Top Post Ad

ठाण्यातील रस्त्याच्या दर्जाला आयआयटीचा मुलामा

 


 मागील कित्येक वर्षापासून ठाणेकरांचा रस्त्याकरिता कित्येक कोटी निधी खर्च झाला आहे. तरीही दरवर्षी पावसाळ्यात नेमेचि येतो खड्डेमय रस्ते घेऊन पावसाळा अशी स्थिती ठाणेकर अनुभवत आहेत. केवळ पावसाळ्यादरम्यान खड्डे पडले की ठाणे महानगर पालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी या रस्त्यांना डांबराचा मुलामा देत असतात तेही ऐन पावसाळ्यात. अशा रितीने नेहमीच ठाणेकरांच्या तोंडाला पाने  पुसण्याचा प्रकार सातत्याने ठाणे महानगर पालिका करीत आहे.  मात्र सद्याचे सरकार गतिमान सरकारचा नारा देत मुख्यमंत्र्यांनी यावेळी हे रस्ते आयआयटी कडून पाहणी करण्याचे ठरवले आहे.  मुळात आधीच दर्जाहीन दिसत असलेल्या रस्त्याला आयआयटीचा मुलामा देण्याचा हा प्रकार असल्याचे मत ठाणेकर व्यक्त करत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये २८४ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून सुरु असलेल्या या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पाहाणी केली. यावेळी कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकाने रस्त्यांचे नमुने घेतले आहेत. रस्त्याचे नमुने घेण्यासाठी कोअर कटिंग यंत्राचा वापर करण्यात आला. हा तपासणी अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कामांची गुणवत्ता तपासणीसाठी मुंबई आयआयटी पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून रस्ते कामांची पाहाणी करण्यात येत असतानाच, या पथकाने आता रस्त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात केली आहे.  रस्त्याचे नमुने घेण्यासाठी कोअर कटिंग यंत्राचा वापर करण्यात आला. हे नमुने मुंबई आयआयटीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी डांबर आणि काँक्रीट अशा दोन्ही रस्त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. नमुने म्हणजेच रस्त्याचा तुकडा. कोअर कटर यंत्राद्वारे हा तुकडा काढून घेऊन तो मुंबई आयआयटी प्रयोग शाळेमध्ये तपासला जाणार आहे. कोणत्याही रस्त्यांचे काम करताना विशिष्ट मातीचा थर त्यावर खडी आणि नंतर त्यावर डांबराचे थर चढवले जातात. हा थराची जाडी योग्य आहे का, याचे मोजमाप मोजपट्टीच्या सहाय्याने केले जाते. तसेच हा थर बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू दर्जेदार आहेत कि नाही याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. तिथे तपासणी केल्यानंतरच रस्त्यांचा दर्जा चांगला आहे किंवा वाईट याबाबत अंतिम अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे. या मूल्यमापन अहवालातून रस्त्यांचा खरा दर्जा ठाणेकरांना कळू शकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com