Top Post Ad

मुंबई महानगरपालिकेचा प्रति दिन कचरा वाहतूकीचा खर्च २.४२ कोटी


  मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालामध्ये (२०२१-२२) प्रति दिन ६३०० मेट्रिक टनाच्या ७३% ओला कचरा जमा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेपणभूमीवर कचरा पाठविण्यासाठीचा वाहतूक खर्च कचरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाद्वारे कमी करू शकते. विशेषत: महापालिकेच्या सर्व २४ विभागातून प्रति दिन १ मेट्रिक टन कचरा जमा करणे व क्षेपणभूमीवर पाठविण्यासाठीचा वाहतूक  खर्च अंदाजे रु. ३८४० प्रति दिवस होतो. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका प्रति दिन ६३०० मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यासाठी रु. २.४२ कोटी प्रति दिन आणि रु. ८८३ कोटी वार्षिक खर्च करत असल्याचा अहवाल प्रजा फाऊंडेशनच्या वतीने आज प्रसारमाध्यमांना देण्यात आला. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत  प्रजा फाऊंडेशनचे योगेश मेश्रा, मिलिंद म्हस्के, रिनी फेरियन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेला घन कचरा व्यवस्थापनेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेद्वारे कचरा वाहतूक आणि क्षेपणभूमी व्यवस्थापनाचा खर्च कमी करून अंदाजे रु. १४८५ कोटी एवढी बचत करता येऊ शकते. असेही योगेश मिश्रा यांनी यावेळी सांगितले.  मुंबईमध्ये घन कचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४% नी वाढल्या आहेत. ( २०१३ मध्ये ५,५१९ ते २०२२ मध्ये - २,३५१). वायु प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी २३७ % नी (२०१३ मध्ये ६५ तक्रारी ते २०२२ मध्ये २१९ तक्रारी) आणि मल निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी ३५% नी (२०१३ मध्ये १२,७०८ तक्रारी ते २०२२ मध्ये १७.१२१ तक्रारी) वाढल्या आहेत. तथापि, सन २०२२ मध्ये या तक्रारी सोडवण्याचा सरासरी अधिकतम कालावधी ३१ दिवस  असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका ही मार्च २०२२ मध्ये स्वच्छ भारत अभियानातील "कचरा मुक्त शहर" या योजने अंतर्गत पंचतारांकित मूल्यांकन प्राप्त करण्यात अपयशी ठरली आहे. 

केंद्र शासनाचे घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ हे क्षेपणभूमी मध्ये पाठविण्यात येणारा कचरा कमी करण्याची गरज नमूद करतात. तथापी माहिती अधियाकारान्वये मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन २०२० मध्ये क्षेपणभूमी मध्ये प्रति दिन ६९०४ मेट्रिक टन एवढा कचरा वाहतूक करण्यात आला असून सन २०२२ मध्ये प्रति दिन ७५८२ मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यात आला जी वाढ १०% एवढी आहे. सन २०२२ मध्ये अधिकतम दरडोई प्रती दिन कचरा ए, बी आणि एच पश्चिम विभागातून अनुक्रमे ०.९० कि.ग्रा.,०.८४ कि.ग्रा., व ०.७६ कि.ग्रा., जमा करण्यात आला.. सन २०२२ मध्ये अधिकतम कचरा निर्माण करणाऱ्या (Bulk Waste generator) २८२५ गृहनिर्माण संस्थापैकी ५०% (१४०१) संस्थांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही.

• मिठी नदी मध्ये विष्ठेद्वारे जीवाणूमुळे (Faecal coliform) होणारे प्रदूषण अतिशय एन १०० एम एल) जे सीपीसीबीच्या कमीत कमी निर्धारित २५०० एम पी एन १०० एम एल प्रमाणापेक्षा जास्त आहे (१७००० एम पी अधिक आहे. मुंबई, १६ मे २०२३ प्रजा फाउंडेशनने 'मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती, २०२३' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचा उद्देश वाढत्या समस्या जशा की घन कचरा व्यवस्थापन, मलनिःसारण आणी हवा व पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधणे आहे.

मुंबई शहराला वायु प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्त्रोत अशा गंभीर समस्या जलद गतीने होणाऱ्या हवामान दलामुळे व अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रकियेमुळे भेडसावत आहेत. सन २०१८ ते २०२२ या मागील ५ यामध्ये अधिकतम सरासरी वार्षिक हवा गुणवत्ता निर्देशांक २०२२ (वार्षिक सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक - १२५) मध्ये "दविण्यात आला. निताई मेहता, संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, प्रजा फाउंडेशन यांनी असे व्यक्त केले आहे की, "सन ०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (एमसीएपी) घन कचरा व्यवस्थापनेची र्यक्षमता सुधारणे, मलनिःसारण प्रकिया आणि हवेची उत्तम गुणवत्ता अशा ठोस उपाययोजनांचा समावेश केला आहे जे एक कारात्मक पाऊल आहे".

"नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स नआययूए) ने एकात्मिक घन कचरा व्यवस्थापन प्रणालीची शिफारस कचरा निर्मिती कमी करण्यासाठी, कचरा निर्मितीच्या काणी कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी व क्षेपणभूमीमध्ये वाहतूक करण्यात येणारा कचरा कमी करण्यासाठी केली आहे. बृहन्मुंबई नगरपालिकेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालामध्ये (ईएसआर २०२१-२२) प्रति दिन ६३०० मेट्रिक टनाच्या ७३% ओला राजमा करण्यात आला. पर्यावरण स्थितिदर्शक अहवालानुसार प्रति दिन १२% (७०० मेट्रिक टन कचरा देवनार क्षेपणभूमीमध्ये ८८% (५५०० मेट्रिक टन) कचरा कांजुरमार्ग क्षेपणभूमीमध्ये पाठविण्यात आल्याचे नमूद केले आहे जेथे कचयातूननिर्मितीचा प्रकल्प आहे.".

 "बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेपणभूमीवर कचरा पाठविण्यासाठीचा मान वर्षभरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाद्वारे कमी करू शकते. विशेषतः महापालिकेच्या सर्व २४ विभागातून प्रतिदिन मेट्रिक टन t कचरा जमा करणे व क्षेपणभूमीवर पाठविण्यासाठीचा वाहतूक वर्ष अंदाजे रु. ३८४० प्रति दिवस होतो. याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रतिदिन ६३०० मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यासाठी रु.२.४२ कोटी प्रतिदिन आणि रु. ८८३ को खर्च करत आहे. याशिवाय कांजुरमार्ग क्षेपणभूमीचा प्रति दिन प्रचलन व देखभाल व अंदाजे रु. ३००० प्रति मेट्रिक टन आहे. अशाप्रकारे प्रति दिन ५५०० मेट्रिक टन कन्याया वार्षिक खर्च रु. ६०२ कोटी होतो. बृहन्मुंबई महानगरपालिने कचरा व्यवस्थापन विकेंद्रीकरण प्रक्रियेचा अवलंब करावयास हवा जो स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियाना अंतर्गत एफ/दक्षिण विभागातील प्रभाग क्र. २०३ मध्ये यशस्वीरित्या केला गेला आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान या योजनेमध्ये सामाजिक संघटनांच्या सहभागाने झोपडपट्ट्यांमधून कचरा जमा करून त्यावर विभागामध्येच प्रक्रिया केली जाते."
- - मिलिंद म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रजा फाउंडेशन 

घन कचरा व्यवस्थापनेचे प्रभावी विकेंद्रीकरण ही काळाची गरज आहे. स्वच्छ भारत अभियानाचे विशेष उद्दीष्ट कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्मितीच्या ठिकाणी याची प्रक्रिया है आहे. माहिती अधिकारातील माहितीनुसार सन २०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने सरासरी प्रतिदिन १३८५ मेट्रिक टन सर्व २४ विभागातून जमा केला. त्यापैकी प्रति दिन अधिकतम कचरा एन विभाग (प्रति दिन ४९१ मेट्रिक टन), जी उत्तर विभाग (प्रति दिन ४५९ मेट्रिक टन) आणि के पूर्व विभाग (प्रति दिन ४४ मेट्रिक टन) या विभागांमधून कचरा जमा नापि विभागनिहाय अधिकतम दरडोई कचरा संकलन दर्शवते की, ए. बी आणि पश्चिम विभागातून अनुक्रमे ०.८४.००७६ कि.ग्रा. अधिकतम दरडोई दिन कचरा जमा करण्यात जाना, 
-. योगेश मिश्रा, प्रमुख संशोधन आणि विशेषण, प्रजा फाउंडेशन

घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार अधिकतम कचरा निर्माण  (बी.डब्ल्यू.जी) गृहनिर्माण संस्थांनी (प्रतिदिन १०० कि.ग्र. हून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्था) यांच्यावर विशेषतः ओल्या कचन्यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु ती २८२५ निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थापैकी ५०% संस्था (१४०१) यांच्या ओल्या व निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया करत नाहीत असे आढळून आले.
रिनी फेरियन, प्रकल्प समन्वयक प्रजा फाउंडेशन 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com