या हितांचे मोठे निर्णय घेवूनही व्हि.पी सिंग साहेबांना प्रधानमंत्री पद सोडावे लागते. 

ब्राह्मणशाहीचा पराभव करणारे पहिले महापुरुष या जगात होऊन गेले ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध. गौतम बुद्धाने ब्राह्मणांचा पराभव हा ब्राम्हणी विचारांचा  पराभव करून व प्रचंड मोठा भिख्खू संघ स्थापन करून दिला भारतीयांना नविन धर्म, नविन मानवीय संस्कृती ज्या संस्कृतीची नाळ सिंधू संस्कृतीशी जुळते अशी संस्कृती देवून केला.  मुसलमानांनी ब्राह्मणशाही चा पराभव हा सरळ शस्त्राने केला व त्यांच्यावर राज्य केले म्हणून एकतर गौतम बुध्दाच्या मार्गाने ब्राह्मणशाहीचा पराभव होऊ शकतो नाहीतर मुसलमानांनी दिलेल्या शस्त्राच्या मार्गाने  ब्राह्मणशाही चा पराभव होऊ शकतो. बुद्धांनी दिलेल्या मार्गाने ब्राह्मणशाही चा पराभव होऊ शकतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  शेवटी आपल्या अनुयायांसहित बौद्ध धम्माचा स्वीकार केला व ब्राह्मणशाही ला पर्याय दिला  धर्मांतराचा एक सन्मान जनक कायदेशीर मार्ग दिला ब्राह्मणशाहीने याला परत खिंडार पाडूनये म्हणून  22 प्रतिज्ञा दिल्या म्हणून शेवटी आपल्या मुक्तीसाठी इथल्या बहुजनांना

"चलो बुद्ध की ओर"  हाच मार्ग स्वीकारावा लागेल व ब्राह्मणशाहीचा पराभव करावा लागेल.

प्रमोद मून  94230 63127

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com