Top Post Ad

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात 2.97 टक्के घट

 

बारावी परिक्षेच्या निकालाची उत्सुकता संपून अखेर आज तो निकाल जाहिर झाला. सकाळी ११ वा. ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीअ बारावीच्या परिक्षेसाठी ९९१७० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते यात ५२०५२ मुले तर ४७११८ मुलींचा समावेश होता. ९८६९६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते पैकी ८७७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परिक्षेला बसलेले ५१७९१ मुले तर ४६९०५ मुली असून यापैकी ४४८९६ मुले तर ४२८५३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा प्रकारे मुलांचा निकाल ८६.६८ चक्के तर मुलींचा निकाल ९१.३६ टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर १ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली आहे.

गेल्या वर्षी सन 2022 साली बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला होता. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. मात्र यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात आला नव्हता. तसेच परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आली होती, त्यामुळे निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.

  • विभागानुसार 12 वीचा निकाल
  • कोकण 96.01 टक्के
  • पुणे 93.34 टक्के
  • कोल्हापूर 93.28 टक्के
  • औरंगाबाद 91.85 टक्के
  • नागपूर 90.35 टक्के
  • अमरावती 92.75 टक्के
  • नाशिक 91.66 टक्के 
  • लातूर 90.37 टक्के
  • मुंबई 88.13 टक्के

बारावीच्या परीक्षेनंतर करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतली जाते. बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावी उत्तीर्णांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत यंदा मुलींनी, दिव्यांगांनी लक्षणीय यश मिळवले आहे, त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.  ‘आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे-आव्हाने म्हणजे एक परीक्षाच असते. या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी अशा परीक्षाकरवून घेत असतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रयत्न महत्वाचे ठरतात. कित्येक जण कठोरमेहनत घेतात, त्यातून मिळालेले यश नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ देते. बारावीच्या परीक्षेत असे यश मिळविणाऱ्यांचे आणि त्यासाठी त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांचे मनापासूनअभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’.परीक्षा एक टप्पा आहे. त्यामुळे यात यश न मिळालेल्यांनी खचून न जाता, नव्या उमेदीनेप्रयत्न करावे. यश तुमचेच असेल’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com