Top Post Ad

शेन्डे...शाडिल्य....धर्माधिकारी


 धर्माधिकारी कुटुंबीय मुळचे रेवदंडा गावचे . हे कोकणातले. त्यांचे मुळ आडनाव शेन्डे. ज्योतिषी व पौरिहित्य हा त्यांचा मुळ व्यवसाय. पुढे शाडिल्य आडनावाने ओळखले जावू लागले. त्यांची आता ओळख धर्माधिकारी. आप्पासाहेब उर्फ दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांचे वडिल नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुध्दा प्रारंभी हाच व्यवसाय केला. मग दासबोधावर निरूपन करू लागले. धर्माधिकारी कुटुंबियांनी श्री समर्थ प्रसादित अध्यात्मिक सेवा समिती स्थापन केली .त्या माध्यमातून आध्यात्मिक कार्याला सुरूवात केली. तेव्हापासून त्याचे बस्थान वाढले. श्रीबैठकीत दत्त अधिष्ठान, सत्यदत्तपूजा, अंतरात्मा, पंचमहामृत, उपासना चालते. श्रवण चालते ,सदगुरू संबोधले जाते. असे अनेक नवे शब्द व अर्थ रूढ केले. निरूपम करणे म्हणजे वाद्यांशिवाय कीर्तन, गादीवर बसणे म्हणजे मनाचे श्लोक व ओव्याचे वाचन करणे. अशा भारी शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. 

या मार्गे सामान्य लोकांना आकृष्ट केलं गेलं. यातून संसारात सुख मिळेल असं मनावर ठासविलं . ट्रस्ट श्रीमंत आहे. वाड्या आहेत. बंगले आहेत. आणखी बरचं काही आहे. श्रीसेवक गरीब आहेत. त्यांना फुकट राबविले जातं. असा हा निरूपनाचा धंदा जोरात आहे. व्यवस्थेची साथ आहे. सोबतीला फुकटचे श्रीसेवक आहेत. याच कारणाने संभाजी ब्रिगेडने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाला विरोध केला होता. धर्माधिकारी धार्मिक गुलामी लादतात. खोटा इतिहास सांगतात.अंधश्रध्देला खतपाणी घालतात.वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात असाआरोप केला होता. त्याकडे कानाडोळा केला. रामदासी परिवाराने यावरच भर दिला. शिवाय श्रीसेवकांचे संख्याबळ लक्षात घेतले. याच कारणाने आतापर्यंत त्यांना राजकीय पाठबळ मिळत गेले. 

पुढे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बनले. तेव्हापासून धर्माधिकारी कुटुंबियांना सुगीचे दिवस आले. आता प्रतिष्ठानाचे वारसदार म्हणून सचिन धर्माधिकारी यांना घोषित करण्यात आले. भाजपवाले  घराणेशाहीवर टिका करतात. पुरस्कार देताना घराणेशाही विसरतात. त्यामुळेच धर्माधिकारी  कुटुंबात दुसऱ्यादा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय वादग्रस्त बनला. या   प्रतिष्ठानाच्या शाऴा , कॉलेज नाहीत. आरोग्य, रक्तदान व वृक्षारोपनाचे  दिखावी शिबीरं चालतात.  दर आठवड्याला श्रीबैठकांचा सपाटा असतो.  लोकांना अध्यात्माच्या आधारे संमोहित करण्याचा प्रकार चालतो. त्याच्या आहारी गोरगरीब, मध्यमवर्गीय गेले.  तेच अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात.  त्यांनाच उष्माघाताचा फटका बसला. आता सावरासावर सुरू आहे. भर ऊन्हात सभा घेण्याचे नियोजन कोणाचे..!त्याचा शोध घ्यावा. त्या विरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा.13 कोटी रूपये खर्चाचाही हिशेब व्हावा. महाराष्ट्र भूषण  कार्यक्रम राजभवन सोडून मैदानात नेणे. त्याला राज्यपाल हजर नसणे .अशा अनेक गोष्टींचा शोध घेण्याची गरज आहे.   

भूपेंद गणवीर 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com